पान:केकावलि.djvu/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. म्हणोनि केवितासुता तुज समर्पितों; साजरी 33 नसे बहु तशी गुणी कनकपीतवासा! जरी,। । वणवा.' ॥ (द्रोण.), (३) 'भीमें झुगारिली रथशक्ति प्रकटावया ठळक लीला; । अशनीच मानिली बहु जननयनांहीं नभी झळकलीला' ॥ (द्रोण.), (४) 'नीरादानागतमुनिपात्ररवाकर्णने अजाणानें । तापस गजभ्रमानें वधिला मी शब्दपाति वाणानें' ॥ [मंत्ररामायण-अयोध्याकांड-गीति ६५,] (५) 'भृगें विराजित नवीं अरविंदपत्रे । पाहूनि मानुनि तिचींच विशाल नेत्रं ॥ घालीन अंजन अशा मतिने तटाकी । आहा ! वृथा उतरलों भिजलों विलोकीं ॥ [रघुनाथपंडित], (६) 'चांपेकळीपरिसही सरलत्व नाकीं । जीचा धरी अधर विद्रुमभावना की ॥ भासे मनांत मज विवफलभ्रमानें । कीं सत्य चंचुपुट ओढविलें शुकानें' ॥ [रघुनाथपंडित]. या अलंकारांत उत्पन्न होणारी भ्रांति अज्ञानजन्य नसावी तर प्रतिभोत्थित म्हणजे कवीच्या प्रतिभाशक्तीने निर्मिलेली असावी. रजताच्या ठिकाणी शुक्तीची भ्रांति होते ती प्रतिभानिर्मित नव्हे तर अज्ञानजन्य होय. प्रकृत चरणांत ईश्वराच्या कित्येक गुणांच्या साम्यावरून भले हे ईश्वरच होत अशी जी भ्रांति स्तुतीला झाली ती कविप्रतिभोत्थित होय, म्हणून हा भ्रांतिमान् अलंकार जाणावा. 'तव गुणैकदेशभ्रमें' यांत 'तव' या विभक्त्यंत शब्दाचा उत्तर पदांतील समस्त जो 'गुण' शब्द त्याशी संबंध आहे म्हणून हे सर्व पद 'त्वद्गुणैकदेशभ्रमें' असें समस्त पाहिजे होते. परंतु नित्यसापेक्ष शब्दांचा दुसऱ्या पदांशी समास होतो असा संस्कृत व्याकरणाचा नियम [सापेक्षत्वेऽपि गमकत्वात्समासः] आहे; त्यास अनुसरून तृतीय चरणांतील पद सदोष म्हणतां येत नाही. अपेक्षा असतांही अर्थाला बाध येत नसेल तर असा समास केला तरी चालेल. संस्कृतांत असे प्रयोग पुष्कळ आढळतात. [रघुवंश-सर्ग ६ लो० १-२ टीका पहा.] १. हे भगवन् !] म्हणोनि कविसुता तुज समर्पितों. हे] कनकपीतवासा! देवा!] [ही] जरी बहु साजरी नसे [आणि] तशी गुणी [नसे], तरी, इतरा न वरी; [हे] हरि! इला किंकरी करी, जैसा करी (गजेंद्र)[विमुक्त केला, तैसा] निजात्मजाग्रहविमुक्त मयूरही [करी] असा अन्वय. स्तुतीचा मुख्य भोक्ता ईश्वर, स्तुतिरूप कविता ही कविरूप सागराची कन्या, तिचा अंगीकार भगवंतांनी करावा अशा अभिप्रायाने कवि भगवंताला प्रार्थितात. स्तुतीचा भोक्ता तूंच आहेस या कारणास्तव पंतांनी यापूर्वी साधुसंतांची स्तति पुष्कळ वेळां केली. आपली स्तुतिकन्या केवळ परमेश्वरालाच कां अर्पण केली आहे याचें खबीदार कारण त्यांनी ३२ व्या केकेंत सांगितले आहे. २. कवितारूप माझी कन्या. वेदांत 'कवि' शब्दाचा अर्थ 'सूक्तं रचणारे' असा होऊन 'वेदसूक्तांस' 'काव्य' अथवा 'कविता' म्हणत. सांप्रत काव्य म्हणजे छंदोबद्ध कविता व ती रचणारा कवि. (३. अर्पण करितों, तुला देतों, हिचें पाणिग्रहण करावे म्हणून आदरपूर्वक देतो. सुंदर, अलंकृत, सुरेख. लोकनक (सुवर्णाप्रमाणे)+पीत (पिवळे आहे)+वासस् (वस्त्र) ज्याचें अशा भगवंता। कवीने भगवंताला 'कनकपीतवासा' असे संबोधून त्याचे रूपगुणधनादि सकलैश्वर्य सुचविले व आपली स्तुतिकन्या साळी भोळी असल्यामुळे भगवंताच्या आश्रयासमा स्तविक योग्य नाहीं असाही आपला स्पष्ट अभिप्राय दर्शविला. हे सुवर्णासारखा पी