Jump to content

पान:केकावलि.djvu/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत प्रत्येक पदांत अर्थसौंदर्य असून त्याचे यांत एकीकरण झाले आहे. म्हणून रे । औदार्य' गुण झाला. काव्याचे गुणः-'औदार्य, समता, कांति, रर्थव्यक्तिः, प्रसन्नता, माधिः, श्लेप, ओजो,ऽथ माधुर्य, सुकुमारता ॥ पदानामर्थचारुत्वप्रत्यायकपदांतरैः । मिलितानां यदाधानं तदौदार्य स्मृतं यथा' ॥ ३ (वाग्भटालंकार तृतीय परिच्छेद). काव्याचे मुख्य गुण दहा. १ औदार्य, २ समता, ३ कांति, ४ अर्थव्यक्ति, ५ प्रसन्नता, ६ समाधि, ७ श्लेष, ८ ओज, ९ माधुर्य व १० सुकुमारता. जेथे प्रत्येक पदांत अर्थसौंदर्य व्यक्त होत असून ते सर्व एकवटून जाते तेथे औदार्यगुण होतो. तसेंच यांतील प्रथमचरणांत 'ओज' नामक गुण झाला आहे. 'ओजः समासभूयस्त्वं.' जेथे मोठमोठे लांब समास असतात तेथें 'ओज' गुण होतो; याची अनुकूळ वर्णरचना किंवा वृत्ति 'परुषा' किंवा 'आरभटी' होय. पृथ्वीवृत्त हे परुषावृत्तीला चांगलें शोभतें. केकावलीत मुख्य 'रस' 'भक्ति,' मुख्य 'गुण' 'ओज,' मुख्य 'रीति' 'गौडी' व मुख्य 'वृत्ति' 'परुषा' होय. 'रीति' म्हणजे रसाला अनुकूळ असणारी पदरचना, 'वृत्ति' म्हणजे रसाला अनुकूळ अशी वर्णरचना. या केकेंत हेतु, काव्यलिंग आणि भ्रांतिमान् असे तीन अलंकार झाले आहेत. भले स्तुतीला वरीत नाहीत, याचा हेतु ते पाप न जोडिती' हा सांगितला आहे म्हणून हा हेतुनामक अलंकार होय. जेथे हेतुमानासह (कार्यासह) हेतूचें (कारणाचे) वर्णन केले असते तेथे हेतु अलंकार होतो. याचे लक्षणः-(१) 'कायेंण साकं हेतोश्चेद्वर्णनं हेतुरुच्यते.' । 'एष ते विद्रुमच्छायो मरुमार्ग इवाधरः । कस्य नो तनुते तन्वि! पिपासाकुलितं मनः' ॥ २०० ॥ [मंदारमरंदचंपू-१० व्यंग्यबिंदु-पृ० १४९], 'कार्यासह हेतूचें कथन अलंकार हेतु या नांवें, । अभिमान सुंदरीचा छेदाया इंदु हा नभी उगवे' (अ.वि.) स्तुति ही तुमची पत्नी, मग तिचा स्वीकार भले करतील तर पापी होतील, म्हणून ते तिचा स्वीकार करीत नाहींत-या द्वितीयचरणगत अर्थाचे समर्थन प्रथम चरणांतील 'कवीश्वरमनःपयोनिधिसुतास्तुतीच्या पते!' या संबोधनपदाने केले आहे म्हणून हा काव्यलिंग नामक अलंकार झाला आहे. [मागें केका ८ पृ० ३०, टीपा पहा.] तृतीय चरणांत भ्रांतिमान् अलंकार झाला याचे लक्षण:-'वस्तुन्यन्यत्र कुत्रापि तत्तुल्यस्यान्यवस्तुनः । निश्चयो यत्र जायेत भ्रांतिमान् स स्मृतो यथा' । (वाग्भटालंकार परिच्छेद ४ श्लो० ७३). जेथे सादृश्याने एका वस्तूवर दुसऱ्या एखाद्या वस्तूची प्रतीति होते अथवा जेथें एक पदार्थ पाहून त्यासारख्या दुसऱ्या पदार्थाची भ्रांति वर्णिली असते तेथें भ्रांतिमान् अलंकार होतो. स्मरण, भ्रम, संशय हे जरि कविनें वर्णिले असति रुचिर । तरि होय अलंकारत्रय त्या नामी जनीं प्रसिद्ध तर (अ. वि.). वर्णनीय पदार्थांच्या सादृश्यामुळे जेथें इतरांचे स्मरण, भ्रांति, व संशय कवीने खुबीदार वर्णिले असतात तेथे क्रमाने स्मृतिमान्, भ्रांतिमान् व संदेह हे तीन अलंकार होतात. यांची क्रमाने उदाहरणे:-'पंकज पाहत असतां कांतामुख येतसे मनीं विमळ । हा मत्तभंग सुंदरि तुझिया वदनासि जाणतो कमळ ॥ ५॥ हें कमल की सुधाकर हा निर्णय आमुचा नसे ठरला । अति फुल्ल निष्कलंकें तद्वदने हृदयिं च भरला' ॥ २ ॥ (अ. वि.) भ्रांतिमानाची उदाहरणे:-(१) सांगद सखा तो कपिकेतुशरगुज गमला । सहसा खगपतिखंडितभोग तदाननविमुक्त भुजग मला' ।। ( गमले शक्रप्रल्हाद रामरावण वा;। वाटे गगनीं तच्छरसंघर्षजदहन पामरा (२) 'पवनतपनसुत गमले शक्रप्रल्हाद रामराव