पान:केकावलि.djvu/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. सर्व लोक असमर्थ आहेत, तरी इतरांनी विविधतापापासून आपली सुटका व्हावी एतदर्थ भगवत्प्रार्थना अवश्य करावी हा फलितार्थ जाणावा. हाच अर्थ पंतांच्या काव्यांत पुढील स्थळी आढळतोः-(१) गुरुलघु कविंनी प्रभुतें नित्य यथामति विशंक वानावें । [भगवद्गीतास्तुति-गीति ८], (२) स्तुति करुनि तुझी तुजला आम्ही अज्ञान काय वा! रिझवू ? गाउनि अमृतगुणांतें हृदयींचे ताप आपुले विझवू. ॥ [आर्याकेकावली-२६ मो० स्फु० का० पृ० २२१], (३) नाथ! कथंकारं ते महिमानमगाधमिममहो! ब्रूमः, । यत्त्वत्तत्वविचारेऽद्याप्यास्ते प्रभुरचंचल भ्रमः ॥ [कृष्णस्तवराज-३३. मोरोपंत-स्फुटकाव्ये-पृ० २३९], (४) आकाशअंत न कळोनिहि अंतरिक्षी, आकाश आक्रमिति शक्त्यनुसार पक्षी; । नामप्रतापहि यथामति याच रीती, सीमा न पावति, तथापि मुनींद्र गाती. ॥ ५ ॥ [वामनपंडितकृत कवितासंग्रह-भाग १. नामसुधा-अ० १.] ४. तुझ्या योग्यतेचे, तुझ्यासारखे. भगवंताच्या गुणांचे यथार्थ वर्णन भगवंताशिवाय इतराच्याने होणे नाही. असेंच तुकोबानेही म्हटले आहे:'तुज वर्णी ऐसा तुजविण नाहीं । दुजा कोणी तीही त्रिभुवनीं ॥-[तुकाराम, अभंग ३२५.] पहा ५. 'सम' या विशेषणाने मागील शब्दाचें सामान्यरूप झाले आहे. या चरणांत 'प्रभूसारखे थोर प्रभूच' असा अर्थ गर्भित असल्यामुळे यावर अनन्वय अलंकाराची छाया पडली आहे. याचे लक्षणः 'एकाचि वस्तुला ती जरि उपमानोपमेयताहि दिसे । ह्मणति अनन्वय तीतें कांतीने इंदु इंदुसाचिजसें' ॥ (अ० वि०). जेव्हां एकाच पदार्थाला उपमानत्व व उपमेयत्व दिले असते तेथे अलंकार अनन्वय होतो. अनन्वय झणजे ज्यांत उपमानोपमेयांत योग्य संबंध नाहीं तो. एका पदार्थाचे दुसऱ्या पदार्थाशी साम्य करणे योग्य आहे. पण ज्याचे त्याशीच सादृश्य वर्णन करणे हे 'अन्वित' ह्मणजे योग्य नाही म्हणून ह्या अलंकारास अनन्वय हे नांव दिले आहे. याची उदाहरणे:-(१) गगनासि तुल्य गगनचि, सिंधूची होय सिंधुलाची सरी। श्रीरामरावणांचें युद्ध गमे रामरावणांचि परी' ॥ (अ. वि.), (२) असि साधु साधुपतिसीं गांठ पडे ती, जसी अया परिसा । यापरि साचा हाचि प्रेमळ, याच्याचि या जया परिसा (मोरोपंत-उद्योगपर्व), (३) घडे दैवें किंचित् कलुष परि संतापति मनीं । अशांतें ताराया असति बहुतीर्थे त्रिभुवनीं । जयां प्रायश्चित्तें नसति कुनरां दे गति अशी। समर्था या लोकीं तुजसम अयी ! तूंच असशी॥(वामनपंडित), (४) श्रीरामरावणसमर होय श्रीरामरावणसमरसा। ते वृष्टि जसे, न करिति तसि शुचि सशकाररावण सम-रसा ॥ (भारती रामायण), (५) झाले बहु, होतिल बहु, आहेतहि बहु, परंतु यासम हा ॥ (विराट (४-७५) ६. शाहाणे, सुज्ञ लोक. भगवंताचे यथार्थ स्तवन करण्यास त्याच्याच तोडीचा कवि पाहिजे. हा विचार पंतांच्या पुढील गीतींतही आढळतो:-(२) 'स्वभजनसुमार्ग लावी, प्रभु ने यमभय समस्त विलयातें। दुसरा असेल कोणी जरि कविवर यासम स्तविल यातें, ॥ [चतुर्थस्तोत्ररामायण-गी० ८८ रामायणे-भाग २], (२) थोरपण अनंताचें अनंत वील, काय कविहीर ?' ईश्वराच्या महिम्याची थोरवी या केकेंत यथार्थ व सुंदर वर्णिली आहे. प्रभूची अत्युच्च पदवी व भक्तांचे क्षुद्रत्व या दोन्ही गोष्टींचे वर्णन जसे असावे तसे आहे. अध्यात्म रामायणांतील एका भक्ताची पुढे दिलेली उक्ति वाचावी:-'मया प्रलपितं किंचित सर्वज्ञस्य तवाग्रतः क्षतुमर्हसि देवेश! तवानुग्रहभागहं' (अध्यात्मरामायण उत्तरकांड). कवी. च्या म्हणण्याचा अर्थ हा की भगवंताचे गुण अनंत असून ते प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्यानेही