Jump to content

पान:केकावलि.djvu/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. प्रसन्न तुमचे बरें मजवरी प्रभो! पाय हो। क्षण त्यजुनि इंदिराबृहदुरोजसंगा, धरा मी बाहेरून दरिद्री दिसलों तरी माझें दारिद्र्य कधीही न जाण्याजोगे असे आहे काय?' नाहीं काक्वर्थी उत्तर. माझा रंकपणा माझ्या आयुष्यास खिळलेला नसून तो जाण्याजोगा आहे. २. शाश्वत, (सदोदित, नेहमी)+प्रकृतिरंक (प्रकृतीने स्वभावतः, रंकभिकारी; जन्मदरिद्गी). जन्मापासून मरेपर्यंत ज्याचे दारिन्य नाहीसे होत नाहीं तो. माझें रंकत्व शाश्वत नव्हे, माझें दारिद्य तुमचा अनुग्रह होतांच नष्ट होणारे आहे. ३. 'हो' हे संबोधन न मानिले तरी चालेल. 'कायहो' हे एक पद अव्ययरूप मानले असतां अधिक गोड लागतें-'कायहो तुम्ही आतां असे निष्ठुर झालां,' 'कायहो तो चमत्कार,' इत्यादि वाक्यांत 'कायहो' हे सारे विस्मयार्थदर्शक अव्यय जाणावें. तसेंच-'तुम्ही आतां असे निष्ठुर झालां कायहो' म्हणजे 'निष्ठुर झाला असे मला वाटते,' असा ईषत्स्वीकृतीचाहि अर्थ होतो.' (य० पां०-पृ० ११४). १. 'येथे आपले दारिद्य कशाने नाहीसे होईल तें कवि सांगतात. देवा! तुमचे पाय मात्र मजवर प्रसन्न होऊ द्या बरें म्हणजे मी शाश्वत रंक नाही हे तुम्हांस तेव्हांच दिसून येईल. हो होवोत. २. क्षणभर. ३. लक्ष्मीपुष्टस्तनसंगमाला. 'इंदिरा लोकमाता मा क्षीरोदतनया रमा.' बृहत्-स्थूल, मोठे, पुष्ट; उरोज स्तन. 'स्तनाचे स्थूलत्व सौंदर्याचे अंग म्हणून या देशांत शृंगाररसप्रधान काव्यांत फार वर्णिलें असतें.' [य० पां० -पृ० ११६]. जयदेव कवीचं 'गीतगोविंद' व भर्तृहरीचे 'शृंगारशतक' पाहिले असतां वरील म्हणण्याची सत्यता दिसून येईल. 'पुष्पेषोरभिषेकहेमकलशौ हारप्रभा वाहिनी । चक्राव्हौ मदनोन्मदद्विपपतेः कुंभौ रतेः कंदुकौ । कन्दौ बाहुमृणालिकायुगलयोलीलालतासत्फले । नव्यौ रत्नसमुद्गको वहति सा लावण्यपूर्णी स्तनौ' (सुभाषितरत्नभाण्डागार पृ० ४२६ श्लोक ७३). 'प्रभूचे पाय मजवर प्रसन्न होवोत म्हणजे रंकपणा जाईल' तो कसा तें कवि सांगतात. देवा! तुम्ही क्षणभर लक्ष्मीच्या स्तनावर ठेवलेला आपला पाय काढून तो माझ्या मस्तकावर ठेवा म्हणजे मला गंगाधराची योग्यता येईल. महादेवाची योग्यता अंगी येणे यापरता मोठेपणा तो कोणता यावयाचा? कथासंदर्भ:-शंकराने समुद्रमंथनप्रसंगी निघालेलें हालाहल विष लोककल्याणार्थ भक्षण केले. त्यामुळे त्याच्या अंगाचा दाह हो लागला. त्याचे शमन व्हावे म्हणून त्याने अंगाला भस्मलेपन केले, गळ्यांत सर्प धारण करून डोक्यावर अमृतस्रावी चंद्र व शीतलजलवाहिनी गंगा यांस धारण केले म्हणून शंकराला 'गंगाधर' व 'चंद्रशेखर' म्हणतात. लक्ष्मीच्या स्तनावरील आपला पाय काढून तो माझ्या डोक्यावर ठेवा म्हणजे मला गंगाधरत्व (महादेवाची योग्यता) येईल. कथासंदर्भः-लोकजननी लक्ष्मी आपल्या स्तनाने भगवान् विष्णूच्या पादकमलांचं मर्दन करिते. भगवंताचे चरण अत्यंत कोमल असल्यामुळे लक्ष्मीच्या नाजुक हस्ताने पाय रगडणे सुद्धा प्रभूस दुःसह होईल म्हणून अत्यंत मृदु अशा स्तनानें लक्ष्मी भगवंताचें पाट. संवाहन करिते. भगवंताचे पायांशिवाय बाकीचे सर्व शरीर वज्राप्रमाणे कठीण होते. पाय मात्र