पान:केकावलि.djvu/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत दिसें म्हणुनि शाश्वतप्रकृतिरंक मी काय ? हो ! पूर्वीच्या काली लहान मोठे सर्व पदार्थ एका ठिकाणी राखून ठेवण्याची चाल श्रीमंत लोकांत होती असे दिसून येते. तथापि यावरून ‘पदार्थसंग्रहालया'ची कल्पना पुष्कळ जुनी असावी असें मानण्यास कांहीं आधार नाही. ५. गुणाला. [प्रभु गुणा (एखाद्या वस्तूंत गुण कमी असला तरी त्याला) उणा (कमी) न म्हणतां उलट अधिक आदरें (अत्यंत आवडीने) सेविती (सेवितात, उपयोगांत आणतात). जे समर्थ आणि शौकी लोक आहेत ते कोणत्याही वस्तूच्या गुणाचा (मग तो गुण कितीही अल्प असेना) अनादर न करितां सर्व वस्तू आपल्या संग्रहास ठेवितात, आणि प्रसंगविशेषीं त्याला आस्थापूर्वक उपयोगांत आणतात. पदार्थ कसाही असो, कितीही लहान असो, त्याचा उपयोग समयविशेषीं फार होतो म्हणून 'तृणेन कार्य भवतीश्वराणां' या न्यायाने राजे सकल वस्तूंला संग्रही ठेवितात. त्याचप्रमाणे आपल्या श्रीमंतांच्या घरांत जरी सेवकांची उणीव नाही व मी अतिदरिद्री असल्यामुळे माझ्या संग्रहाने जरी आपणास कांहीं लाभ नाहीं, तरी आपण सर्ववस्तुसंग्राहक प्रभुवर आहां; म्हणून माझा अनादर न करतां मला आपल्या संग्रही ठेवा अशी माझी प्रार्थना आहे. जे खरे भक्त आहेत ते ईश्वरसमागमाविषयीं अत्यंत भुकेले असतात. परमेश्वराच्या सन्निध राहून त्याची सेवा करण्याची उत्कट इच्छा ख्रिस्ती बायवलांतही पुढील स्थळी दावीदानें प्रगट केली आहे:-"One thing have I desired of the Lord, that will I seek often; that I may dwell in the house of the Lord all the days of my life to behold the beauty of the Lord, and to inquire in his temple.” Ps. XXV11. 4. भर्तृहरीकृत 'नीतिशतकां'तही थोरांची अशीच गुणग्राहकता सांगितली आहे:-मनसि वचसि काये पुण्यपीयूषपूर्णास्त्रिभुवनमुपकारश्रेणिभिः प्रीणयंतः । परगुणपरमाणुं पर्वतीकृत्य नित्यं निजहृदि विकसंतः संति संतः कियंतः ॥ याचें वामनपंडितकृत भाषांतरः-ज्यांची देहमनें, तशीच वचनें, पुण्यामृते ओतिलीं; की जेंहि स्वकृतोपकारविभवें सर्वत्र विस्तारिलीं। लोकांचे परमाणुतुल्य गुण जे मेरूपरी वानिती, चित्तीं तोषहि पावती सुजन ते नेणों किती नांदती. ॥ ६. 'गुणा उणा अधिक न म्हणतां आदरें सेविती' असाही अन्वय केला तरी चालेल. पदार्थांचे गुण चांगले आहेत किंवा वाईट आहेत, किंवा अमकी वस्तु अधिक उपयोगाची, अमकी कमी उपयोगाची, ह विचारात न घेतां त्यांचा आस्थापूर्वक संग्रह करतात असा अर्थ जाणावा. शेवटच्या दोन चरणांत अर्थातरन्यास अलंकार झाला आहे असे मानल्यास चालेल. पृष्ठ ८ पहा. १. हो! [अहो महाराज! मी दिसें म्हणुनि शाश्वतप्रकृतिरंक [आहे] काय? [अहो] प्रभो! तुमचे पाय मजवरी प्रसन्न हो (होवोत). बरें इंदिराबृहदुरोजसंगाक्षण त्यजुनि [माझ्या शिरी पद धरा, गंगाधरा सम [आणि] सुशील सखा मिळो-असा अन्वय. दिसें दिसतो. 'आपण म्हणाल की तूं रंक दरिद्री दिसतोस म्हणून आम्हां मतांजवळ तूं चाकर शोभणार नाहींस' अशी शंका घेऊन कवि म्हणतात. 'हो! महाराज) मी (मोरोपंत) दिसें (वरून दिसतों,) बाह्यात्कारी रंकसा दिसतों वास्तव) शाश्वतप्रकृतिरंक (निरंतर प्रकृतीने दरिद्री, जन्मदरिद्री) काय?' (अहो! मह