पान:केकावलि.djvu/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत अत्यंत मृदु होते, असे 'अनुशासन'पर्वांत सांगितले आहे. भगवंताच्या निर्वाणसमयीं व्याधाने कृष्णाला मृग समजून जो वाण मारिला तो पायावर लागला आणि ते प्राणोत्क्रमणास निमित्त झाले ही 'मौसलपा'तील कथा [अध्याय ४] सर्वविश्रुतच आहे. ईश्वराचे चरण अत्यंत कोमळ म्हणून त्यांनी लक्ष्मीस्तनाचा आश्रय केला असे जसे येथे वर्णन आहे तसेच ते पंतांच्या काव्यांत पुढील ठिकाणीही आढळतेः-(१) यौ कमलावक्षस्यपि वक्षोजस्पर्शभूरिरक्ततलौ। तौ तव वृंदावनमुवि चंक्रमणं चक्रतुश्चिरं चरणौ ॥. [कृष्णस्तवराज-लोक ९५ पृ० २४४], (२) ज्याचे चरणतळ मळे लक्ष्मीकुचकुंकुमें, असाहि तळमळे । [आर्यागीतिमुक्तामाला-आ० गी० ४८ पृ० २१३.] कृष्णस्त्रिया आपल्या पतीचे चरण आपल्या स्तनांवर ठेवीत असत असे पुढील अवतरणावरून दिसून येईल:-बहुधा आम्ही स्वकुची वाहतसों तेंवि तूं स्वशंगांहीं । वाहों वांछसि विभुपदसारस जें जुष्ट साधु,गांहीं ॥ [कृष्णविजय-अ० ९० गी० २२ पृ. ३४५]. पंतांच्या केकावलीत व त्यांच्या इतर ग्रंथांतून शृंगाररसाचा अतिरेक कितपत आहे व तो. क्षम्य आहे किंवा कसे यासंबंधी अल्पविवेचनः-कृष्ण आपल्या स्त्रियांच्या उरोजावर चित्रावली काढीत असे (केका ७), कृष्णस्त्रिया आपल्या पतीचे पाय आपल्या स्तनप्रदेशी धारण करतात (केका २४), कृष्णाला राधिकेचा विरह क्षणभर सहन होत नसे (केका १०२), अशा प्रकारची थोडी वर्णने या काव्यांत आढळतात. यावरून कित्येकांनी हे बीभत्स ठरवून कवीला फार दोष दिला आहे. वास्तविकपणे पंतांच्या काव्यांत वीभत्सवर्णन नितांत विरळ आढळतेंमाकंदर पंतांच्या ग्रंथसमुद्राचे आलोडन केले असता त्यांत हिरे माणकेंच फार सांपडत असून बीभत्सवर्णनरूपी गाळ फारच थोडा आढळतो. याची प्रतीति पाहणे असल्यास पंतांनी 'हरिवंश' 'कृष्णविजय' वगैरे ग्रंथांत केलेले रासवर्णन वाचावें ह्मणजे पंतांच्या प्रस्तुत काव्यांतलें वीभत्सवर्णन प्राचीन अर्वाचीन अशा अनेक संस्कृत ग्रंथांतल्या बीभत्सवर्णनाच्या मानाने किंवा 'राधाभुजंग', 'राधाविलास' इत्यादि काव्यांचा कर्ता वामनपंडित यांच्या किंवा पंतांच्या काळाला जवळ अशा 'रामजोशी' व 'अनंतफंदी' यांच्या वीभत्सवर्णनाच्या मानाने खंडीत पाव रती सुद्धा नाही असे वाचकांस दिसून येईल. या संबंधाने यशोदापांडुरंगीच्या प्रस्तावनेत दादोबा लिहितात:-" आतां आणखी एक दोष प्रस्तुत काव्यांत आढळतो. तो पूर्वोक्त दोषांपेक्षां (ईश्वराशी अत्यंत सलगी दाखवून त्याशी वेळोवेळी अतिप्रसंग करणे या दोषापेक्षां) अधिक शोचनीय आहे असे विचारशील पुरुषांस वाटल्यावांचून राहाणार नाहीं; आणि वर जी म्यां दयाळू आणि न्यायी अशा परमेश्वराच्या प्रार्थनेत विनयातिक्रमणरूप दोषांची सूचना केली, त्याच दोषाचे हे परिपक्व फल होय, असे त्यांच्या ध्यानात येऊन प्रकृत दोषप्रदर्शनांत पूर्वोक्त दोषकथनाचे समर्थनही होईल. एकदां विनयभाव सुटला ह्मणजे सलगीस आरंभ होतो, आणि ती सलगी विनोदास पोंचविते; ह्या देशांत, विशेषेकरून संस्कृत काव्यांत, शृंगाररसाचे प्राधान्य असल्यामुळे त्या विनोदांत हा रस प्रचुर होऊन वाभत्स रसाचाही प्रादुर्भाव होतो. असे असले तरी इतर लोक व्यवहारवर्णनपर का समयविशेषीं समर्याद असल्यास श्रृंगार आणि बीभत्स हे रस सुसह्य आणि रुचिपरत्वें भाजनकाह व्हावयास शक्य आहेत; परंतु भगवत्स्ततींत या रसाचें नुसत्या लवणाप्रमाणहा ग्या लवणाप्रमाणेही