पान:केकावलि.djvu/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. न लाभ मणिहेमभूपतिस जोडिल्या आयसें. । परि प्रभुहि संग्रहीं सकल वस्तुला ठेविती; गुणा न म्हणतां उणा, अधिक आदरें सेविती. ॥ २३ म्हणून त्यांकडे न विकितां तुम्हीच आपणाजवळ मला ठेवून मजपासून चाकरी घेऊन आपला उतार फेडून घ्या, अशा अभिप्रायाने पुन्हा कवि' (केकादर्श) भगवंताला प्रार्थितात. 'तुमचिया (तुमच्या घरी) धना (द्रव्याला) परिजना (सेवकजनाला, चाकरमाणसांना) कायसे उणे (काय कमी आहे)?' तुमच्या येथें द्रव्याला किंवा चाकरमाणसाला कमी आहे म्हणून तुम्ही मला चाकरीस ठेवावें अशांतली गोष्ट मुळीच नाही. मला चाकरीस ठेवा म्हणून तुम्हांला मी आग्रह करितों पण मला चाकरीस ठेवण्यापासून तुमचा कांहींएक फायदा नाहीं या शंकेवर दृष्टांत दुसऱ्या चरणांत दिला आहे. २. चाकरांना. परिजन आश्रित, चाकर लोक, परिवार, भृत्यवर्ग.. १. मणि (रत्न)+हेम (सोनें)+भू (पृथ्वी)+पति (स्वामी). ज्यापाशी रत्नसुवर्णादि द्रव्यांची विपुलता आहे अशा पृथ्वीपति राजास. 'मणिहेमभूपतिस आयसें जोडिल्या लाभ न'-असाही अन्वय. एखाद्या श्रीमंत राजाचा लोखंडाने आश्रय केला तर (लोखंडास जसा लाभ आहे तसा) त्या राजास त्यापासून कांहीं लाभ नाही असा अर्थ केला तरी चालेल. २. मिळविलेल्या. ३. लोखंडाच्या तुकड्याने. 'लोहोऽस्त्री शस्त्रकं तीक्ष्ण पिंडं कालायसायसी' [अमर]. रत्नसुवर्णादिकांची ज्यास समृद्धि आहे अशा राजांस जसा एखाद्या लोखंडाचा तुकडा सांपडला असतां लाभ झाला असे होत नाही, तद्वत् असंख्य दासदासींनी युक्त अशा तुमच्या घरी मी राहिल्याने देवा! तुम्हांला काडीएवढा सुद्धा लाभ व्हावयाचा नाही. आयसें आयसाने. येथे 'आयसें' हे तृतीयेचें एकवचन आहे. येथे दृष्टांतालंकार झाला आहे. पृष्ठ १३ पहा. अलंकारांत सादृश्य व भेदः-'दृष्टांतालंकार व अर्थातरन्यास हे काही अंशी सारखे आहेत. एखादा विशेष प्रकृतार्थ मनांत येण्याकरितां दुसऱ्या विशेष अप्रकृतार्थाचे उदाहरण दिले असतां दृष्टांत होतो; व प्रकृत सामान्यार्थाचा बोध होण्याकरितां विशेष अप्रकृतार्थ सांगणे किंवा प्रकृत विशेषार्थ मनांत बिंबण्याकरितां अप्रकृत सामान्यार्थ सांगणे ह्यांस अर्थातरन्यास म्हणतात. अन्योक्ति, दृष्टांत व अर्थातरन्यास ह्यांच्यामध्ये व उपमा व रूपक यांत भेद हाच की, दुसऱ्या दोन अलंकारांमध्ये सादृश्य मुख्य असते, व पहिल्या तीन अलंकारांत तें मुख्य असत नाही; तर तें गौण असून दुसऱ्या कार्यास उपयोगी पडते. अन्योक्तींत प्रकृतार्थ दाखविण्याकरितां सादृश्य सांगितले असते; व दृष्टांत व अर्थातरन्यास ह्यांत प्रकृतार्थ सिद्ध करण्याकडे त्याचे तात्पर्य असते.' (अनेकविद्यामूलतत्व 'वाक्यांतले अलंकार') ४. समर्थ, श्रीमंत, माझ्यापासून जरी तुम्हांला मुळीच फायदा व्हावयाचा नाहीं तरी मला सोडूं नका. कारण जे श्रीमंत आहेत ते लहान मोठे सर्व पदार्थ-लोखंडाच्या तुकड्यापासून तो सुवर्णाच्या कांबीपयेत सर्व लहान मोठ्या वस्तू-संग्रहास ठेवितात. 'न जाणों कोणत्या वेळेस का उपयोग पडेल' असे समजून किंवा केवळ हौसेखातर ते सर्व वस्तू बाळगतात. ह्यावर