पान:केकावलि.djvu/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत धना परिजना घरीं तुमचिया उणें कायसें ? ठीतली यमकें होत. हा लांब यमकप्रासांचा प्रचार विशेषतः वामनाच्या काव्यांतून प्रथमतः आढळतो. मोरोपंतांनी तर ही यमकें व हे प्रास साधण्याची पराकाष्ठा केली. आर्येच्या द्वितीय व चतुर्थचरणभर पसरलेली यमके त्यांच्या काव्यांत पुष्कळ आढळतात. सात, आठ अक्षरांची यमकें तर अतिशयच आहेत. याची थोडी उदाहरणे पुरवणींत पहावी. या संबंधाने वेदार्थयत्नाचे विद्वान् कर्ते रा० ब० शंकर पांडुरंग पंडित यांचा एलफिन्स्टन शाळापत्रकातील पुढील अभिप्राय महत्वाचा आहे: “Some centuries afterwards, Waman was the first who introduced the greatest number of Sanskrit metres and words, the first who adorned his verses with long harmonious rhymes, and was the first who imposed upon every one that wished to hear him, the necessity of having at least some elementary knowledge of Sanskrit. Then followed our lofty and learned poet of the eighteenth century. He wrote, as he says himself, in a mystical Kantha (a patch-work of many coloured cloth), and carried to the utmost height the outward ornament of rhyme, the logical accuracy and scientific exactness in use of words, the art of expressing long complicated thoughts within a most wonderfully short compass, by means of compounds or samasas (which is one of the characteristic beauties of Sanskrit, and thence of Marathi); and lastly almost a reverential observance of the rules of grammar and idiom. (Shanker Pandurang Pandit in the Elphinstone School_paper, October 1863.) 'साधूंच्या घरी विकून परमार्थतीराला लावल्याबद्दल पैसे वसूल करून घ्या' असे म्हणण्यांत पंतांनी सत्संगाविषयी आपली आत्यंतिक अभिरुचि प्रकट केली. संतसमागमाचा महिमाच तसा आहे. तुकारामाने देवापाशी दान मागतांना 'नलगे मुक्ति, धन संपदा । संतसंग देई सदा ॥' असेंच मागणे मागितले आहे. पंतांनी देखील संतवर्णनविषयपर सन्मणिमाला, ज्ञानदेवस्तव, चांगदेवस्तव, श्रीनाथचरित्र, कबीरस्तव, रामदासगुणवर्णन, वामनपंडितस्तुति, नरसिंहमेहतास्तव, तुकारामस्तुति, तुळसीदासस्तव, माधवदासस्तव, महिपतिस्तुति, इत्यादि स्फुटकाव्ये आणि साधुस्तव, सत्संगस्तव, साधुरीति, साधुसत्कार, सद्वर्णन इत्यादि प्रकरणे साधारणपणे सत्संगमहिमा वर्णन करण्यासाठी लिहिली, यांवरून पंत सत्संगाविषयी केवढे भुकेले होते हे चांगले दिसून येते. ९. मागे १५ व्या केकेंत 'निजप्रियजनाकडे तरिहि दे हवाला' इत्यादि जें कवीने म्हटले आहे त्याचीच येथें उत्तरार्धात स्पष्ट पुनरुक्ति केली आहे. __१. [अहो महाराज!] तुमचिया घरी धना परिजना उणें कायसें ? मणिहेमभूपतिस जोडिल्या आयसें लाभ न [असे;] परि प्रभुहि सकल वस्तुला संग्रही ठेविती, आणि गुणा उणा न म्हणतां अधिक आदरें सेविती-असा अन्वय. 'साधूकडे मला विका असें दल खरे, पण आपल्या मनांत असें येईल की माझे भक्त जे साधु ते दरिद्धी सत, त्याजपासून तुझें मोल मला काय मिळावयाचे आहे? तर हे खरेंच आहे. साम