पान:केकावलि.djvu/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. असे विदित वासही मज सदाश्रमींचा; करा __दैया, गुण पहा, सवे मज सदा श्रमी चाकरा.॥ २२ १. तुला विकत घेतो कोण? कोणाकडे तुला विकावें? अशी आपणास चिंता पडेल तर तिचे निवारण सहज होण्यासारखे आहे. माझ्या अंगी एक गुण आहे, त्यावरून मला विकत घेण्यास आपणास पुष्कळ ग्राहक सांपडतील. तो गुण कोणता आणि ते ग्राहक कोण यांचा उलगडा कवि उत्तरार्धात करतात. २. येथे 'ही' शब्दाने माझ्या आंगी आणखी थोडेबहुत गुण आहेत त्यांत हाही एक गुण आहे असे दर्शविले आहे. ३. साधूंच्या आश्रमांतला. मज (मला) सदाश्रमींचा. (साधूंच्या आश्रमांतला) वास (राहणे) ही विदित (ठाऊक) असे (आहे). मला साधूंच्या आश्रमात राहून त्यांची मर्जी कशी सांभाळावी, सेवाचाकरी कशी करावी, तेथे कसे वागावें हे मला चांगले माहीत आहे, म्हणून तुम्ही मला साधूंना विका. मला साधुजनांच्या स्वाधीन करा. 'आश्रमींचा' येथे 'आश्रम' शब्द सप्तम्यंत असून त्यावरून पुढे 'चा' हा संबंधी विशेषणाचा प्रत्यय लागून हे रूप झाले आहे. 'घरींच्यास खावयास मिळत नाही व दारीचे मौजा करितात.' अशी पुष्कळ उदाहरणे आढळतात. वदनींचा [विराटपर्व-अ० ६ गी० ५७], स्वमुखींचे [विराटपर्व-अ० ५ गी० ७२], पदरींचे [द्रोणपर्व-अ० १७ गी० ८५] इत्यादि प्रयोग पंतांच्या काव्यांत आढळतात. ४. कृपा, मेहरबानगी. दया करा-एवढी मला (साधूंच्या घरी विकण्याची) कृपा मजवर करा. ५. साधूंच्या घरी राहाण्याचे गुण माझ्या आंगी आहेत किंवा नाहीत याची परीक्षा करा. ६. सवय. मज (मला) चाकरा (नौकराला, सेवकाला) सदा (नेहमी) श्रमी (श्रम करण्याविषयीं, कष्ट करण्याविषयीं) सवे (सवय, अभ्यास) [आहे] माझा स्वभाव कष्टाळू असल्यामुळे साधूंच्या घरी कष्ट करण्याचे मला कठीण पडणार नाहीं, म्हणून साधूंकडे मला विका अशी प्रार्थना करतो. 'सवे' हा शब्द पंतांनी बऱ्याच ठिकाणी योजलेला आढळतो. जसे:-(१) तव चरणधूलिस जशी स्वगींच्या गाइला सवे दानी. [गणपति-प्रार्थना-दूर्वा २१], (३) तंडायाचीच तुला युद्धांत असेल जरि सवे, तंड. द्रोणपर्वअ० १६ गी० ५२.] ७. सदा निरंतर, सर्वदा. ८. श्रमी श्रमाच्या ठायीं, श्रमाविषयी नवाक्षरी यमक. पद्याच्या चरणाचे शेवटीं जी एक किंवा अधिक अक्षरें सारखी जळलेली असतात त्यांस यमक म्हणतात. प्राचीन संस्कृत काव्यग्रंथांतून या अर्थाची यमकें नसून इंग्रेजींतील ब्ल्यांक व्हर्स (Blank Verse) प्रमाणे त्यांत प्रकार आढळतो. 'घटकर्परा'दि कांहीं संस्कृत चित्रकाव्यांतून मात्र मराठीतल्या प्रमाणे यमकें आढळतात. संस्कृतांत अक्षरसमूहाच्या आवृत्तीस यमक म्हणतात. उदाहरण:-'फिरविते रवितें दधिभीतरी । मिरविते रवितेज नगांवरी। स्वकरि ते करि चंचलता मनीं। उपरमे परमार गायनी' ॥ (वामन) यांत 'रविते,' 'करिते,' 'परमे' या अक्षरसमूहाची आवृत्ति झाली आहे म्हणून ही संस्कृतांतील यमकें झाली. मराठीत यास अनुप्रास म्हणतात. 'री' व 'नी' ही मरा. ६ मो० के०