Jump to content

पान:केकावलि.djvu/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत वणार्थ पशुच्या शिरावरि वनीं उभे काकसे, मरादि रिपु मन्मनीं; अहि न काळ भेका कसे? ॥ २१ । आहेत. उपमेंत 'विंबप्रतिबिंब' न्यायाने उपमानोपमेयांचें, जरी ते वास्तविक पृथक् असतात तरी एकमेकांच्या सादृश्यामुळे, ऐक्य मानिले असते. जेव्हां उपमेय, उपमान, साधारण धर्म व उपमावाचक शब्द या चोहोंतून एकाचा, दोहोंचा किंवा तिहींचा प्रतिपादक शब्द नसल्यास तिला लुप्तोपमा म्हणतात. ही लुप्तोपमा आठ प्रकारची आहे:-१ वाचकलुप्ता, २ धर्मलुप्ता, ३ धर्मवाचकलुप्ता, ४ वाचकोपमेयलुप्ता, ५ उपमानलुप्ता, ६ वाचकोपमानलुप्ता, ७ धर्मोपमानलुप्ता, व ८ धर्मोपमानवाचकलुप्ता. या निरनिराळ्या प्रकारांची उदाहरणे त्या त्या प्रसंगी दिली जातील. वरील केकेंत पूर्णोपमा झाली आहे. उपमालंकाराचे एक प्रसिद्ध उदाहरणः-(१) जो धैर्ये धरसा सहस्र करसा तेजें तमा दूरसा। जो रत्नाकरसा गभीर, शिरसा भूपां यशोहारसा ॥ ज्ञाता जो सरसावला नवरसां माझारि शंगारसा। शोभे तामरसाक्ष तो नळ रसानाथ स्तवू फारसा ॥ (नलोपाख्यान-रघुनाथ पंडित). शलभानलांचा दाखला पंतांच्या कवितेत अनेक ठिकाणी आढळतो:(१) गीता-अ० ११ गी० २९. (२) आदिपर्व-अ० १९ गी० १२. ३. दाव+अनळी= वणवा+अग्नींत. दव किंवा दाव असा द्विरूप शब्द आहे. १. व्रण, क्षत करण्याकरितां. २. कावळ्याप्रमाणे. काकसे काक जसे तसे स्मरादि रिपु. येथें उपमा अलंकार झाला आहे. 'उपमैका शैलूपी संप्राप्ता चित्रभूमिका भेदान् । रंजयति काव्यरंगे नृत्ययति च तद्विदां चेतः' याचा अर्थः-उपमा ही नटीप्रमाणे निरनिराळे वेप घेऊन काव्यरूपी रंगभूमीवर येते व रसिकांच्या चित्तांचे रंजन करून त्यांस आनंदाने नृत्य करावयास लावते. तात्पर्य, काव्यांत उपमा हा मुख्यालंकार असून त्याच्यांत थोडा फरक केला म्हणजे रूपक, उत्प्रेक्षा, अतिशयोक्ति, अपन्हुति, प्रतीप, दीपक इत्यादि इतर अलंकार होतात. उदाहरणे:-'मुख कमलाप्रमाणे आहे'-उपमा, 'मुख जणू काय कमल आहेउत्प्रेक्षा, 'मुख कमल आहे'-रूपक, 'मुख कमलच आहे' अतिशयोक्ति, 'कमल मुखाप्रमाणे आहे' प्रतीप, 'मुख नव्हे, कमल आहे' अपन्हुति, 'कमलाला पाहून मुखाचे स्मरण होतें' स्मरण, 'भ्रमर मुखाला कमल समजून भोंवती घिरट्या घालतात' भ्रांति, 'मुख आहे की कमल आहे, हे समजत नाहीं' संदेह, 'स्त्री मुखकमलाने बोलते' परिणाम, 'कामी कमल टाकून स्त्रीमुखाचा स्वीकार करितात' परिवृत्ति, पाण्यांत कमळ शोभते, अवयवांत मुख साजते' प्रति वस्तूपमा, 'मुखकमलांतून वाग्बाण निघतात' विभावना, 'मुख, कमलाप्रमाणे पंकाश्रय व मधुपचुंबित नसल्यामुळे, अधिक होय' व्यतिरेक व श्लेष इत्यादि. हा चरण सरस स्वभावोक्तीचेही सुरेख उदाहरण आहे. ३. कामादि शत्रु. 'मन्मनी स्मरादि रिपु वनीं पशुच्या शिरावरि वणार्थ काकसे उभे' असा अन्वय. माझ्या हृदयांत काम, क्रोध, लोभ, मोह, मद, तर हे पड्रिपु नेहमी जागत असून ते माझ्या नाशाविषयीं टपलेले आहेत. काम सहा शत्रु माझ्या मनाला भ्रष्ट करण्यासाठी टपत उभे आहेत. वनांत हा मृसालला पशु केव्हां मरेल, आणि आम्ही यास केव्हां बोंचून याचे मांस खाऊं, मत्सर प्रमुख