पान:केकावलि.djvu/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. तरेन तुमच्या बळें भैवमहानदी, नाविका! म्हणून हिंस्रपक्षी जे कावळे, ते जसे त्याच्या मस्तकावर बसून साकांक्ष असतात, तसे माझ्या मनाच्या अग्रभागी कामादि पड्रिपु बसून आपण याचा केव्हां नाश करूं म्हणून टपलेले आहेत. 'व्रणात' असेंही दुसरे पाठांतर आढळते. त्याचा अर्थ व्रणाने पीडित, घायाळ, असा करून ते 'पशुच्या' ह्या शब्दाचे विशेषण समजावें. जनावराच्या मानेवर किंवा दुसऱ्या एखाद्या शरीराच्या भागावर व्रण-फोड झाला म्हणजे कावळे त्यावर बसून टोचतात हे सर्वप्रसिद्ध आहे. ही केका पंडितराजजगन्नाथप्रणीत 'करुणालहरी'तील पुढील श्लोकाशी किती समानार्थक आहे ते पहा:-मदकामविमोहमत्सरा रिपवस्त्वत्पुर एव विह्वलम् । धृतशाङ्गदारिनंदक प्रतिकर्पति कथं न लज्जसे. ॥ [करुणालहरी-२५] मद, मदन, विमोह, क्रोध, मात्सर्य, तृष्णा । सकलहि रिपु तूझ्या सन्निधानींच कृष्णा ! ॥ हरिति मज सुदीना चक्रसारंगपाणे ! । धरिसि असि गदा, हे त्वन्मती केवि नेणे' ॥ (केमकर) 'करुणालहरि' स्तोत्रास 'विष्णुलहरि' असें अन्य नांव आहे. या पुरातन काव्याचा पंतांनी 'केकावलि' रचितेसमयीं कितीसा उपयोग केला हा एक चिंतनीय प्रश्न आहे. या प्रश्नाचा ऊहापोह झाला पाहिजे. ४. मृत्युस्वरूप, मृत्युप्रद. ५. बेडकाला. 'भेका अहि काळ कसे न?' बेडकाला सर्प हे काळ कसे नव्हेत? साप बेडकाला गिळतो म्हणून बेडकांचा काळ साप असे येथे म्हटले आहे. जसे साप बेडकाला गटकन् गिळून टाकतात तसे कामादि पडिपु माझा केव्हां फडशा पाडतील ते मला सांगवत नाही. अशा रीतीने मी कलीच्या व कामादि षड्रिपूंच्या सपाट्यांत सांपडलों असून त्यामुळे फार पीडित झालो आहे, म्हणून मजविषयीं करुणा येऊ द्या-अशी कवि भगवंताला प्रार्थना करितात. स्मरादिरिपु (कामादि षड्रिपु) काळभेका (काळ किंवा आयुष्यरूपी भेकाला वेडकाला) अहि-(सर्प) कसे न? (कसे नाहीत?). अर्थात् कामक्रोधादि पड्रिपु माझ्या आयुष्याला ज्याप्रमाणे सर्प बेडकाला खाऊन टाकतात तद्वत् गट्ट करितात; असा ही कोणी कोणी अर्थ करितात तोही प्रशस्तच. येथें चतुर्थचरणांत प्रतिवस्तूपमा अलंकार झाला आहे. [मागें केका २ वरील टीपा पहा.] उपमान आणि उपमेय यांत समान धर्म दिसला असतां हा अलंकार होतो. येथे अहि आणि भेक ही उपमाने, स्मरादि रिपु आणि मी ही उपमेये, काळ असणे आणि उभे असणे समान एकार्थच आहेत, म्हणून प्रतिवस्तूपमा अलंकार जाणावा. तसंच या चरण प्रश्न आहे. उत्तर-अहि हे भेका काळ होत, असे ठरलेले आहे, म्हणून येथे प्रश्नालंकार समजावा. बोलणारा प्रश्न विचारतो, पण त्याला त्या प्रश्नाचे उत्तर माहीत असून त्याजविषयी त्याचा निश्चय अगोदरच झाला असतो अशा स्थळी हा अलंकार होतो. याचें उदाहरण:-(१) यौवनभर, स्मरज्वर होतां येईल कां मना शील? रक्षक विवेक नसतां पुण्यव्रतकाम काम नाशील ।। (ब्रह्मोत्तरखंड अ० ३ गी० १९) याला इंग्रजीत Erotesis असं म्हणतात. या अलंकाराला साहित्यशास्त्रवेत्ते फारसा मान देत नाहीत. १. पूर्वोक्त कलिकामादि शत्रूच्या जाचांमुळे भवनदीतून पार पडणे फार कठीण