पान:केकावलि.djvu/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. तयांत अविशुद्ध मी, शलभ जेवि दावानळी. । नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिरः । पुण्यश्लोका च वैदेही पुण्यश्लोको जनार्दनः ॥' हे वचन सुप्रसिद्ध आहे. प्रथमचरणाचा अर्थ:-नळराजा अत्यंत पवित्र असूनही कलीने त्याचा अत्यंत छळ केला. ३. द्वेष, वैर, छळ. 'दावा' हा शब्द अरबी आहे. ह्या परकी भाषेतील शब्दाचा पंतांनी आपल्या काव्यांत पुष्कळ ठिकाणी उपयोग केला आहे:-(१) दावा बहुतांसी हा भाव कळों दुर्जनासि नेदावा [कृष्णविजय-उत्तरार्ध-अ० ८३ गी० ६८], (२) आला होउनि योगें शररूप व्याळपाळ दाव्याने [कर्णपर्व-अ० ४७ गी० ४१]. १. त्यांत, तशांत. 'तयांत मी अविशुद्ध, जैवि शलभ दावानळी [तेंवि आहे]'असा अन्वय. "सुनिर्मळी नळी कळी परम उग्र दावा करी म्हणजे अतिपवित्र जो नळराजा त्याच्याशी कळीने मोठा दावा केला. तयांत म्हणजे त्या कळीच्या दाव्यांत अविशुद्ध म्ह० मलिन जो मी तो असा होईन की, शलभ जैवि दावानळी म्ह० वणव्यांत जशी टोळाची अवस्था होते तशी कलीचे दाव्यांत माझी अवस्था होईल." [इंदुप्रकाश-ता० १४ मे १८६६.] अत्यंत पवित्र नळराजाचा कलीने जर छळ केला, तर माझ्यासारख्या पापी मनुष्याची काय कथा? मी पापी पडलों तेव्हां कळी माझा अतिशय छळ करील हे सांगणेच नको. कळीच्या सपाट्यांत मी दावानळी (वणव्यांत) जसा शलभ (टोळ) तसा भस्म होईन. पतंग जसा मोठ्या अग्नीच्या सपाट्यांत पार जळून जातो त्याप्रमाणेच कलीच्या सपाट्यांत माझ्यासारख्या पाप्याची अत्यंत दुर्दशा होईल. नळासारख्या पुण्यश्लोकाला जर कळीने छळले तर मग माझ्यासारख्या पाप्याला तो छळतो यांत नवल काय? येथे कैमुतिकन्याय होऊन काव्यार्थापत्ति अलंकार झाला, [मागें पृष्ठे ३९४-३९५ पहा.] २. पतंग, टोळ. अग्नीत पतंगाची जी अवस्था तीच कलीच्या सपाट्यांत माझी होईल. येथें दावानल आणि कलि, शलभ आणि मी यांत उपमानोपमेयभाव आहे; उपमावाचक 'जेवि' शब्द आहे म्हणून हा उपमा अलंकार झाला. 'उपमा यत्र सादृश्यलक्ष्मीरुल्लसति द्वयोः । हंसीव कृष्ण ते कीर्तिः स्वर्गगामवगाहते' (कुवलयानंद). 'उपमा ती दोघांचा साम्यचमत्कार जेथ रमणीय । हंसीपरि कीर्ति तुझी कृष्णा! सुरसिंधुगाहिनी होय' ॥ (अलंकारविकाश) ज्या काव्यांत उपमान (ज्याच्याशी साम्य वर्णावयाचें तें चंद्र, कमल इत्यादि) आणि उपमेय (ज्यास साम्य वर्णावयाचें तें मुखचरणादि) यांचे सुंदर सादृश्य सहृदय (रसिक) जनांच्या अंतःकरणांस आल्हाद होईल अशा प्रकारे (व्यंग्यार्थाचा बोध होईल अशा रीतीने मात्र नव्हे) वर्णिले असते तेथे उपमालंकार होतो. उपमेयास 'वर्ण्य, प्रकृत व विषय' असे प्रतिशब्द असून त्याच्याच उलट 'अवर्ण्य, अप्रकृत व विषयी' हे शब्द उपमानाचे वाचक आहेत. उपमेंत साधारणतः उपमेय, उपमान, (उपमेयोपमानांतील) साधारण धर्म व उपमावाचक शब्द अशा चारी गोष्टी असतात. ह्या चारी गोष्टी जेथे असतात. ते र्णोपमा होते. वरील प्राकृत पद्यात्मक उदाहरणांत 'कीर्ति' हे उपमेय, 'हंसी 'सुरसिंधुगाहिनी' हा साधारण धर्म व 'परि' हा उपमावाचक शब्द अशा चारी गोली