पान:केकावलि.djvu/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. न होय कवणाहि, तें तुमचियाचि लीलालसें पदें चरित दाविजे त्रिजगदजकीलालसें; । मेदुद्धरण मात्र कां जड तुम्हां दिसे ? वारिती स्वकव्यसन मर्त्यही, न करितीच सेवा रिती.॥ १९ . १. लोकहिताकरितां आजपर्यंत आपण मोठमोठी कृत्ये केली, त्यांच्या पुढे माझ्या अपराधांची क्षमा करण्याचे आणि माझा उद्धार करण्याचे काम कांहींच नाही. तें कार्य आपल्यासारख्या समर्थास अवघड आहे असें नाहीं-असा अभिप्राय दर्शवित होत्साते कवि ह्मणतात. 'कवणाहि [जे न होय तें त्रिजगदब्जकीलालसें चरित तुमचियाचि लीलालसें पदें दाविजे'-असा अन्वय. कोणाच्यानेही जे कार्य व्हावयाचें नाहीं तें तुमचंच पद (पाऊल) सहज खेळता खेळतां करून दाखवितें. भगवंताच्या पदाचा महिमा असा असामान्य आहे. २. लीलेने आलस (मंद) ते लीलालस, खेळून खेळून थकलेले. 'लीलालसें' हे 'पदें' याचे विशेषण आहे. ३. दाखविले जाते. ४. त्रिजगदब्जकीलालसें (त्रिजगदब्जकीलालासारखें) त्रि+जगत्+अब्ज+ कीलालसें तीन+जगें, लोक+कमल [अप्+ज आप् (पाणी)+ज (झालेले) पाण्यापासून उत्पन्न झालेले कमल]+उदकासारखें [कीलाल उदक] त्रिजगद्रूप अब्जाच्या (कमलाच्या) सभोंवतीं में कीलाल (आवरणोदक) आहे त्यासारखें, गंगोदकासारखें. त्रिभुवनरूप कमलासभोवती असणाऱ्या जलाप्रमाणे. हे उदक तुमच्या लीलालस पदानें भागीरथीरूपाने आणिलें अशा प्रकारचे (चरित). कथासंदर्भ:-वामनावतारी बळीचा छळ करण्याकरितां वामनरूपी विष्णूनें जेव्हां एक पाय स्वर्गात ठेवण्यास वर उचलला तेव्हां त्या पायाने ब्रह्मांड फुटून त्याच्या बाहेरचे उदक आंत शिरलें, तीच गंगा. अशी गंगेच्या उद्भवाची एक कथा आहे. कवीच्या म्हणण्याचा अर्थ हा की 'वामनावतारी तुम्हीं सहज आपला पाय वर उचलला तर ब्रह्मांड फुटून गंगा उत्पन्न झाली व अशासारखी अचाट चरितें तुम्ही अगदी खेळता खेळतां करितां, पण तीच अत्यंत परिश्रमाने देखील दसऱ्या कोणाकडूनही व्हावयाचीं नाहींत.त्रिजगदब्जकीलालसें' याचा संबंध वासना वताराकडे न लावितां अर्थ केला तरी प्रशस्त. ब्रिजगत् हे अब्ज (अब्जवत) आहे ज्याला असें कीलाल (उदक) से (उदकासारखें,) निजगद्रूप जे अब्ज (कमल) त्यास पाण्यासारखें, कमळाला जसा सर्व आधार पाण्याचा तसा त्रिजगताला सर्व आधार ज्याचा असें 'चरित'. 'त्रिजगदब्जकीलालसें' हे 'चरित' याचे विशेषण समजावें. पंतांच्या 'केकावली'त त्यांच्या भारत सोडून इतर प्राकृत ग्रंथांपेक्षां संस्कृत शब्दांचा भरणा जास्त आहे ह्याचे प्रस्तुत सामासिक पद एक उदाहरण होय. दुसऱ्या कोणाकडूनही न होणारें, केवळ कमलाप्रमाणे जगत्रयाला उदकामध्ये तरंगत ठेवण्यासारखें कृत्य तुमच्या पदाकरान करण्यांत येते. असे असतां माझा उद्धार (मला, संसारसागरांत बुडणायाला वर उचलून धरण्याचे काम) मात्र तुम्हांला जड वाटतो, जगत्रयापेक्षा माझे ओझें अधिक