पान:केकावलि.djvu/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत दयाब्द वळशील तूं, तरि न चातकां सेकां वाटते का? ५. माझा उद्धार करणे. आपलें एवढे सामर्थ्य असून माझा उद्धार करणे हे काम तुम्हांला जड (कठीण) कां वाटावें? कठीण वाटत नाहींच; पण तिकडे तुम्ही दुर्लक्ष्य करितां असे मला वाटते तर मजवर दया करून तेवढी उपेक्षाबुद्धि काढून टाका. ६. स्वक-आपले आश्रितजन पोष्यजन-त्यांचे व्यसन-दुःख, संकट. मर्त्यही (सामान्य लोक सुद्धां) स्वकव्यसन (अंगीकार करून एकदां ज्यांना आपले म्हटले अशा लोकांची संकटें) वारिती (वारितात, टाळतात, दूर करितात) [त्यांची सेवा (पोष्यजनांनी केलेली चाकरी) रिती (रिकामी निष्फळ) न करितीच (करितच नाहीत, त्यांची सेवा निष्फळ होऊ देत नाहींत.) स्वकीयांच्या, आश्रितजनांच्या दु:खाचे निवारण हे जे त्यांच्या सेवेचें फळ ते त्यांस देतात. आपल्या सेवकांची सेवा व्यर्थ न घेता त्यांचे मनोरथ सफळ करतात. ज्यांना एकदां आपलें म्हटले असे लोक जर रंजले गांजले असले तर त्यांनी केलेली आपली सेवा आठवून त्यांचे क्लेश निवारण करितात. मग तुम्ही तर सर्वैश्वर्यसंपन्न भगवान् आहां; साझ्यासारख्या आपल्या सेवकांस तारणे हे तर आपले कर्तव्यच होय. ७. रिकामी, निष्फळ. 'रिती' हा शब्द संस्कृत 'रिक्त' शब्दापासून साधलेला आहे. १. तूं दयाब्द वळशील, तरि चातकां सेवकां किमपि उणें न. तूं देव भाविकां कां उबगशील? अनन्यगतिका जना सोपद्रवा निरखितांचि, [हे] करुणार्णवा! तुझेंचि मन उमोप द्रवा धरी-असा अन्वय. दया+अब्द-कृपा+मेघ दयाघन, दयेचा मेघ म्हणजे पाण्याचा जसा मेघ बनलेला असतो, तसा दयेचाच बनलेला मेघ (ईश्वर). परमेश्वराला मेघाची उपमा देणे हे कविजनसंमत आहे. आमच्या मयूरकवीला तर 'दयामृतघना'ची (केका १२१) अत्यंत आवड आहे. या समयीं माझा उद्धार आपण करीत नाही तर राहूं द्या; पण आपली कृपा मजवर असूं द्या म्हणजे झाले; अशा अर्थानें कवि प्रार्थना करितात. २. उतरशील, वृष्टि करशील. 'वळणें त्वरेने उतरून येणे, कांहीं सुगावा नसतां अकस्मात् [पाऊस] भरून येणे, पडणे. 'वळणे' हा अकर्मक धातु आहे. दयाब्द असा तूं जर वळशील, येशील, वृष्टि करशील, उतरशील. परमेश्वर मेघ; भक्तजन चातक. मेघ वृष्टि करूं लागला म्हणजे जसे चातकांचे सर्व मनोरथ परिपूर्ण होतात, तद्वत् परमेश्वराची कृपा भक्तांवर झाली म्हणजे त्यांचे इच्छित हेतु सफळ होतात. ते परिपूर्ण होण्यास मुळीच विलंब लागत नाही. ३. तूं दयारूप उदकाची वृष्टि आम्हां चातकरूप सेवकांवर जर करशील, तर मग आम्हांस कांहीं उणें नाहीं. चातकाला मेघोदकावांचून दुसरी गति नाही हा प्राचीन कविसंकेत सुप्रसिद्ध आहे. 'जेथे मेघाचेनि गर्जनें । मयूर उपरमों पाहे गगने । ना नवेनि जीवने । चातकमने उल्हासे' (एकनाथी भागवत अध्याय १. ६२) येथे 'दयाब्द' आणि 'चातकां सेवकां' अशा पदांची बाजना केल्यामुळे रूपक अलंकार झाला आहे. [मागें केका ६ टीपा पृ० १८,१९ पहा.) ४. भक्तांला, आम्हांसारखे जे भोळे भाविक जन त्यांस.