________________
६२ मोरोपंतकृत दुःखदाहजनित पीडारूपी जो शोष त्याच्या वारणाचा मोठा ध्यास, हा 'तृषा' शब्दाचा अर्थ घेतल्यास सन्नद्या शब्दाच्या योजनेची उपपत्ति चांगली लागते, ह्मणून दुःखमोचनाची उत्कंठ इच्छा हाच येथें 'तृष्णा' शब्दाचा अर्थ समर्पक दिसतो, नवीन अर्थप्राप्तीची इच्छा असाच अर्थ घेतला पाहिजे असे नाही.] येथे रूपक योजून परमेश्वराच्या दयेला नदीची उपमा दिली ती फार समर्पक आहे. हा चांगला ह्मणून याची तृष्णा शांत करावी, तो वाईट ह्मणून त्याला आपले पाणी पिऊ देऊ नये, हा दुजा भाव जसा नदीच्या ठिकाणी वास करीत नसून तिचे पाणी जसे तीरावरील बऱ्यावाईट लोकांना पिण्याला सारखेच उपयोगी पडतें, तद्वत् भगवंताची दया, चांगले वाईट कसेही असोत, त्यांनी तिचा आश्रय केला ह्मणजे त्यांना कृतार्थ करिते. बायबलांतील पुढील विचार या केकेंतील चतुर्थ चरणाशी अत्यंत सदृश आहे:-God maketh his sun to rise on the evil and on the good, and sendeth rain on the just and on the unjust.' (Matt. V. 45). या ख्रिस्ती शास्त्रांतील विचारांशी ज्ञानेश्वरीतील पुढील ओव्या । अतिशय समानार्थक आहेत. त्या वाचून उत्कृष्ट वर्णन कोणत्या ग्रंथांत आहे याचा स्थूल मानान वाचकांस विचार करितां येईल:-जो सर्वा भूतांचे ठायीं। द्वेपातें नेणेचि कहीं। आपपरू जया नाहीं । चैतन्या जैसें ॥ १ ॥ उत्तमातें धरिजे । अधमातें अव्हेरिजे । हें कांहींच नेणिजे । वसुधा जेवीं ॥ २ ॥ कां राजाचे देह चाळू । रंका परौतें गाळू । हे न म्हणेचि कृपाळू । प्राण मैं गा॥३॥ गाईची तृपा हरूं । व्याघ्रा विष होऊनि मारूं । ऐसे नेणेचि गा करूं । तोय जैसें ॥ ४ ॥ (अध्याय १२) ३. तुमच्या. 'आपल्या' 'तुमच्या' 'तुझ्या' 'माझ्या' यांच्या ऐवजी 'आपुलिया,' 'तुमचिया, 'तुझिया,' 'माझिया,' हे शब्द योजण्याचा कवींचा संप्रदायच आहे:-(१) 'आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा भगवंत वाचा त्याची ।' [तुकाराम-अभंग २१८९], (२) 'शिवे न तुझिया पदा अदयताख्य दोष क्षण ।' [मोरोपंतकेकावली-केका ४१]' (३) 'धना परिजना घरी तुमचिया उणें कायसें ?' [केका २३]. ४. दया+सत्+नद्या कृपा+-उत्तम+ नद्या दयारूपिणी सन्नद्या. यांत रूपक अलंकार झाला आहे. तृष्णा (तहान) भागविणे हे नदीचे काम होय, ते ईशदया करतें ह्मणून तिला 'सन्नदी' (चांगली नदी) अस ह्मटले आहे. देवाची दया किती अपरंपार आहे याविषयी पुढील इंग्रेजी कवितेचा उतारा वाचनीय आहे. तत्सन्मानार्थक महाराष्ट कवितेतील स्थळे बहुश्रुतांस सांगणे नकाचः Could we with ink the ocean fill, Were the whole world of parchment made, Were every single stick a quill Were every man a scribe by birth; To write the love of God alone, Would drain the ocean dry; Nor would the scroll contain the whole, Though stretched from sky to sky.