Jump to content

पान:केकावलि.djvu/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. देवाग्नि जठरी अतिक्षुधित, त्यास हे अन्न द्या; वितृष्ण करिती श्रितां तुमचिया व्यासन्नद्या, ॥ १८ तुमचा) नसून माझाच होय. 'अहमेव हि दोपदूषितो भगवंस्त्वां समुपालभे मुधा ॥ रमणीविरहज्वरज्वलन्नमृतांशु कुमतिर्विनिंदति' ॥ ३३ (विष्णुलहरी) भाषांतर-'अजि अखिलहि दोषी मीच दोषी दयाळा! । सकळ विफळ तूझा हा उपालंभ केला ॥ सुतनुविरहतापें तप्त होऊनि देहीं। न ककुनि मतिमंदें निंदिजे इंदुतेंही' ॥ ( वामनशास्त्री केमकरकृत भाषांतर ) खोटा हा शब्द संस्कृत 'कूट' याचा अपभ्रंश आहे. हा कूटसाक्षी, कूटतुला, कूटकाम, कूटयुद्ध, कूटवचन इल्गदि शब्दांत स्पष्ट दिसतो. हजारों लोकांचे अपराध में पोट जिरविते तेच जर एखाद्याचे अपराध टाकू लागले तर तो पोटाचा दोष नाही. जसें निर्दोष अन्न असतां पोट त्यास आंत सांठवून पचविते; पण तेच आंबलेले असले तर लागलीच वांतीच्या रूपाने बाहेर टाकतें, हा दोष पोटाचा नसून त्या अन्नाचा. त्याप्रमाणे "माझे अपराधच असे विलक्षण भयंकर आहेत की तुझ्या क्षमेस ते पात्रच होऊ शकत नाहींत.” [य०पां०पृ० ९३.] १. कवि ह्याला एक तोड सुचवितात. ब्रजवासी जनांच्या रक्षणार्थ भक्षिलेला दावाग्नि अति भुकेला झाला असेल त्याला माझे अपराधरूपी अन्न द्या; म्हणजे दावाग्नीच्या पोटापाण्याचीही सोय होईल व माझ्या अपराधांचीही सोय लागेल. अग्नीने माझे अपराध जाळून भस्म करा-हा अर्थ. [तुमच्या] जठरी (पोटांत) दवाग्नि (गोकुळांत गिळिलेला वणवा) अतिक्षुधित (अत्यंत क्षुधेने व्यापलेला, फार भुकेलेला) [असेल] पुष्कळ दिवसांपासून भक्षावयास कांहीं न मिळाल्यामुळे फार क्षुधित झाला असेल, त्यास (त्या दवाग्नीला) हे अन्न (मदपराधरूप भक्ष्य, भोजन) द्या (खावयास घाला). २. [ही तोड मज अल्पमतीला बरी दिसली ह्मणून आपणांस सांगितली. आश्रितजनांचे मनोरथ पूर्ण करण्याच्या याहूनही चांगल्या शेकडों तोडी आपणामध्ये भरल्या आहेत-अशा भावाने परमेश्वराचें दयालुत्व रूपकालंकारानें वर्णित होत्साते कवि म्हणतात.] तुमचिया दयासन्नद्या श्रितां वितृष्ण करिती-असा अन्वय. तुमचिया (परमेश्वराच्या) दयासन्नद्या (दया+सत्+नद्या-कृपा+उत्तम, पवित्र+नद्या तुमच्या दयारूप उत्तम नद्या) श्रितां (आश्रितजनांला, ज्यांनी तुमचा आश्रय केला आहे त्यांला) [कोणत्या तरी तोडीने] वितृष्ण (तृष्णारहित, इच्छारहित, तृप्त, संतुष्ट, सफलेच्छ) करिती (करतात, आश्रितजनांचे सकल मनोरथ पूर्ण करून त्यांस संतुष्ट-निरिच्छ-करतात.) [यास्तव माझे अपराध जाळून टाकून, आपली दयानदी मजकडे वळवून मला सफलेच्छ-कृतार्थ-वितृष्ण-संतुष्टमानस-करा-अशी माझी आपणास प्रार्थना आहे. येथे ‘वितृष्ण' असा शब्द आला आहे, त्याचा अर्थ अन्य रीतीने केला तरी चालेल. तृष्णा आणि तृषा हे दोन्ही शब्द 'तृष्' (पिण्याची इच्छा करणे ) या धातपासन आले आहेत. या दोहोंचा प्रथमार्थ पिण्याची इच्छा ह्मणजे तहान हा आहे. यावरून येथे