Jump to content

पान:केकावलि.djvu/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. अजांडशतकोटि ज्या उदरिं सर्वदा नांदवा, न त्यांत अवकाश या ? स्थळ दिले तदा कां देवा ॥ १७ काय? मला कोडग्याला लाज कोठची वाटणार? ९. कोडगा, निर्लज्ज. आपल्या अपराधाचे आपणच आपल्या तोंडाने वर्णन करणे हे कोडगेपणाचे लक्षण. "कोटिगा हा शब्द मूळचा कोडगा या शब्दावरून भाषारूढीप्रमाणे वर्णव्यत्ययाने कवीने साधला आहे असे दिसतें:-'ड'च्या स्थानीं 'ट'चा समयविशेषीं अपभ्रंशेकरून वर्णव्यत्यय होत असतो. Max Muller's Lectures on the Science of Language [Vol 1, Grimm's Law. pp. 216-217 पहा.] या नियमावरून कोडगा यावरून कोटगा शब्द साधला आहे. जसे-सोडगा, सोटगा; घोडगा, घोटक; झोडगें, झोट; रोडगा, रोटगा; फोडणे, फुटणे; तोडणे, तुटणे; इत्यादि शब्दांमध्येही हाच नियम सांपडतो. कोटिगा यांत जो इकार दिसतो तो शुद्ध प्रासाकरितां कवीने घेतला आहे. व असा इकारागम करण्याची [मराठीत] अनुकूलताही पुष्कळ आहे; मारला, मारिला; खाणला, खाणिला; तोडला, तोडिला असा क्रियापदांच्या रूपांत तर इकारागमाचा नियम आहेच; परंतु ग्रंथभाषेत जेथे जेथे कवीस इष्ट दिसते, तेथे तेथे बहुधा सर्व जातींच्या शब्दांस असा आगम करण्याचा त्यांचा स्वेच्छाचार पुष्कळ आढळतो.” [य० पां०.पृ० ८९.] 'कोडगा' हा शब्द पंतांच्या काव्यांतून इतरत्रही आढळतो. 'बा कोडग्या मनाला विपयांची काय वाटती गोडी' (आर्याकेका ३३). ____१. अज (ब्रह्मदेव)+अंड(गोल)+शत (शंभर) कोटि ब्रह्मांडाच्या शंभर कोटि, अनंत ब्रह्मांडें. परमेश्वराच्या पोटांत अनंत ब्रह्मांडें वास करितात या लौकिक समजुतीकडे येथे कवीचें लक्ष्य आहे. भगवंताच्या पोटांत अनंत ब्रह्मांडे सांठविली आहेत असें पुष्कळ कवींनी वर्णन केले आहे:-(१) अनंत ब्रह्मांडें । एके रोमी ऐसी धेडें ॥ तो हा गवळीयाचे घरीं । उंबरा चढतां टेंका धरी ॥ [तुकाराम-अभंग १७४०], (२) अनंत ब्रह्मांडें ज्याचे पोटीं । तो हा सांवळा जगजेठी ।। काळी घोंगडी, काळी काठी । काळा दोरा कंठीं ॥ बोली महाराची थेट मराठी । इ० अमृतराय-दामाजीपंताची रसद, (३) अनंत ब्रह्मांडे उदरीं । हरि हा बाळक नंदा घरीं ॥ [तुकाराम-अभंग ३८०५.] कथासंदर्भः-कृष्णावतारी कृष्णाने माती खाल्ली की काय हे पाहण्याकरितां त्याला तोंड उघडण्यास यशोदेने सांगितले. त्या वेळेस तिला त्याच्या तोंडांत सर्व सृष्टि दिसली, ही पौराणिक कथा ही पंक्ति लिहितांना पंतांच्या मनांत असावी. मार्मिक नो. कांस मिल्टनच्या कवितेप्रमाणे पंतांच्या ह्या लहानशा काव्याच्या वाचनाने बहाविधा रमणीय व मनाला सुप्रसन्न करणाऱ्या कल्पना किंवा कथा सुचतात हा ह्या काव्याचा एक विशेष गुण होय. २. बाळगता, वागवितां. हा शब्द 'नंद्'=आनंद पावणे' ह्या संस्कृत धातूपासून झाला आहे. ह्याच धातूपासून 'ननांदृ' व त्यापासून 'नणंद' ( आनंद न पावणारी) हे शब्द निघाले. यावरून नणंदाभावजयांतील वैमनस्य शेकडो वर्षांपासून चालत आलेले दिसते. 'नांदवा' हे रूप आज्ञार्थासारखे दिसते, तथापि येथे, आज्ञार्थ नाही. का. मानकालच आहे. कित्येक ग्रंथांमध्ये अशा स्थळी नांदवां, करां, धरां इत्यादि प्रकारे अंत्य स्वर सानुनासिक करण्याचा संप्रदाय आहे, तो केवळ सदेहनिवारणार्थ असावा असे वाटते. ३. -५ मो० के०