Jump to content

पान:केकावलि.djvu/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोगा--- मोरोपंतकृत परंतु अपराध हा गुरु, म्हणोनि शिक्षा करी; असेचि धरिली नैयच्युतदमार्थ दीक्षा करी. ॥ सदैव अपराध हे रॅचितसे असे कोटि, गाँ! स्वयेंहि कथितों; नसे तिळहि लाज; मी कोटिगा.। १६ १. मोठा. 'गुरुस्त्रिलिंग्यां महति दुर्जरालघुनोरपि । पुमान्निपेकादि करे पित्रादौ सुरमंत्रिणि॥' इति मेदिनी. भगवंताला जरी 'लाजतोस कां' ह्या माझ्या उद्धट भाषणाने वाईट वाटले नाही, तरी हा मजकडून मोठा अपराध घडला खरा-असा अपराध मजकडून पुन्हा होऊ नये म्हणून भगवंताने मला शिक्षा करावी, मला ती मान्य आहे-असा भाव. २. नय-न्याय-त्यापासून च्युत-भ्रष्ट झाले जे-त्यांच्या दमार्थ--त्यांना शिक्षा करण्यासाठी. न्यायमार्ग सोडून चालणाऱ्यांस-अपराध्यांस-शिक्षा करणे हेही भगवंताचे कर्तव्यच आहे. तथापि दंडं भगवान् बिभर्ति धर्मस्य गुप्त्यै खलनिग्रहाय' असें भागवतांत आहे. [भागवत-१० स्कं० पू० अ० २६.] गीतेंत भगवंताचें असें वचन आहे:-'परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ॥' [अ० ४ श्लो० ८.] ३. अधिकारचिन्ह. एखादें व्रत आरंभिलें असतां तें समाप्त होईपर्यंत त्याच्या नियमाचे धारण करणे याला दीक्षा धरणे म्हणतात. यज्ञयाग सुरू केला असतां हस्तांत यज्ञकंकण बांधण्याची चाल आहे. त्या वेळेस कंकण हीच दीक्षा होय. ४. हातांत. आपला मी अपराध केला म्हणून आपण आपल्या हातांनी माझें शासन करणे युक्त आहे. 'अपराधी सेवक तरी, दंडावा स्वामिनेच हे युक्त' [आर्याकेकावली-गी० १९ पृ० २२०] ५. अशा प्रकारचे कोट्यवधि अपराध मजकडून नेहमी घडतात, त्यांची क्षमा करावी हेच भगवंतास उचित आहे म्हणून कषि प्रार्थना करितात. 'अपराध रचणे' असे म्हणण्यांत अपराधांचे बहुविधत्व कवीने व्यक्त केले. ६. 'कोटि अपराध रचितसें' इत्यादि लिहितांना पंतांच्या मनांत पंडितराजजगन्नाथविरचित 'करुणालहरी'चा २८ वा श्लोक घोळत असावा असा भास होतो:-'वचनैः परुपैरिह प्रभो यदि रोपं समुपागतोऽसि मे। मुखरं कृतकोटिकल्मषं करुणाब्धे जगतोऽपसारय ।।' [करुणालहरी-२८]. श्लो० ३० हा पाहण्यालायक आहे. 'पतितोऽप्यतिदुर्गतोऽपि सन्नकृतज्ञो निखिलागसां पदम् । भवदीय इतीरयंस्त्वया दयनीयस्त्रपयैव केवलम् ॥' [करुणालहरी-३०]. ७. गा! (अगा! प्रभो!) असे (अशा प्रकारच) पूर्वोक्त प्रकारचे) हे कोटि अपराध (हे कोटिशः अन्याय) सदैव (निरंतर, नेहमी, क्षणोक्षणी, पदोपदी) रचितसे (करितसे)-असा अन्वय. हे प्रभो! अशा प्रकारचे जे अपराध मी निरंतर करतो ते थोडे थोडके नाहीत, त्यांचे ढीग घातले आहेत, ते कोव्यवधि घडले आहेत. ८. [अपराध रचितों इतकेच नव्हे तर स्वयेंहि कथितों; आण यांत मला] तिळहि लाज नसे, अतएव मी कोटिगा खरा]-असा अन्वय. अपराध करतो आणि मीच आपल्या मुखाने ते सांगतो आणि पुनः ते अपराध तिळभरही लाज वाटत नाही. तेव्हां मी मोठाच कोडगा नव्हे तर