पान:केकावलि.djvu/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अहा ! निपट धृष्ट मी; प्रभुवरासि 'कां लाजसी ?' म्हणे, तुज नसो तशी विकृति, भाविकाला जशी. । नामक अलंकार होतो. उदाहरणे:-(१) देउनि सुतरत्न करी, घेउनि पतिचित्तवित्त ती गेली। नेत्रोदकें तिघांच्या गंगा गंगातटी नवी केली. ॥ [मोरोपंत-आदिपर्व-अ० १२ गी० ७०], (२) जाय पुरीप्रति जोडी अपकीर्ति, सुकीर्ति हातची दवडी । मातेप्रति पोर जसें मुद्रा हरवूनि मेळवुनि कवडी. ॥ [विराटपर्व--अ० ३ गी० ६०], (३) स्वामी पुण्य यश विपुल घेउनि हे म्यां तुम्हां धरा विकिली, । उघडील जी कपाट स्वर्गाचे ती जिवीं धरावि किली. ॥ [अश्वमेधपर्व-अ० ६ गी० ५९], (४) राज्ञी तूं आठवुनी क्षत्रियधर्मासि शोक हा टाकीं; । या आले यश घ्याया देउनि सर्वस्व लोक हाटा की ॥ (ऐषिकपर्व अ० ३ गी० २२) (५) मतलबी लोक आंवळा देऊन कोहळा काढतात. समाचा समानें, अधिकाचा न्यूनाने आणि न्यूनाचा अधिकानें विनिमय झाला असतां परिवृत्ति अलंकार होतो 'म्हणजे या अलंकाराचे समपरिवृत्ति, अधिकपरिवृत्ति आणि न्यूनपरिवृत्ति असे तीन भेद होतात. प्रस्तुत केकेंत अधिकाचा न्यूनाने विनिमय झाला आहे. असा प्रकार दुसऱ्या उदाहरणांत आहे. पहिल्या उदाहरणांत समाचा समानें विनिमय झाला आणि चवथ्या उदाहरणांत न्यूनाचा अधिकाने विनिमय झाला आहे. १. मागल्या श्लोकांत 'कां लाजसी' असे जे आपण भगवंतास म्हटले ते उद्धटपणाचे भाषण झाले, अशी शंका मनांत घेऊन पुढील सहा केकांत कवि भगवंतास प्रार्थना करितात. २. केवळ. मोरोपंतांनी हा शब्द आपल्या कवितेत पुष्कळदा योजलेला आढळतो, 'हानि पट' 'हा निपट' हे पंतांचें यमक तर प्रसिद्ध आहे. 'अभिषेकमह प्रोच्च जो इतर निपट तो खर्व ।' (दोहारामायण-द्वितीय ८२), 'मनांत सहजा दया निपट टाकिली काय जी।' (केका ८८), वनपर्व-अ० ४ गी० ११२; विराटपर्व-अ० २ गी० ३६). द्रोणपर्व-अ० ९ गी० ८, २१; अश्वमेध--अ० ५ गी० ३७; सप्तशती-अ० ६ गी० २९ इत्यादि स्थळांवरून 'निपट' शब्द पंतांच्या आवडीचा दिसतो. अहा! भगवंतास 'लाजतोस का' असे म्हणून मी केवढे दांडगेपणाचें वर्तन केले ! त्रयोदशभुवनें निर्माण करून ती आपल्या इच्छामात्रेकरून चालविणारा जो ईश्वर त्याला असे म्हणणे म्हणजे अत्यंत पृष्टता होय. यामुळे प्रभवराला राग आला की काय ही शंका मनांत घेऊन कवि पुढे तिचे समाधान करितात. पंडित जगन्नाथराय यांच्या 'विष्णुलहरीं' तील पुढील श्लोक याशीं सदृश म्हणून वाचनीय आहे. 'अपि शर्वपिता महादिभिर्भजनीयः पुरुषोत्तमोऽपि यः । तमुपालभमानमुद्धतं घिगिमं मां घिगिमां धियं मम' ॥ ३७ याचे भाषांतरः-'ज्यातें विरिंचि शिवमुख्यहि देव सारे। आराधितात पुरुषोत्तम तूं असारे ॥ त्या तूज उद्धतपणे कटु बोलिलों की। धिक्कार हा मजहि मन्मतिलाहि लोकीं ॥ ३. भाविकांला जशी विकृति (मनास वाईट वाटणे) [होते] तशी [विकृति] तुज (प्रभवराला नसो (नसावी, न होऊ)-असा अन्वय. ४. विकार, मनास वाईट वाटणे मजसारख्या भोळ्या भक्तांला. (केका २०.). मी जो तुझा भोळा भत्त या साल वाईट वाटले तसे तुझ्या मनास न वाटो.