पान:केकावलि.djvu/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत पडेल समजाविशी, तशि करोत; कां लाजशी? ॥ १५ डते) जन (भक्तजन). आपणास आवडते जे भक्तजन त्यांकडे. मजवर पूर्ण कृपा करून मला स्वतः कृतार्थ करावयाचे नसल्यास ते (माझ्या उद्धाराचें काम) भगवद्भक्तांकडे द्या. आपले जे प्रिय साधुभक्त असतील त्यांजकडे तरी माझ्या कामाचा हवाला द्या, हे काम त्यांजकडे सोपवा, साधुजनांनी मजवर कृपा करावी अशी त्यांस भीड घाला. ८. कार्याचा भार. 'हवाला' हा शब्द अरबी आहे. पंतांच्या ह्या काव्यांत आलेले परकीय भाषेतील शब्द 'केकावली'च्या आरंभी 'केकावलीची प्रस्तावना' यांत दिली आहे. पंतांच्या काव्यमहोदधींत परकी भातील पुष्कळ शब्द आले आहेत याचा हा दाखला होय. प्रस्तुत काव्य हे पंतांच्या काव्यांतील सर्व गुणांचे व रचनावैचित्र्याचे उत्कृष्ट दर्शक आहे. १. समजूत. भगवद्भक्तांकडे माझ्या उद्धाराचें काम आपण सोपविलें म्हणजे मग त्यांच्याने होईल तशी ते माझी समजूत घालोत, त्याचा बोभाटा तुम्हांकडे येणार नाही. २. लाजतां कां? संकोच कां करितां? साधुजनांकडे हवाला देण्यास मग कां लाजतां? हवाला देण्यास लाजू नका. इतकें स्वल्प मागणे मागितले असतां लाजण्याचे काही कारण नाहीं-असा आवार्थ. येथे कवीने भगवंताशी लडिवाळपणा करून आपला किंचित् रोषही दाखविला आहे. नामदेव, तुकाराम, एकनाथ आणि इतर भगवद्भक्त यांनी परमेश्वराशी प्रसंगविशेषीं लडिवाळपणा करून व असाच राग दाखवून आपलें भक्तिसर्वस्व प्रगट केले आहे. "मागल्या केकेंत 'तुमच्या मनांत मजवर पूर्ण प्रसाद करावयाचा नसला तर पूर्वोक्त इंद्रियपटुत्वादि जे दिले ते आटोपून घ्या' म्हणून कवीनें लडिवाळपणाने सांगितले, तो विध्याभास जाणावा. कारण या केकेंतील पहिल्या चरणांत दिलेलें परत घेतल्याने तुमची अपकीर्ति न व्हावी' या आशीर्वादात्मक स्वेच्छाप्रदर्शनेंकरून कवीने पुन्हा तो विधि लज्जेस कारण होय म्हणून निषिद्ध केला आहे; अत एव हा आशीर्वचनाक्षेप अलंकार होय. या अलंकाराचे लक्षण साहित्यदर्पणांत 'अनिष्टस्य तथार्थस्य विध्याभासः परो मतः' [साहित्यदर्पण-७१५] असें सागितले आहे.” [य० पां०-पृ० ८३-८४.] विध्याभास आणि आशीर्वचनाक्षेप हे अलंकार एकच होत. या केकेच्या द्वितीय पादांत कवीने आपली भगवचरणदर्शनेच्छा दाखविली आहे, परंतु ती सफळ होत नसल्यामुळे तिच्याबद्दल तिच्यापेक्षा न्यून (कमी) जी साधुसमागमेच्छा ती पुढील चरणांत व्यक्त केली आहे, म्हणजे येथे न्यूनाधिक योग्यतेच्या पदार्थांच्या अदलाबदलीचे वर्णन झाले आहे म्हणून हा परिवृत्ति नामक अलंकार होय. याचे लक्षण आणि उदाहरण:-(१) समाधिकानां न्यूनानां समन्यूनाधिकैः समम् । यदा विनिमयस्तत्र परिवृत्तिरलंकृतिः ॥ प्रीतिं दत्त्वा सरोजाक्षी जगृहे कामिनो मनः । तुलसीमंजरीमेकां दत्त्वा भेजुर्हरेः कृपाम् । दत्त्वा सुधामुचो वाचः कविभैजे कपर्दिकाम् ॥ १४७ ॥ [मंदारमरंदचंपू-पृ० १३७-१३८], 'न्यूनाधिकवस्तूंचा विनिमय जाह्मणति त्यास परिवृत्ति । तो एक बाण सोडुनि घेइ कटाक्षेचि शत्रुसंपत्ति ॥' (4) भावार्थ:-जेथें सम आणि सम, अधिक आणि न्यून, न्यून आणि अधिक, जापान पदाथाची अदलाबदल (विनिमय) झाल्याचे वर्णन असते तेथे परिवत्ति