पान:केकावलि.djvu/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. (मंगलाचरण.) सदाश्रितपदा ! सदाशिवमनोविनोदास्पदा ! खदासवशमानसा ! कलिमलांतका ! कामदा !। वदान्यजनसद्गुरो ! प्रशमितामितासन्मदा! गदारिदरनंदकांबुजधरा ! नमस्ते सदा.॥ (पदरजवर्णन.) पदाजरज जे तुझें सकलपावनाधार तें, . अघाचलहि तारिले बहु तुवांचि राधारतें। अजामिळ, अघासुर, ब्रजवधू, बकी, पिंगळा, ___ अशां गति दिली; उरे न तृण भेटतां इंगळा.॥ तुझ्या बहुत शोधिले अघनिधी पदाच्या रजें; न ते अनृत, वर्णिती बुध जनीं सदाचार जें। असे सतत ऐकते, सतत बोलते, मीच ते प्रमाण न म्हणों जरी उचित माझिया नीचते. ॥