पान:केकावलि.djvu/367

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जो सावध तोचि शुद्ध यश लाहे ॥ (हरिश्चंद्रा. ५-२५) (३) चारीही हय वेधिले ध्वज च्छेदूनियां पाडिला. ॥ (कुश.) (४) रागें वदतां झाली प्रकट च्छंदोमयी अशी वाणाः । (मंत्ररामायण प्राकृत); तसेंच भीष्मभक्ति. गी० ११ पहा.. (५) दीर्धास्तव हस्वः- (१) धर्ममतिला प्रजा तसि आवडते जेवि आइला दुहिता।। (आश्रम २-८३) (२) तो धृतराष्ट्र प्रमुख स्वगुरूते नमुनि जाय आजिकडे ॥ (अश्वमेध. ६-३२॥ (३) यज्जननीच्या होउनि दुग्धधिनें लोल वानिले कुशिला (द्रोणपर्व) ('कुशीला' हैं शुद्ध कृष्णविजय प्रद्युम्नाख्यानांत आढळतें) (४) ऐसें पुसतां मारुति सांगे तिस वृत्त सर्वही याच. " (मंत्ररामायण-सुंदरकांड ६५) (५) 'तीराला' बद्दल तिराला' हे रूप मंत्ररामायण प्राकृत ७।१७५ यांत आढळतें. (६) 'तूं' बद्दल 'तुं' हे हस्व रूप मंत्ररामायण प्राकृत ६७३८यात आढळतें. (७) गंगेमाजि उलूपी तापोनि उडी, जसी मगरि घाली ॥ (महाप्रस्थानिक १-२०) भ्रमतम रजकणवेची, वाणि न करि सत्प्रियतम रजकणवेची (कृष्णविजय पूर्वार्ध) ('वाणी हे शुद्ध रूप मदालसाख्यानांत आढळतें). (८) दाखविती तोक रिती, पूजुनि गुरुसा कृतार्थ वहु तो करिती॥ (कृष्णविजय) ['रीति' हे शुद्ध रूप भीष्मभक्तिभाग्य व उद्योगपर्व यांत आढळतें-रीति दहांची हे की पहिले समजाविती लहानातें—(उद्योग). कैची इतर जनीं ती जी दावी ज्ञानराशि शुक रीति? (भीष्मभक्ति)] (६) पुढे जोडाक्षर असून मागचे अक्षर द्वित्व होत नाही:-(१) मथिले त्वदनुजहि ह्मणत होते आह्मां रणांत न तरा जे. ॥ (गदा० २-७) (२) साधुनि देईन सख्या राया दुर्योधना जशी महिला. ॥ (कर्ण. ६-७.) (७) यातभंगः- (१) मागे सुधेविणे अज-रामरता केतुवास वरदा त्या ॥ (आदि. अ० ४) (२) शोधूं बरें करूं कर-णे तें न विचारिता नव्हे नीट.॥(आदि०३४-८०)(३)आश्रय देइल कशि मृग-पागस्कर मत्त सिंधुरा जगती ॥ (स्त्रीपर्व अ०५-१८)(४)असा करुनिया वरा दृढ विमार लंकापति- कुळांतक असें वदे कठिण की श्रुती कांपती ॥(कुशलवा ३.२०) (५) झाला तसा जसा सुनृ-पा पाहुनि दस्यु वचकला होतो. ॥ (ऐषिक. २-६) याची शोधक वाचकांस आणखी पुष्कळच उदाहरणे सांपडतील. विस्तारभयास्तव येथ जास्ता दिली नाहींत.. (८) यमकासाठी शब्दाची ओढाताणः-'अ'काराचा अशुद्ध लोपः- (१) गृध्राद्विज अनुजातें करूनियां ऽपांजलिप्रदान, मनी. ॥ (मंत्ररामा. किष्किंधा. १२१ । (२) 'असतो' स्तव 'अस्तो ' (द्रोण. ४-९७) (३) असला' स्तव 'असिला'.-खवळांच पीडकावरि पन्नग भोगार्धशेष जरि असिला ॥ (कर्ण. ३६-३१) (४) 'उरवी' स्तव 'उवौं'–तरि कुरुपांडव युद्धारंभ समय यश तिचे न तें उर्वी ॥ (कर्ण. ८-३१-१५) (५) 'जुन्या' स्तव 'जुनिया'. जो भावी अपकारा हृदयांत सदा नव्याचि सम जुनिया ॥ (आश्रम-२-९२) (६) 'जो' स्तव 'जा'. मामाजीस ह्मणसि, तें न ह्मण, ह्मण तयांसि आये आजावा॥ (आदि. ३३-७२) (७) 'ज्या' स्तव 'जा'. की त्या अयश नसावें, ह्मणती उचितज्ञ देव वीर जा ॥ (बालमंत्ररामा० ब २२)(८) 'ज्याला' स्तव 'जाला' ठाटि TH