पान:केकावलि.djvu/354

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जो देणारा विष्टपबाह्य विषयवास विप्रतापाते । होय स्वयेंचि तो तव तात विषय वासविप्रतापाते.॥ २० ॥ (महाभारतपर्व) प्रभुभाव असा गमला देय इला शाप हा तप सराया। हैं न बुडवितां येते सर्व इलाशाप हात पसराया.॥ २१ ॥ (स्त्रीपर्व ६-१२) शोभा सोडुनि होता शुद्ध वसंती करीरसा पार्थ। मग मंत्रातें व्हाया उद्धव संती करी रसापार्थ. ॥ २२ ॥ (विराट.६-१२३) ताप हरिल तव दर्शन सुखवुनि बहु मानसा धुनीजाचा; । की तो तूं सर्वखें कीजे बहुमान साधुंनी जाचा. ॥ २३ ॥ (शांति. ६-४८) काय इतर गज देता जंभारातीभ वाट वीरा या;। त्या सुज्ञा सेना बहुसंभारा ती भवाटवी राया. ॥ २४ ॥ (द्रोण. ११-४८) कार्णि ह्मणे पळ इकडे पाहुत सज्जन न पत्रिकेतुकडे.। चर्मापरि लिहिले की वपुचे मज्जननपत्रिके! तुकडे॥ २५ ॥ (द्रोण. ३-१३१) तसेंच द्रोण. ११-७९; १२-७६; १५-५८; १५-५९; १५.६३; १२-११४; १९-९१; ११-३३; १-६; ५-५३; १२-४४; १२-१८४; १३-१६. आदि. ११-८१; विराट. ३-९; सन्मणि. १००; वामनचरित्र १५०; १७४; शल्य. १-१६; ४-२१; स्त्री ४-५५; अनु. ३-२. पहा.