पान:केकावलि.djvu/353

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गमले दोघे हरिसे, मग भुलले पळ ससे समरसिकते। रक्ते न्हाले झाले बहु फुलले पळससे समरसिक ते. ॥ ३ ॥(शल्य.२-७८) जो काय सुरसदूषक अघ परिहरिता तसा चिकुर वाळी । निर्गर्व करुनि चुकला बहु परिहरितातसाचि कुरवाळी.॥४॥(उद्योग.८-७६) नरहरिनामा पावे संत न सोनार दास मान कसा ?।। तरला करुनि भवाचा अंत नसो नारदासमान कसा.॥५॥(सन्मणिमाला७६) काय उणे त्या, करि सश्रीकृष्णा जा निवास विप्राशी. । कर्णाहीं खस्तुतिस श्रीकृष्णाजानि वासवि प्राशी. ॥ ६ ॥ (द्रोण. ९-५) कथिलें कसें असें मज धर्मा! करवाल काढ कलहाते। मृत्युमुखी कुलकरगुणशर्माकरवालका ढकल हाते. ॥ ७ ॥ (द्रोण. ४-५ ) वळवावया करावें काय पतितपावना तप शुभ जने । द्रवला स्वयेंचि पशुपति देव अतितपा वनांत पशुभजने. ॥८॥ (अनु. ६-३९) राम ह्मणे 'धर्म वदसि गुरुचि महाजनक विप्र तारक हा । तरि तूं न ह्मणसिल कसा जरिहि महाजन कवि प्रतारक हा! ॥९॥(शांति.२ ४८) हे राजश्री व्हाया मम तोकांचा विनाश शिकले ते।। तपनालाहि गिळी जो तम तो कांचाविना शशिकलेते ?॥१०॥(स्त्रीपर्व५-५८) वृत्त कथुनि कविसि, ह्मणे, ती निष्ठरता पहा निरोपाची। छाया कराचि; न करो अति निष्ठुर ताप हानि रोपाची.॥११॥(आदि.१०-२८) दर्शन मोहाचा हो तुज, अंतर्हित परा शराचा हो;।। ऐसें बोलुनि झाला सुत अंतर्हित पराशराचा हो. ॥ १२ ॥ (द्रोण. ६-८५) जेंवि क्षम लीलेनें, सर्वपरमदा पिनाक, साराया; । नरचाप तसाचि परा, उग्र परम, दापिना कसा राया? ॥१३॥(द्रोण.१४-२१) दैता तुलाचि भजतिल, पळही पर, मानदा! न वसुधेते। वा ! पावेल, करुनिही कष्टा परमा न दानव सुधेते ॥ १४ ॥ (द्रोण.१७-३०) गोपीजन ठकवाया खाया नवनीत साय, कनकपटा। चालों देइल माझा, शिरतां अवनीत सायक न कपटा.॥१५॥ (द्रोण.२२-२) वत्सा ! मी केवळ रवि मम सर्व स्वच्छवि प्रवर दास;। खात्म्यापरीस बहमत मज सर्व स्वच्छ विप्र वरदास. ॥१६ ॥(द्रोण. ४.३२ पाहे हाहि पसरुनि प्रभुसि तपःपदर विप्र भव्यास। झाला सुत सुज्ञ अजर अमर तपःपद रविप्रभ व्यास. ॥१७॥ (अनु. ६-५६) इंद्र ह्मणे तव गुरुतें जाणे बहुधा कवि प्रयास महा। करिती पवितीव्रत्वें, याचा बहु धाक, विप्र यासम हा.॥१८॥ (अश्व.१-११७) आभीर म्लेंच्छ करिति विपदुदया लूट जीत नय नाहीं। येतें कयूं पृथेचा क्षम सुदयालूटजी तनय नाहीं. ॥ १९ ॥ (मौसल. २-७१)