Jump to content

पान:केकावलि.djvu/352

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४५) झाला हरिसहि पढवुनि नयशोभाजनक विप्रसा दाने । केला कोण शिवाच्या न यशोभाजन कवि प्रसादाने. ॥६७॥ (अनु. ३-४२) यादव ह्मणति, ‘दवानळ दुर्वासा; हे लता पहा, काय । या उग्र ग्रीष्मी हे दुर्वा साहेल ताप हा काय ? ॥ ६८ ॥ (अनु. ७-५२) स्त्रीचेहि अतिथिला दे सक्तु सुबाहुमान सत्व राखाया। तो त्या क्षुधिताचे करि सक्तु सुबहु मानस त्वरा खाया.॥६९।।(अश्व.७-१३) संती श्री सुरतरुचें नवि नवि लक्षि प्रसून हित याची। मग सक्तु द्या ह्मणुनि कां न विनविल क्षिप्रसूनहि तयाची.॥७०॥(अश्व.७-१६) आलि ह्मणे गे! कुमुदिनि ! वैराटि! कलाप हा, सुखेव द्या । करुनि द्याया येतो, वैरा टिकला पहा, सुखें वद या.॥७१॥(आश्रम.६-२०) पाहे प्रणता तोका न व्यास महाकवि प्रसादास। विप्राच्या दे न करी नव्यासम हाक विप्र सादास. ॥ ७२ ॥ (वर्गा.२-४१) करीत होती तेथेंच नवसा गरती रती। पावे त्यापासुनि चिंतानवसागरतीर ती. ॥ ७३ ॥ ( कृष्ण. ५५ ४३ ) दयाघने जरी केला परिहास त्यजावया,। गर्वास हेतु तापाही परि हा सत्य जावया. ॥ ७४ ॥ (कृष्ण. ६०-६) दीनावनें होय साधुवाद, या लोक लागती.। मातेशी बाळ करितो बा! दयालो! कलागती. ॥७५॥ (विठ्ठलविज्ञापना ६४) ह्मणे जना 'भव सुखें तर वारकरी तसे। जे शत्रु तच्छिरी उग्र तरवार करीतसे. ॥ ७६॥ (पुंडरीकप्रार्थना २९) कपींस स्वर्ग रुचला न पुष्पकविमानसा। त्वद्यश प्रिय नाकींचें न पुष्प कविमानसा ॥ ७७ ॥ (रामप्रार्थना ३४ ) (दोहावृत्त) लाविति षडरिमुखासि हे संत मस, तप नसेच.। ऐसे इतरी नाशिति संतमस तपनसेच. ॥ ७८ ॥ ( सद्वर्णन ७) जो पापनगीं तृणसमी अनळसमान, सदार प्रभु संतांचे सेवितो अनळस-मानस दार. ॥ ७९ ॥ (सद्वर्णन १७) तसेंच सद्वर्णन १३, १६, २०, ३२; विठ्ठलविज्ञापना १०, ६३; पुंडरीकप्रार्थना २, ३० ३३, ३५, ३६; रामप्रार्थना १२, ३०, ३२, ३८, ३९; महालक्ष्मीस्तव ६; साधुरीति ४६; द्रोण. ६, २१; १५, ११०; १६. १२ स्त्रीपर्व ३, ४७; अनु. ८-८२; इ० पहा. (१०) लांब (अंत्य) यमकांची उदाहरणेः गेला मजही सोडुनि हाता पसरून कोप सारा या तव गुरुचि अगद जोडुनि हा ताप सरू नको पसाराया.॥१॥(अश्व.१-११८) समुपेक्षिले, ठकविले, पृतना महिमा नको पित्या, सहसा म्यां मारावे खळ ते कृतनामहि, मान कापित्यासह सा.॥२॥(द्रोण.२२-६)