Jump to content

पान:केकावलि.djvu/351

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९) संदष्टक यमकांची उदाहरणे: पावे, प्रसन्न होतां देव, सुदामा जिला, असी माते । श्री, कीर्तिहि, जरि अल्पचि दे वसुदामाजिला असीमातें.॥५१॥ (सन्मणि माला १८) साधु ह्मणावे ह्मणती नरमाधवदास साधु याला जे अतिसारी पट ज्याचे न रमाधव दाससाधुया लाजे. ॥५२॥ (सन्माणि. ६३) गावा, नच मानावा चोखामेळा महार सामान्य; । ज्याच्या करि साधूंचा चोखा मेळा महारसा मान्य. ॥५३॥ (सन्मणि. ७९) श्रीविष्णुसा न तारी जन काय ज्ञानदेव वेगाने ? । हा दे तें स्वर्गाच्या जनका यज्ञा न देववे गाने. ॥ ५४ ॥ (ज्ञानदेवस्तव १) श्रीराम ह्मणे, ‘मदधिक गुरुचरण, त्यजुनि काय निघसी ते'। लक्ष्मण, ह्मणे, 'भजावे गुरुचरण त्यजुनि काय निघ सीते!' ॥ ५५ ।। ___ (वनप. १०.६८) तुजविण न दीपिके ! सति ! कृष्णे ! तरतो नयज्ञहि तमातें। करितों जरि तरि गमता कृष्णेतर तो न यज्ञ हित मातं.॥५६॥ (वन.८-५४) कुरुसैन्यांत गमे ज्या परि रंभाकाननांत वारा हो। त्या विजयश्री देउनि परिरंभा कां न नातवा राहो ? ॥५७ ॥ (द्रोण. ३.८८) नुरवि, करुनि परकवचा अंगप तितऊ पलसमय मनिं भाने । भीमाने शर गणिले अंगपतित उपलसम यमनिभाने. ॥५८॥(द्रोण.१२-१३) हरहर ! जाणों चुरिला तो बाळ करणुनी चरणपाते। शिवशिव ! भरितिल की हो तो वाळक रेणुनींच रणपाते.॥५९॥(द्रोण.७-२३) जोडुनि गुण पार्थ करी कुरुसेनापाल-विप्र-कटकांता। की गुरुपराभवेंही कुरुसेना पालवी प्रकट कांता. ॥ ६० ॥ (द्रोण. ९-३३) न रणा तूं योग्य; ह्मणुनि 'हा ! केशवसारथे! रडायास. । काय भिवविशिल, देउनि हाके शवसार थेरडा,यास.॥६१॥(द्रोण.१७-५७) गमला हित ओगरितां कांजी मधु सूद नाकपाळाला । अर्थ तसा आला हे कां जी! मधुसूदना कपाळाला. ॥ ६२ ॥ (द्राणप जी वेश्या वुध वरिल त्यजुनि अमर्यादरा जनीं तीतें। भजतों अनीतितें हा त्यजुनि अमर्याद राजनीतीते॥ ६३ ॥ (उद्योग. ८०० न शिके त्याचा वोल न बाला, मंदार सावरिल काय । पतनेच्छुचा न, न वरिल बाला मंदा, रसा वरिल काय? ॥६४॥(शल्य.१-११) कृष्णा ! त्वत्सम तव कृत वर्णन भाचा परा सुकविता की। झाला घालाया धृतवर्ण नभाचा परासु कवि ताकी. ॥ ६५ ॥ (स्त्री.४-३९) भवदवन करित होता बहुभास्वर थावरुनि हात रणीं;। वाट जणों उतरला वहमा स्वरथावरूनि हा तरणी. ॥ ६६ ॥ (स्त्री.६-१