पान:केकावलि.djvu/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३२ ) कोणत्याही वृत्तांत कोणत्याही विषयावर काव्य रचणे हे त्यांना हत्तीला आपल्या शुंडादंडावर माळ झेलण्याप्रमाणेच सोपे वाटत असे. अशा रीतीने अनेकवृत्तांत पंतांनी प्रौढ, सुरस व विस्तृत काव्यरचना केली असल्यामुळे मुक्तेश्वरांतील व त्यांच्यांतील कविलासंबंधी अंतर अगदी कमी होऊन बरोबरी होते व महाराष्ट्र काव्यवधू आमच्या कविकुलगुरूचे अनेक गुण पाहून त्यांना माळ घालण्यास सज्ज होते. १० उपसंहार प्रकाश पटला ह्मणजे तेथें छाया असावयाचीच; त्याप्रमाणे पंतांचे वेळेस त्यांची कविता आवडीने वाचणारी (बारामतीस) रघुनाथपंत कोशे, पांडुरंगभक्त नारायणभट्ट, अनंत नारायण वावा, (इतर ठिकाणी) विठ्ठल गोसावी, सदाशिव गोसावी, काशिनाथवावा पाध्ये रामजोशी इत्यादि मंडळी होती, तद्वत् प्राकृत ह्मणून त्यांच्या काव्याची निर्भर्त्सना करणारी मंडळीही होती. त्यांच्या संबंधाने पंतांनी आपल्या काव्यांतून बऱ्याच ठिकाणी फटकारे दिले असून आपल्या काव्याविषयी अभिमानोक्तिही प्रकट केल्या आहेत (परिशिष्ट-ऊ). एके ठिकाणी पंत लिहितात: भक्तमयूरमनोनट नटतो सामान्य, की वरा नटतो,। श्रीरामचि हे जाणे, उरला व्यापूनि सर्वही घटतो. ॥ (राजापूर-२६) पंतांनी नामरसायनांत स्वरचित काव्यांपैकी आपणास जी उत्तम वाटतात, त्यांची नामावली दिली आहे. महाराष्ट वाचकांपैकी ज्यांना पंतांचे सबंध ग्रंथ किंवा त्यांचे अठरापर्व भारत वाचण्याची सवड नसेल त्यांनी तेवढी तरी काव्ये वाचावी ह्मणून त्यांची नावे पुढे दिली आहेत:-'हनुमन्नाटकाची बरोबरी करणारें' मंत्ररामायण, कृष्णविजय, 'मणिगणी खचित' प्रहादविजय, 'सुधानदीसदृश' कुशलवचरित, संशयरत्नावली, साधुसत्कार, केकावली, नामसुधाचषक, रामनामार्या, आर्यामुक्तामाला व नामरसायन. अशा रीतीने आपुल आयुष्य महाराष्ट्रकवितेची अभिवृद्धि करण्याकडे खर्च करून पंत आपल्या वयाच्या ६५ व्या वर्षी शके १७१६ (चैत्र शुद्ध १५) आनंदनाम संवत्सरीं ह्मणजे इसवी सन १७९४ त मरण पावले. शेवटी, पंतांनी मागितलेला पुढील वर त्यांना मिळावा ह्मणून त्या सच्चिदानंद परमेश्वराची अनन्यभावें प्रार्थना करून आह्मी पंतांच्या ह्या अल्पचरित्राची येथेंच इतिश्री करितों: बोलूनि डोलवू हा, डोलवितो जैवि रसिकशिर कीर; मग चिंता काय ? जडा वाटो याची सदैव किरकीर. ॥ (सन्मनोरथ. २७) भेटो रसिक, लवहि जो ग्रंथी चषकांत नूरवि, प्राशी,। ऐसा वर दे वरदेश्वरचरणा ! या मयूरविप्राशी. ॥ (नाससुधा. १२०) नाडायवट की मजाक मजा व पेड, को न