________________
( ३१ ) भारताची चार पर्व उत्कृष्ट साधली असून आदिपर्व तर सर्वोत्कृष्ट आहे. भारतांत पुष्कळ ठिकाणी त्यांनी आपल्या पदरच्या कल्पना व मूळांत ज्यांचा मागमूसही नाही अशी अपूर्व वर्णनें रचिलीं आहेत ती फारच गोड अतएव रसिकांस तल्लीन करून टाकणारी आहेत. ह्मणूनच पंतांनी सन्मणिमालेत मुक्तेश्वराविषयी लिहितांना पुढील प्रमाणे आनंदोद्गार काढिले आहेत: श्रीमुक्तेश्वर कविवर, यातें कोण न शुभेच्छु वंदील ?।। वंदी लक्ष जयाचे, ज्याचे यश भव्य जेविं मंदील. ॥ ३२ ॥ मुक्तेश्वराची भाषा साधी, गोड व सरळ आहे; पंताची ऐटदार, पांचापेंचांनी भरलेली व खुबीदार अशी आहे. पंतापेक्षां मुक्तेश्वर अधिक सात्विक व भावार्थी दिसतो. पास, यमक श्लेष इत्यादि शब्दालंकार मुक्तेश्वराच्या काव्यापेक्षा पंताच्या काव्यांत पुष्कळच अधिक आहेत ह्मणून त्याचे काव्य समजावयास साधारणपणे कठिण आहे. मुक्तेश्वराची भाषा साधी व सोपी असल्यामुळे त्याचे काव्य वाचकांस समजण्यास सुलभ जातें; व ह्मणूनच ते लोकादरास जास्त पात्र झाले आहे. जरा निराळ्या त-हेनें ह्मणावयाचे ह्मणजे मुक्तेश्वराचें काव्य द्राक्षापाकाच्या वर्गात मोडणारे असून पंताचें काव्य नारिकेलपाकाच्या वर्गात मोडेल. दोघांचीही काव्यें रुचिपरत्वे लोकांस कमी ज्यास्ती आवडतील, तरी मुक्तेश्वराच्या काव्याचा रसखाद सुलभ रीतीने मिळण्याजोगा असल्यामुळे तिकडेच बहुजनसमूहाची प्रवृत्ति झाल्यास त्यांत नवल नाही. परंतु मांडवावर पक्क व मधुर द्राक्षांचे घड लोंबत असले तरी माडावर चढून नारळ काढण्याचे परिश्रम ज्यास करता येत असतील असे लोक जसे ते नारळ सोलून फो डण्याचे श्रम पत्करून नारळांतील पाणी व खोबरें खाण्यांत आनंद मानतात तद्वत् संस्कृत शब्दांचा ज्यांस परिचय असून समासांची मोडणी व मोरोपंताची पद्धति थोडीशी तरी ठाऊक असेल अशा लोकांस पंताच्या काव्यवाचनापासून निःसंशय मोठा आनंद होईल. 'खेड्यांतल्या श्रीमंत पाटलाची शहाणी आणि भावार्थी वायको, आणि शहरांतल्या साधारण कारकुनाची हुशार आणि पक्की वस्ताद बायको ह्यांच्यामध्ये में अंतर असते, तें मुक्तेश्वर आणि मोरोपंत ह्यांच्या काव्यांत दिसून येते' असा एका मार्मिक टीकाकारांनी अभिप्राय दिला आहे त्यांत पुष्कळ तथ्य आहे. ओवी छंदांत जशी मुक्तेश्वराला उत्कृष्ट कविता करितां येत होती तशी श्लोकवृत्तांत करितां येत नसे. मुक्तेश्वराने श्लोकवृत्तांत रामायण रचिले आहे. त्यांत ओवी छंदांत प्रसन्न व प्रफुल्लित दिसणारी त्यांची कवित्वस्फूर्ति या विकट छंदोबंधनांत सांपडल्यामुळे की काय अत्यंत म्लान झालेली दिसते. त्यांत हस्वदीर्घादि चुक्या, यमकास्तव शब्दांची ओढाताण, यतिभंगादि इतर छंदःशास्त्रीय व व्याकरणांतील दोष बरेच आढळत असून ते बऱ्याच ठिकाणी दुर्बोधही झाले आहे. याच कारणास्तव हे काव्य बरेंच नीरस वाटते. मोरोपंताचा असा प्रकार नाही. त्यांना आर्या जशा उत्कृष्ट रचितां येत असत, जवळ जवळ तितक्याच चांगल्या त-हेने त्यांना भिन्न भिन वृत्तांतील श्लोक, अभंग व ओव्या रचितां येत असत. पंतांच्या वाग्देवीला अनेक वन. रूपाने व अनेक बंधनें सांभाळून प्रकट होण्याची विलक्षण कसरत झाली असल्यामले लांब संस्कृत समासाच्या बळावर वाटेल तसे आपले अंग चोरावयास सांपडत असल्याम