पान:केकावलि.djvu/346

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट-हृ. मोरोपंताची यमकें. जी अक्षरें ज्या क्रमाने एकापुढे एक अशी एक वेळ आली असतात त्याच क्रमाने फिरून त्यांची आवृत्ति झाली असतां तेथें यमकालंकार होतो. यमकें दोन प्रकारची:-१ संयुतावृत्ति व २ अयुतावृत्ति. पहिल्यांत मध्ये इतर पदें नसतात, दुसरीत ती असतात. संयुतावृत्ति व अयुतावृत्ति यमकें ही पादाची (चरणाची), पदाची किंवा वर्णाची असतात. ह्मणजे संयुतावृत्ति पादयमक, संयुतावृत्ति पदयमक, संयुतावृत्ति वर्णयमक, अयुतावृत्ति पादयमक, अयुतावृत्ति पदयमक, व अयुतावृत्ति वर्णयमक असे सहा प्रकार होतात. तसेंच संयुतावृत्ति यमकाच्या तीन प्रकारांपैकी प्रत्येकाचे आदि, मध्य व अंत्य असे तीन उपप्रकार असून अयुतावृत्ति यमकाचे आदिमध्य, मध्यांत, व आद्यन्त असे तीन उपप्रकारं आहेत. असे एकंदर यमकाचे अठरा भेद झाले. प्रथम पादाचें तृतीय पादाशी यमक साधले असल्यास त्यास 'संदंश', द्वितीय पादाचें चतुर्थपादाशी यमक असल्यास 'संदष्टक', व प्रथमार्धाची द्वितीयाधांत आवृत्ति झाली तर 'समुद्र' अशी नांवें 'काव्यप्रदीपां'त दिली आहेत. पंतांच्या काव्यांत विशेषतः त्यांच्या भारत, कृष्णविजय व कुशलवाख्यानांत यमकांची गर्दी झालेली आढळते. त्यांची थोडी निवडक उदाहरणे पुढे दिली आहेत. (१) संयुतावृत्ति यमकें. (अ) संयुतावृत्ति आदिपदयमकें: जलजलसद्रम्यमुखी, नव नवनीतापरीस मृदुला हे। शिव ! शिव ! मजविण भीरू न वनवसति दुःख भोगणे लाहे. ॥१॥ (कुशलवा ख्यान २-४५) हा! सति ! हासतिरस्कृतचंद्रे ! तुज विकुनिही न घामेलों;। हा! तनय ! हातनय मी जोडुनिहि न या महा अघा, मेलों. ॥ २ ॥ हरिश्चंद्रा ख्यान २-६५) अहित अहि, तयां झाला विवर, विवर सांपडे दिले न रणीं;। महित महितळी झाले नमुनि न मुनिसुत हठी द्विषन्मरणी. ॥३॥ (आदिपर्व १६.३१) (आ) संयुतावृत्ति मध्यपदयमकेंः पुशी अवनिजा निजाश्रुसलिला- लिला; सुविकळा कळानिधिमुखी; ॥ उठूनि, नमुनीमुनीस मग ती, गती करि तदा तदाश्रमपदा.।।४॥कुश.५.११) भवाब्धि सुकवी कविप्रिय करी । करीशतम हा महादय हरी ॥ सुकीर्ति परमा रमाप मिरवी । रवीडितमहा महास्पद नवी. ॥ ५॥ (विचित्र रामायण १) (वरच्या दोन उदाहरणांत कवीने दाययमकही साधिले आहे. विचित्ररामायणांतील प्रत्येक श्लोकांत मध्यपदयमक व दामयमक ही विचित्र रीतीनें साधिली आढळतात.)