पान:केकावलि.djvu/345

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३८) ज्याचे पितीहि घटघट घटघट घडि घडि घरींहि अरि पाणी.॥१२॥(उद्योग.१०-७२) क्षतजप्रतिमाक्ष क्षितिनाथ क्षण न क्षमावशीं राहे. ॥१३॥ (कर्ण. ४०.४५) शापगुणझणत्कारें दिग्वारण मस्तकेंहि झणझणवी. ॥१४॥ (कर्ण. ४८-५१) नरवर गरधरखरतरशर करकर दांत खाउनी सोडी. ॥ १५ ॥ (शल्य. २.८४) ऐसें गर्जुन अर्जुन भरभर खरतर शरप्रकर सोडी. ॥१६॥ (अश्व. ५-६६) द्विज खरतरशरनिकरें निकरें करि अरिशरीर तक्षणही. ॥ १७॥ (कर्ण. ३६-३५) सूं सणणण सणणणणण वाजति शरनिकर कायहानिकर. ॥१८॥ (भीष्म. ३-५८) शुक पिक सकल कलकलस्वरें करुनि भोंवतीच आरडती । विविधपतगनिकररवच्छले करुनि भूमिभूलता रडती. ॥१९॥ (कुशलवा. ४-७७) यापरि अवार करि वरि खरतरशरवृष्टि, दृष्टि हरि त्यांची. ॥२०॥ (कर्ण. ३०-६४) संनद्ध युद्धबद्धश्रद्ध क्रुद्ध प्रसिद्ध विबुधारि. ॥ २१॥ (मंत्ररामा. ६.५८२) ते दुंदुभि वाजविती धिमिधिमिधिमि देवलोक आनंदें,। गंधर्व करिति तननन तत्थैथैथय्य अप्सरोदें. ॥ (मंत्ररामा. ६.५९५) (आ)अनुकरणवाचक शब्दः-हा ध्वनि साधण्यांत 'कचाकच' (द्रोण. १२.१६३), 'करकरा' (कर्ण. १७.२५), 'खळखळा' (सभा. ६.८८), 'खदखद' (सभा. ३.३५), 'घटघट' (कणे. ४६.५८), 'चरचरा' (कर्ण. ४५.१४), 'झटझट' (सभा. ५.८९), 'डरडरा' (सभा. २.२५) 'परपर' (द्रोण. ११.११०), 'फरफरा' (सभा. ५.७), 'भरभर' (अश्व. ५,६६), इत्यादि पुष्कळ अनुकरणवाचक शब्दांचे पंतांना मोठे साह्य झाले असून त्यामुळे काव्यरसपाकही ज़मंग उतरला आहे.