Jump to content

पान:केकावलि.djvu/344

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३७ ) शंकरेशान शशिचूड शितिकंठ शिव शर्व शाश्वत शरण्येश शंभो ! भाललोचन भुजगभसितभूषण भवानीश भवभीतिहर भद्रभजना! गरलगल गुहगजाननतात गोवाह गीर्वाणगणगीतगुणभाजना ! ॥ ३३ ॥ ___(मोरोपंतकृत, स्फुट काव्ये भाग १ पृ. ३७१ समग्र पद पहा.) वाल्मीकिकृतिखकथा केवळ कल्याणराशि कुशलवती ॥ ३४ ॥ (दशम स्तोत्ररामा. ७७) दामोदर दासा दे अनुमोदन ती हरावया नवरी;। दादास देव दावी दारकरीति स्वयें सदैव वरी.॥ ३५ ॥ (कृष्ण. ८६-१७) या तेजा भजतों तरि कुरुकुळ वृक काक कंक कां खाते?॥३६॥(स्त्री.६-६०) मधुनिलय मधुवनातें मदुनि मनुवंशमानवेशाला ॥३७॥ (मं.रा.सु.३४८) रक्षोराज क्षोभे मारीचा राक्षसा पुढे प्रेषी. ॥ ३८ ॥ (दीर्घरामायण २६) , झाली सीता भीता, दीरा वीरा ह्मणे पतिप्राण । रक्षी, लक्षी धर्मा, साधो ! बाधो न भी करि त्राण. ॥ ३९ ॥ (दीर्घरामा.२९) अंभोदसंनिभ सुभग भावुकजनभव्यभाग्यभर भोळा । भासे उभा शुभाशय शयविधृतनितंबबिंब हरि डोळां ॥४०॥ (आर्याके.५२) हा कल्पपादपाचा रोपा, लसलसित कोवळा, झोंपा;। याच्या आंगीं खोपा, घेती सनकादिहंस सुखझोंपा. ॥४१॥ (आर्याकेका ५४) (२) अर्थानुरूपध्वनि. (अ) काव्यछंदांतील ध्वनि अर्थाचा प्रतिध्वनि असावा हे पाश्चात्य व पौर्वात्य काव्यशास्त्रज्ञांस संमत असलेले तत्व मोरोपंतासही मान्य होते असे दिसते. अर्थाप्रमाणे शब्दरचना कोमल, कठोर, मृदु, मधुर, तीक्ष्ण असावी ही गोष्ट पंतांस चांगली अवगत होती. याची थोडींशी उदाहरणे खाली दिली आहेतः गोपशिशु ह्मणति, 'पलिसा ललतां हलिनेचि झालिला पाय,। गाला उलोनि पलला, सल्व खलें, नवल कलितसा काय?' ॥१॥ (हरि श. १३-९) समजावुनि त्यांसि ह्मणे, 'ऐसें लालिंचलासि मालीन । कां ललतां आललतां पलतां मी सागलांत तालीन.' ॥ २ ॥(आदि. ३०-३२) कलचलनाला ललतां झालित असतां कुमाल बहु आललतां, सकतास उघल घलला पदनखलस्पल्स, तोचि हा घलघलला. ॥३॥ (कृष्ण.७-९) प्रस्फुरदधरदल प्रभु बलभद्र ह्मणे 'खरेंचि सांगारे!' ॥४॥ (कृष्ण, ८६-३९) खरतर नरहरशर परजीवन एकक्षणींच संहरती. ॥५॥ (वन. ३.७) होती शब्द खणखण व्योमी उडती तुटोनि खंड सणसण. ॥६॥ (प्रहादविजय१) तेव्हां दांत करारा चावी, फिरवी सुरारि नेत्र गरारां. ॥ ७ ॥ (प्रहादवि. ३-११) जरि न वळतें विशृंखळ खळखळ खळरक्तपूर वाहवितो.॥ ८॥ ( वन. २-३३) तेव्हां स्तविति खळ खळां, गळति खळखळां सुसाधुनेत्रजळें ॥ ९॥ (सभा.६-८८) चोळी खळांतकर कर, करकर रद खाय, हाय हाय करी. ॥१०॥(आदि.२९-१४) गाजत, वाजत, साजत, आज तया जतन करुनि आणा हो! ॥११॥ (विराट.६-७५)