Jump to content

पान:केकावलि.djvu/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३० ) प्रसाद व माधुर्य हे गुण उत्तम नजरेस येतात. शृंगारवर्णनांत वामनाचे पंतापेक्षा तादात्म्य जास्त होत असल्यामुळे रासक्रीडा, रुक्मिणीविलास इत्यादि शृंगारिक काव्यांत पंतांच्या प्रासंगिक शृंगारवर्णनापेक्षा पुष्कळपटीने जास्त रसोत्पत्ति झाली आहे. भक्तिरस व वीररस यांच्या वर्णनांत जसे पंत तद्रूप होतात तद्वत् अद्वैतप्रतिपादन व शृंगाररसवर्णन या गोष्टींत पंडित तन्मय होऊन कमाल करितात. पंतांचा शांत पण तेजस्वी खभाव जसा त्यांच्या काव्यांत प्रतिबिंबित झाला आहे तसाच वामनाचा रंगेल व आनंदी स्वभाव त्याच्या काव्यांत दृग्गोचर होतो. पंडितांच्या काव्यांत ध्वनिकाव्य मुळीच नाही पण पंतांच्या काव्यांत ध्वनिकाव्य बरेंच दृष्टीस पडतें (पृ० १६०-१६१). यमकरचनेचा कित्ता पंतांनी पंडितांपासून उचललेला दिसतो, तरी या कामांत शिष्याने गुरूवर ताण केली आहे. पंतांनी सगुणचरित्रंच विशेष वर्णन केली असल्यामुळे त्यांच्या काव्यांत अद्वैती पंडितांच्या काव्यापेक्षा जास्त सरसत्व व गुरुत्व आले आहे. पंतांची कविता फार शुद्ध असून त्यांत छंदोभंग, यतिभंग, व्हखदीर्घाकडे दुर्लक्ष्य, अग्राह्य समास व चुकीचे संधि हे प्रकार फार कमी असतात. पण पंडितांच्या काव्यांत असंगति, यमकास्तव शब्दांची ओढाताण, हस्वदीर्घाकडे दुर्लक्ष्य, छंदोभंगादि व्याकरणदोष 'पै,' 'झणि' इत्यादि पादपूरणार्थक अव्ययें इत्यादि दोषांची व्याप्ति बरीच मोठी आहे. पंतांच्या काव्यांत ज्याप्रमाणे वर्णनाची संगति, प्रौढ व झोंकदार भाषापद्धति, 'वव्हर्थ, जनमनोहर व स्वल्पक्षर' असें वर्णन, गांभीर्य, अर्थालंकार व शब्दालंकार यांची गर्दी वगैरे प्रकार आढळतात तसे ते पंडितांच्या काव्यांत दृष्टीस पडत नाहीत. पंतांचे शृंगाररसवर्णन मर्यादशील असते. पंडित शृंगाररसाच्या ओघांत वाहून कित्येकदा बीभत्सवर्णनरूपी कर्दमांत जातात. भक्तिरसवर्णन जरी पंतांना चांगले साधलें आहे तरी पंडितांचे अंतःकरण भक्तिरसवर्णनांत कवितेशी जसें सुलीनतेने तद्रूप वनून गारीगार होतें तसा प्रकार पंतांचा फारसा होत नाही. सारांश पंत व पंडित हे दोघेही आपआपल्यापरि श्रेष्ठ आहेत. काही गुणांत एक अधिक आहेत तर दुसऱ्या कांहीं गुणांत दुसरे अधिक वाटतात. तेव्हां एकंदरीत पाहतां दोघेही सारख्याच योग्यतेचे कविश्रेष्ट आहेत असें ह्मणावयास हरकत वाटत नाही. (उ) मुक्तेश्वर व मोरोपंतः-मुक्तेश्वराची वाणी मोरोपंताच्या वाणीपेक्षा अधिक प्रासादिक आहे. काव्यास अत्यवश्यक जी सहृदयता ती पंतापेक्षां मुक्तेश्वरांत जास्त हाता ह्मणूनच माधुर्य व प्रसाद या गुणांत मुक्तेश्वर दोघांत श्रेष्ठ ठरतो. त्यांस शृंगारादि सा रस उत्कृष्ट साधले असून त्यांच्या वाणीत मार्दव फार आहे. त्यांची वर्णन करण्याचा हातोटी इतकी खुवीदार व मनमोहक आहे की वाचकांपुढे ते ते प्रसंग प्रत्यक्ष दिसून त काहीवेळपर्यंत आपले स्वत्व विसरतात. अतिशयोक्ति व सृष्टिसौंदर्यवर्णन ह्या गोष्टीत त्याचा हात धरणारा महाराष्ट्रकवींत क्वचित् सांपडेल. त्यांनी भारताची पहिली चार पर्व ला असून पंतांच्या अठराही पवावर आर्या आहेत. या दोघां कवींची पहिल्या चार पचापुरता तुलना केल्यास मोरोपंतांपेक्षा मुक्तेश्वरांच्या काव्यांत ईश्वरीप्रसाद जास्त दृष्टीस पडून त्यांची काव्यप्रतिमा तप्तसुवर्णप्रतिमेप्रमाणे सर्वत्र उज्वल दिसते. मुक्तेश्वराचा