________________
२९८ मोरोपंतकृत चतुर्थचरणार्थः-मोराला मेघाचे स्मरण झाले म्हणजे तो जसा एकामागे एक टाहो फोडतो, त्याचप्रमाणे मोरोपंताने आपली आराध्यदेवता जो श्रीराम त्याचे स्मरण करून एकशे एकवीस श्लोक रचिले. मोर जसा एकट्या मेघाचे स्मरण करून तद्दर्शनार्थ उत्कंठेने टाहो फोडतो त्याचप्रमाणे मोरोपंत कवीने स्वोद्धारार्थ रामचंद्वाचे स्मरण करून हे एकशे एकवीस श्लोकांचे स्तोत्र रचिले. यासंबंधी पुढील गीति वाचनीय आहे:-'रामघनसत्प्रसादामृत जों जो बहु वळोनि वर्षतसे । तों तो भक्त मयूर स्वार्या केका करूनि हर्षतसे'. ॥ (विराट ७,३७) ६. हा श्लोक उपसंहारात्मक असल्यामुळे यांत कवीने काव्याची लोकसंख्या दिली आहे. स्फुट काव्यांत विशेषत: स्तोत्रांत पुष्कळदां पंतांनी अखेरच्या कवितेत ग्रंथसंख्या दिलेली आढळते, त्याचप्रमाणे त्यांनी येथेही केलेले आहे. ग्रंथ समाप्त झाला असतां शेवटचा श्लोक भिन्न वृत्तांत रचण्याची कवींची चाल आहे तीस अनुससन हा अंतिम श्लोक पंतांनी स्रग्धरा वृत्तांत रचिला आहे. ह्या पूर्वीचे श्लोक पृथ्वीवृत्तात्मक आहेत. स्रग्धरा वृत्ताचे लक्षण असें:--'युक्तं मरभनैवैश्च त्रिभिः सप्ताक्षरैस्त्रिभिः । छेदैश्च स्रग्धरावृत्तमेकविंशाक्षरं विदुः ॥ (सुवृत्ततिलक). काव्याचा शेवटचा एक तरी श्लोक अन्य वृत्तांत रचावा ह्याविषयी 'एकवृत्तमयैः पचैरवसानेऽन्यवृत्तकैः' अथवा 'सर्वत्र भिन्नवृत्तान्तैरुपेतं लोकरञ्जकम् । काव्यं कल्पान्तरस्थायि जायेत सदलंकृतिः ।।' [काव्यादर्श १-१९] असा नियम संस्कृत काव्यांत आढळतो आणि त्याचाच पंतांनी अवलंब केला आहे. शेवटल्या श्लोकाचे वृत्त भिन्न आहे आणि त्यांत ग्रंथसंख्या स्पष्टपणे दिली आहे यावरून हे केकावली'नामक स्तोत्र येथेच संपलें. केकावलीच्या कित्येक प्रतींतून याच्या पुढे आणखी दोन पद्यं लिहिलेली आढळतात. ती वरील कारणावरून व त्या पद्यांतील अंतःप्रमाणावरून मोरोपंतांनी लिहिलेली नसून केकाश्रवणानें हर्परोमांचित झालेल्या त्यांच्या कोणी तरी भक्ताने रचिली असावी. आमच्या रसिकवाचकांकरितां तीं पद्यं पुढे पुरवणी १ यांत दिली आहेत. इति श्रीमयूरपुराणे स्तोत्रखंडे केकावलिकाव्यं संपूर्ण.