पान:केकावलि.djvu/306

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २९७ त्याचे साचे स्वभद्रस्मरण, मग न तें त्या कसे ये कैवीस? केका, एका संख्यातें स्मरुनि, करि अशा एकशे एकवीस. ॥१२२ १. राममेघाचें. २. आपल्यास कल्याणकारक असें चिंतन, मांगल्यसूचक स्मरण. पहिल्या तीन चरणांचा अर्थः-(मयूरपक्षी) आकाशांत मेघ पाहून मोराला फार आनंद चाटून तो नाचूं लागतो. याचे कारण मेघ त्या पक्ष्यावर मोठी दया करून त्याला पिण्याकरितां जलवृष्टि करितो हे होय. म्हणूनच मयूर मेघाला आपला प्रियमित्र व नृत्य शिकविणारा गुरु मानतो. आणखीही मेघाचे मोरावर मोठे उपकार आहेत. जेव्हां मोर वनांत उन्हाने संतप्त होऊन तहानेने व्याकुळ होतो तेव्हां मेघच जलवृष्टि करून त्याची तहान भागवितो व उन्हाने झालेल्या तापापासून त्याचे रक्षण करितो; इतके जर त्या मेघाचे मोरावर उपकार आहेत तर मग त्या शहाण्या कृतज्ञ पक्ष्याला आपल्या स्वतःस कल्याणकारक असे त्या मेघाचे स्मरण कसे होणार नाही? अर्थात् होईल. (मोरोपंतपक्षी) भक्तवत्सल श्रीरामचंद्र हा भगवत्कथेत आनंदाने नाचणाऱ्या मोरोपंतावर अतिशय दया करणारा असून तो त्याची उपास्यदेवताही होय. आणखी तो रामचंद्र कसा आहे तर भक्त मोरोपंत संसारवनांत तापत्रयाने पीडित झाला असता त्याजवर अतिशय करुणा करून तो त्याचे रक्षण करितो. त्या श्रीरामचंद्राचे मोरोपंत कवीवर इतके उपकार असतां कवीला त्या आपल्या आराध्यदेवतेचे मांगल्यसूचक स्मरण कसे बरें येणार नाही? येईलच येईल. काव्यमांगल्यःया पद्यांत इष्टदेवतेचे स्मरण केले असल्यामुळे तें मांगल्यसूचक आहे. 'स्वीद्स्मरण' ह्या शब्दाने तर मांगल्य स्पष्टच सुचविले आहे. काव्याच्या किंवा शास्त्राच्या प्रारंभी मध्ये किंवा शेवटी मंगलाचरण करावे ह्मणजे त्यामूळे वीरपुरुष उत्पन्न होतात, आयुष्य वाढते व अध्ययन करणारे उत्तम वक्ते होतात असे भगवान् भाष्यकाराचे झणणे आहे. 'केकावलि' काव्यांत प्रारंभी, मध्यंतरीं व अखेरीस अशा तिन्ही स्थळी मंगलाचरण केले असल्यामुळे तें मंगलमय समजावें. भगवता भाष्यकारेण-'मंगलादीनि मंगलमध्यानि मंगलांतानि च शास्त्राणि प्रथंते, वीरपुरुषाणि आयुष्मत् पुरुषाणि भवंति, अध्येताराश्च प्रवक्तारो भवंति' (भट्टिकाव्य-भट्टाचार्याची आवृत्ति-पृ० ६५). याप्रमाणे काव्याच्या आरंभी मंगलाचरण करण्याची चाल बहुतेक सार्वत्रिक आढळते. काव्याच्या मध्ये किंवा अंती तसे केलेले फारसे आढळत नाही. आपल्या कवीचे हे काव्य स्तोत्ररूप असल्यामुळे सर्वत्रच मंगलप्रद आहे. ३. शहाण्या मोरास किंवा कवि मोरोपंत यास. ४. मोगचे टाहो, पक्षी प्रार्थनारूप श्लोक. संस्कृत भाषेत मोराच्या शब्दास केका म्हणतात, मराठींत त्याला मोराचा टाहो म्हणतात. केकांची आवली(पंक्ति) म्हणजे एकामागे एक मोराचे टाहो त्यांस केकावली म्हणतात. मोरोपंताने आपल्या नावाप्रमाणे आपल्यास मोर समजून दयाघन राम ह्यास उद्देशून जे एकामागे एक प्रार्थनारूप श्लोक रचिले त्यांस त्याने केकावली असे योग्य नांव दिले आहे. ५. रामसख्याला, किंवा मेघसख्याला.