पान:केकावलि.djvu/308

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलीच्या पुरवण्या. पुरवणी १. (श्लोक.) तनू भववनी त्रितापदवपावकें कावली, ___ म्हणोनि करुणस्वरें करि मयूर केकावली;' । दयाघन हरि त्वरेंकरुनि भावुका सारहा त्रिताप 'हरि, त्या गमे स्वजनमीनकासार हाँ.॥ (गीति.) ऐकुनि विश्व सुंखावे ज्या केकींचा अपूर्व तो टाँहो,। त्याला ईशकृपेने आयुष्याचा कधीं न तोटी हो. ॥ २ १. शरीर. २ संसारारण्यांत. ३. त्रिविधताप हाच दावाग्नि त्याने. ४. कासावीस झाली, पोळली. ५. मोर, (पक्षी) मोरोपंत. ६. केकांची पंक्ति-अर्थात्'केकावलि' नामक काव्य. येथें मयूर आणि केकावली ही पदें श्लिष्ट समजावी. प्रथमार्थाचा अर्थः-संसारवनांत फिरत असतां कवि मयूराचें शरीर त्रिविधतापरूपी वणव्याने भाजून तो कासाविस झाला तेव्हां त्याने दयाघन परमेश्वराने कृपामृतवृष्टि करून आपले पोळलेले शरीर थंड करावं म्हणून त्याची अत्यंत सद्गदित अंतःकरणाने एकामागून एक श्लोकरूपी टाहो फोडून प्रार्थना केली. ७. करुणामेघ. ८. भक्तास, अनन्यगतिकाला. ९. सार (तत्त्व)+हा (घातक) आत्मज्ञानरूप तत्त्वाचा नाश करणारा, आत्मज्ञानविघातक, भगवत्प्रेमरसनाशक. हा शब्द त्रितापाचें' विशेषण. १०. हरण करतो, शमवितो (त्रिताप) घालवितो. ११. त्या भक्ताला. १२. स्वजन (स्वभक्त, भगवद्भक्त)+मीन (मत्स्य)+कासार (जलाशय, तलाव)-स्वभक्तमीनांस तलावासारखा, १३. 'दयाघनहरि' यांत रूपक अलंकार आहे. द्वितीयार्थाचा अर्थः-दयाघन देवाने मयूर कवीचा टाहो ऐकताच कृपामृताची वृष्टि करून देवभक्तांच्या परस्पर प्रेमांचा नाश करणान्या विविधतापांचा नाश केला. देवभक्तांचा प्रेमसंबंध इतका सुदृढ आहे की भक्त आपणास मत्स्य मानून प्रभुला करुणाजलाने भरलेला तडाग समजतात. १४. सुख पावतें, आनंदी होते. १५. केकावलिरूप काव्याचा. १६. चमत्कारिक, पी न ऐकिलेला असा. १७. केकास्वर, करुणास्वर. १८. त्या या केकाला, केकावलिनामक काव्याला. १९. चिरकाल नांदो. गीत्यर्थः-ज्या 'केकावली' काव्यांतील करुणविलाप वाचून किंवा ऐकून विश्वांतील रसिक आनंदभरित होतात तें हैं 'केकावली' काव्य चिरकाल नांदो; अर्थात् रसिकलोक ह्या काव्यास निरंतर गावोत असा या पद्यांत कोणी भक्त भगवंताचा प्रसाद मागत आहे.