Jump to content

पान:केकावलि.djvu/305

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९६ मोरोपंतकृत होतां तापत्रयात त्वरित भववनी रक्षिता रानटाचा, । वनांत) तापत्रयात (कायिक-वाचिक-मानसिक दुःखांनी पीडित) होतां (झाला असतां) रानटाचा (रानांत राहाणाऱ्या मोराचा, पक्षी अज्ञ जनाचा) त्वरित (सत्वर येऊन) रक्षिता (रक्षण करणारा) [असा] कारुण्यांभोद (दयामेघ) राम (मयूर पक्षी मनोरम मेघ, मोरोपंत पक्षी उपास्यदेवता श्रीराम), मग (असे असतां) त्याचें (त्या घनाचे किंवा त्या रामचंद्राचे) साचें (खरोखर)स्वभद्रस्मरण (कल्याणकारी स्मरण) त्या कवीस (त्या शहाण्या मोराला, पक्षी त्या मोरोपंत कवीला) कसे न ये (कसे येणार नाहीं)? [यास्तव एक (एकट्या) सख्यातें (सख्या मेघाते किंवा सखा श्रीरामचंद्र त्याला) स्मरुनि (स्मरण करून) एकशे एकवीस केका (मयूरवाणी, किंवा केकारूप श्लोक) करि (करिता झाला). ५. प्रिय जे भक्त त्यांचा सखा, भक्तकनवाळु. येथे कवीने सावयव रूपकालंकार योजिला आहे. दाशरथि राम हाच करुणारसाची वृष्टि करणारा मेघ, व मोरोपंत कवि हाच मयूर. मोर मेघास पाहून आनंदाने नाचतो, कवि मयूरही रामकथाकीर्तनांत नाचतो. मेघ मोराविषयी अत्यंत सदय असून त्याचा गुरु (त्याला नृत्य शिकविणारा) आहे, रामचंद्र हा मोरोपंताचा गुरु (त्याची उपास्यदेवता) व प्रियसख (अत्यंत भक्तवत्सल) असा आहे. मेघ जलवृष्टि करतो, राम भक्तांवर कारुण्यवृष्टि करितो. तसेंच मोर हा रानट (रानांत राहणारा), मोरोपंत कवि हाही रानट (अज्ञानी). ६. गुरु सुद्धा. मयूरपक्षी गुरु म्हणजे शिकविणारा, मोरोपंतपक्षी-उपास्यदेवता श्रीरामचंद्र, 'गुरु' शब्दाचा अर्थ पिता होतो तेव्हां यांत कवीने 'राम' आपला 'गुरु' म्हणजे पिता देखील आहे (अर्थात् पित्याचें नांव रामाजीपंत आहे) असे सुचविलें. ७. मयूरा नटाचा नाचणाऱ्या मोराचा; (पक्षी) भगवत्कथाकीर्तनांत आनंदाने नृत्य करणाऱ्या मोरोपंत कवीचा. व्यु:-'मयूर' या संस्कृताचे प्राकृतांत 'मोरो' असें रूप आहे. मराठीत 'मयूर' शब्दास 'मोर' आदेश होतो. येथे पंतांनी आपल्या उपास्यदेवतेचें मयूरघनरूपकाने मोठ्या भक्तिपुरःसर स्मरण करून कविसांप्रदायानुरूप आपले नांवही युक्तीने सुचविले आहे. असा प्रकार पंतांनी जागोजाग केला आहे. पुढील उदाहरणे पहाः-(१) 'राघव करुणाजलधर अवलोकुनियां प्रसन्न नयनांहीं; । भक्तमयूरेश्वर बदनाचति. ज्यांला त्रिताप भय नाही.' ॥ [मंत्ररामायण-उत्तरकांड-गी० ४२६], (२) 'श्रम न घडतांचि वरगति निजगुणसक्ता जनासि दे राम । सरसिजलोचन करुणामृतघन सेवकमयर विश्राम.' ॥ [सन्नामगर्भरामायण-गी० ११०], 'एवं भक्तमयूरें श्रीमद्रामप्रसादघनपवौं, । केलें तांडव तोपें श्रीमद्भारततृतीयवनपवी.' ॥ [महाभारत-वनपर्व-उपसंहार.] १. आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक ह्या तीन तापाने पीडित. २. रानांत राहाणायचा (मोराचा); (पक्षी) अज्ञजनाचा (मोरोपंताचा).