पान:केकावलि.djvu/302

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २९३ क्षणांत पुरवील जी सकल कामना, मावली; । कृपा करिशि तूं जंगत्रयनिवास दासांवरी, तशी प्रकट हे निजाश्रितजनां सदा सांवरी. ॥ १२० दयामृतघना! अहो हरि! वळा मयूराकडे; मुखांत येवो, आले की सर्व पातकांचे भस्म करिते. वामनाने म्हटले आहे:-(१) 'न कळतां पद अग्निवरी पडे, न करि दाह असें न कधी घडे । अजितनाम वदो भलत्या मिषे, सकल पातक भस्म करीतसे.॥' [नामसुधा]. पंत म्हणतात:-(२) 'प्रभुनमनस्मरण पुनर्वसुपुष्यचि सर्वकार्यसिद्धिकर.' (स्तोत्र रामायण). भागवत द्वादशस्कंधांत शुकाचार्य म्हणतात:-(३) 'अविस्मृतिः कृष्णपदारविंदयोः क्षिणोत्यभद्राणि च शं तनोति । सत्यस्य शुद्धिं परमात्मभक्तिं ज्ञानं च विज्ञानविरागयुक्तम् ।।.' भगवद्भक्तवर्य तुकाराम म्हणतात:-(४) 'नाम घेतां उठाउठीं । होय संसारासी तुटी. ॥१॥ ऐसा लाभ बांधा गांठीं । विठ्ठलपायीं पडे मिठी. ॥ २ ॥ नामापरतें साधन नाहीं । जें तूं करिशी आणिक कांही. ॥ ३ ॥ हाकारोनि सांगे तुका । नाम घेतां राहों नका'. ॥ ४ ॥ (५) 'माझें मुख नामी रंगो सर्वकाळ । गोविंद गोपाळ रामकृष्ण. ॥ १ ॥ अबद्धं चांगले गाऊं भलतैसें । कळेल हे जैसे मायबापा! ॥ २ ॥ तुका म्हणे मज नलगे वांकडें । मी तुझें बोबडे बाळ तान्हें'. ॥ ३ ॥ (६) 'हेचि मागणे विठाबाई ! । पायीं ठेवोनीयां डोई. ॥१॥ शांति दया अंतःकरणीं । रंगो रामनामी वाणी. ॥ २ ॥ मूळ द्वंद्वाचे विघडो । निजानंदी वृत्ति जडो ॥ ३ ॥ तुका म्हणे हरी! । आतां आपुलेंसें करी'. ॥ ४ ॥ (७) 'नामावांचुनि मंत्र नाही त्रिभुवनीं । ऐशी बोले वाणी वेदशानी - ॥ १ ॥ पहा विचारूनि अनुभव तो मनीं । नका आडरानी झणी शिरूं। मामावाचनीयां तरलों म्हणती । ते आधी बुडती भवसागरी. ॥ ३ ॥ नामा म्हणे नाम ॐकाराचे मूळ । परब्रह्म केवळ रामनाम'. ॥ ४ ॥ १.माता. हा शब्द अत्यंत प्रेमाचा सूचक होय. तुकारामांनी व इतर भगवद्भांनी याचा आपल्या ग्रंथांतून वारंवार उपयोग केला आहे. जसे-'तूं माझी माउली तूं माझी साउली । पहातों वाटुली पांडुरंगे! ॥ २. स्वर्ग, मृत्यु, पाताल ह्या तिन्ही लोकांस व्यापणारा तूं किंवा जगत्रय हे ज्याचें निवास (=घर) आहे असा परमेश्वर. ही नामावली भगवंताप्रमाणेच आपल्या आश्रितजनांचा निरंतर सांभाळ करिते. ३. उघड, स्पष्ट. ४. निज-आपल्या आश्रितजनां-आश्रय केलेल्या लोकांस; ज्यांनी भगवन्नाम कंठीं धारण केलें आहे अशांस. ५. सांवरित्ये, सांभाळ करिते, नाश होऊ देत नाही. ६. प्रास्ताविकः-यांत आपल्यास भवसमुद्रांतून पार उतरण्याविषयी कवि आपल्या मयूर नांवास उचित अशी करुणास्वराने शेवटची प्रार्थना करितात. करुणा हेच कोणी अमृत तेणेकरून भरलेला धन (मेघ), दयारूप जलाची वृष्टि करणाऱ्या मेघा! हे कारुण्यांभोद! अन्वयार्थः-अहो दयामृतघना! (कृपाजलाची वृष्टि करणाऱ्या मेघा!) हरि ! (देवा !) मयूराकडे (मोराकडे; पक्षी, मोरोपंताकडे) वळा (मुरडा, मज मयूरावर आपल्या दयामृताची वृष्टि करा). शिशु (मूल) रडे (रडतें) तयासि २६ मो० के०