Jump to content

पान:केकावलि.djvu/303

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२४ मोरोपंतकृत रडे शिशु, तयासि घे कळवळोनि माता कंडे; । असा अतिथि धार्मिकस्तुतपदा ! कदा सांपडे ? (त्याला) माता (आई) कळवळोनि (मुलाच्या दुःखाने कळवळून) कडे (कडेवर) घे (घेते); धार्मिकस्तुतपदा! (धार्मिकांनी स्तविले आहेत पाद ज्याचे अशा देवा!) [तुम्हांला असा (माझ्यासारखा, जन्मदरिद्री) अतिथि (याचक, भिकारी) कदा सांपडे (कधी मिळेल ? कधी मिळणार नाही हा ध्वनि)? दासां (सेवकांना, भक्तांना) भवार्णवीं (संसारसमुद्रांतून) उतरितां (पैलतीरी नेत असतां) तुम्हां (देवा! तुम्हांला) जड (कठिण) न पडे (पडणार नाहीं). प्रथमचरणार्थः-अहो ! दयारूपी जलाची वृष्टि करणाऱ्या मेघा! देवा ! तुम्ही या त्रितापदवपावकानें होरपळलेल्या मयूरावर आपल्या दयामृताची वृष्टि करा म्हणजे त्याला त्रितापापासून कृपा करून मुक्त करा. मयूराला सुख देणारा मेघावांचून जसा दुसरा कोणी नाहीं, तद्वत् मयूरपंताचा उद्धार करून मला सुख देणाऱ्या करुणामूर्ते ! देवा! तुजवांचून दुसरा कोणी नाही. मेघमयूरांचा संबंध सेव्यसेवकाचा आहेः-वर्षाऋतूंत मेघ पाहून मोराला आनंद होतो व तो आपल्यासाठी मेघानें वृष्टि करावी म्हणून आक्रोश करीत असतो. मेघवृष्टीसारखी सुखप्रद गोष्ट मोराला दुसरी कोणतीही नसते. मेघवृष्टि व्हावयास लागली किंबहुना नुसतें मेघदर्शन झाले तरी मयूरास अतिशय आनंद होऊन तो त्या भरांत आपला चित्रविचित्र रंगाचा पिसारा डौलाने उगारून सुंदर नृत्य करितो, हे सुप्रसिद्ध आहे. अलंकारः- 'दयामृतधना' यांत रूपक आहे. ७. स.शब्द येथे श्लिष्ट आहे. हरि=१विष्णु, २ इंद्र. मेघवृष्टि करणे जसे इंद्राच्या स्वाधीन, तसे दयामेघाचा वर्षाव करविण्याचे सामर्थ्य भगवान् विष्णूच्या स्वाधीन. ८. मोराकडे, (पक्षी) मोरोपंताकडे. 'मयूर' शब्दावर येथे श्लेष आहे. स्वतःस मोर म्हणवून देवास मेघाची उपमा पंतांनी पुष्कळ ठिकाणी दिली आहे. केका ४५ पृ०१२१ टीप पहा. अतिम श्लोकांतील कारुण्यांभोद राम प्रियसख गुरुही जो मयूरा नटाचा' हा प्रथम चरणही ह्यासंबंधाने ध्यानात ठेवण्याजोगा आहे. १. (त्याच्या दुःखाने) दुःखित होऊन. द्वितीयचरणार्थः-मूल रडू लागले म्हणजे आईच त्याच्या दुःखाने कळवळून त्याला कडेवर घेऊन समजाविते, दुसऱ्या कोणाला मुलाची कीव येत नाही. सुंदर उपमाः-येथे दिलेला मातेचा दृष्टांत व्यावहारिक म्हणूनच सुविशद असून फार सरस होय. हा दुसरा चरण दृष्टांतरूप होय. हाच आशय साधुमुकुटमाण तुकाराम यांनी आपल्या एका अभंगांत वर्णिला आहे. तो वाचन पंतांचं म्हणणं वाचा मनावर चांगले ठसेल म्हणून तो आम्ही येथे देतो:-'माता कापी गळा । तथ का बाळा? ॥ १ ॥ हें कां नेणां नारायणा! मज चाळवितां दीना? ॥ २ ॥२. कडेवर,कमरवर ३. माझ्यासारखा, कवि मोरोपंतासारखा. तृतीयचरणार्थः-देवा! तुम्ही अत्या दानशील अशी उदार लोकांनी तुमची स्तुति केली आहे व मी पुण्यधनाचा लश सुद्धा ज्याच्या जवळ नाही असा जन्मदरिद्री याचक आहे. तेव्हां तुम्ही मजवर राखी