Jump to content

पान:केकावलि.djvu/301

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९२ मोरोपंतकृत मुंखी हरि! वसो तुझी कुशलधामनामावली, जावो. ज्ञानी किंवा पंडित फळाची इच्छा सोडून आपली सर्व कर्मजन्य पातकें ज्ञानाग्नीने जाळतातः-याविषयीं गीता अ० ४ श्लो० १९ यावरील ज्ञानेश्वराची पुढील टीका वाचनीय आहे:-'जया पुरुषाच्या ठायीं । कर्माचा तरी खेद नाहीं। फळापेक्षां कांहीं । संचरेना ॥१॥ आणि हे कर्म मी करीन । अथवा आदरिले सिद्धी नेईन । येणें संकल्पेंहि जयाचें मन । विटाळेना ॥ २ ॥ ज्ञानाग्नीचेनि मुखें । येणे जाळिली कमें अशेखें । तो परब्रह्मचि मनुष्य वेखें । ओळख तूं ॥ ३ ॥ आचार्यांनीही 'अमरुशतकांत' याप्रमाणेच दुरितदहन प्रार्थिलें आहे:-क्षिप्तो हस्तावलग्नः इ०' (अमरुशतक, श्लो० २) 'दुरित-पापाचरण, अर्थात् त्यापासून निष्पन्ने जें दुःखभोक्तृत्व तें आत्मबोधे-आत्मज्ञानेकरून जळोजळून जाऊ-अर्थात् दुरिताची स्वकार्यजननशक्ति न राहो; या शेवटील प्रार्थ. नेने तर कवीने आपले पातित्य सुचवून त्यापासून आपली मुक्तता करण्यास ईश्वरास सर्व प्रार्थनेचे रहस्य निवेदन केले असे येथे समजले पाहिजे.' (य० पां०-पृ० ३७२.) या व मागील केकेंत कवीने 'यति' येणारे प्रत्येक अक्षर सारखें जुळवून 'पुष्पयमक' साधिलें आहे. १. प्रास्ताविकः-यांत कवि भगवन्नाममाहात्म्य वर्णितात. देवा! आणखी एकच वर मी तुम्हांला मागतों तेवढा मला तुह्मी द्याच. अन्वयार्थः-'हरि! नमी कुशलधामनामावली (सर्व कल्याणाचें स्थान अशी तुझी सहसानामावली) मुखीं (तोंडांत) वसो (राहो)' [ती नामाव त जी मावली (माउली, मातुःश्री) सकल कामना साल (उशीर न लावता पुरवील (पूर्ण करील), तूं जगत्रय निवास (तिन्ही जगांस व्यापणारा असा तू) दासांवरी (सवकोंबर, भक्तांवर) [जशी] वेऽपा करिशि (दया करितोस), तशी हे (ही नामावली) निजाश्रितजनां (आपल्या आश्रित जनांस) सदा (निरंतर) प्रकट (उघडपणे) सांवरी (सांवरिते, रक्षिते, उन्मार्गवर्ती होऊ देत नाही). प्रथमार्धाचा अर्थः-देवा! भक्तांचे सर्व मनोरथ क्षणांत पूर्ण करणारी व सर्व सुखाचें आद्यपीठ अशी तुझी नामपंक्ति निरंतर माझ्या तोंडांत राहो. ही नाममाता अत्यंत कृपाळु आहे. हिची बरोबरी इतर माता करू शकत नाहीत. कारण प्राकृत माता मुलांचे सर्व लाड पुरविण्यास समर्थ नसतात, एवढेच नव्हे तर सलाड त्या पुरवितात ते पुरविण्यास त्यांना बराच वेळ लागतो. पण ही नाममाता रतकी सदय व समर्थ आहे की ती भक्तांचे सर्व मनोरथ एका क्षणांत पूर्ण करिते. भकांनी तिच्या जवळ इष्ट वर मागण्याचाच काय तो उशीर. मागितल्याबरोबर सर्व मनोरथ पूर्ण झालेच म्हणून समजावे. पंतांनी दहा स्तोत्ररामायणांत विष्णूची सहस्र नामें गोवून त्या स्तोत्राबद्दल आपली आदरबुद्धि प्रकट केली आहे. २. कुशल-सर्व ऐहिक आमुष्मिक कैवल्यप्राप्तीपर्यंत सुख त्याचें धाम-निवासस्थान अशी जी नामावली-नामपंक्ति. भगवन्नाममाहात्म्यः-परमेश्वराचे नामस्मरण सर्व प्रकारच्या सुखाचें घरच आहे. ते कोणत्याहि मिषाने