पान:केकावलि.djvu/299

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९० मोरोपंतकृत न चित्त भंजनी चळो; मति सैदुक्तमार्गी वळो; । स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो; काढिले आहेत:-'निंदतु नीतिनिपुणाः इ०.' याचें वामनी भाषांतर असेंः-'वानोत निंदोत सुनीतिमंत, । चलो असो वा कमला गृहांत । हो मृत्यु आजीच, घडो युगांती, सन्मार्ग टाकूनि भले न जाती ॥' 'कोणी निंदा कोणी वंदा । आम्हां स्वहिताचा धंदा ॥' असा उद्गार तुकारामांनीही काढला आहे. १०. नाहींशी होवो. १. ईश्वरभजनांत. 'भजनी (भगवद्भजनांत) चित्त (अंतःकरण) न चळो (चंचल न होवो) ईश्वरभजनांत माझें अंतःकरण स्थिर राहो. २. सजनांनी सांगितलेल्या मार्गात. 'मति सदुक्तमागौं वळो' याचा अर्थः-माझी बुद्धि साधूंनी प्रशस्त म्हणून दाखवून दिलेल्या मार्गाकडेच वळो. बुद्धीने प्रपंचममता सोडून साधूंनी उपदेशिलेल्या परमार्थाकडे वळावें. ३. आपलें तत्त्व. आपण कोण, कोठून आलों, कशाकरितां व कां आलों, कोठे जाणार हे तत्त्व. मनुष्य परमात्म्याशी असलेला आपला संबंध वारंवार विसरून अभिमानांत गुरफटतो. एका कवीने म्हटल्याप्रमाणे त्याला 'मी मी हेंचि कळे परंतु न कळे कोठील मी? कोण मी?' तर तसे न होता त्याला मी कोण व माझें कर्तव्य काय हे रहस्य कळून स्वतःची ओळख पटावी. आत्मबोधाशिवाय सर्व व्यर्थः-मनुष्य कितीही शास्त्रे ...पढो, कितीही तीर्थयाग करो, तसेंच अपरिमित द्रव्यसंचय करो तरी जोपर्यंत त्याला स्वतःची मोक्ति, किवा भाषण आपले कायुष्य व्यर्थ गमाविलें म्हणून समजावें, अशासारखे आर्यधर्मग्रंथापून पदशजागा उद्गार आढळतात. हा म म द्र -'हे प्रदीप संचिप 'उत्तारेच पहाः-(१) नानाशास्त्रे पढिन्नला । देवतीर्थे बहुत फिरला । आपणा न जाणता शिणला । मुक्त न होय निश्चयें. ॥ ४.६३ ॥ वधू सर्व अलंकार करी । नाहीं कुंकू गळसरी । तरी ते शोभा नसे खरी । विटंबनाचि जाणिजे. ॥ ६४ ॥ अळंकार कांहींचि नसतां । एक कुंकुंचि भाळी असतां । तेणें ते शोभा पावे पतिव्रता। श्रेष्ठ मानिती सुवासिनी. ॥ ६५ ॥ एक आत्मज्ञान जाणावें । तरीच सफळ होय आघवें । अनुभवावांचोनि न होय ठावें । निजात्मस्वरूप आपुलें'. ॥६६॥ (२) 'बहुत फेरे फिरोनी श्रम । नरदेह पर्वकाळ आला उत्तम । जाणोनि जो आत्मसंगम । स्लान करी निजउगमीं ॥ ४-१०५ ॥ लक्ष्य हेंचि दक्षणा । आत्माराम ब्राह्मणा । देऊनियां समाधाना। अपी आपण होईजे ॥ १०६ ॥ अहंदेहतर्पण । शुद्धक्रिये करूनि आचमन । आत्मारामी पूजन । सोहं मंत्र करावें. ॥ १०७ ॥ मन हेचि तुळशीदळ । 'सुमनशुद्ध परिमळ । अर्पूनियां निर्मळ । ब्रह्मरूपी समर्पण'. ॥ १०८ ॥ (३) नरदेहासारिखें रल । सांपडलें बहु न करितां प्रयत्न । येथे जो न करी यन । निजात्मधनप्राप्तीचा ॥ ५.५७ ॥ येथे जेणे आळस केला । तेणें आत्मलाभ दवडिला । जन्ममरण प्रवाही पडला । येरझार न चुके कदा'. ॥ ५८ ॥ (४) 'नरदेहासी येवोन । न घेई जो आत्मदर्शन । तरी वृथा जाण जन्मोन । निष्कारण होय पां. ॥ ५.५५ ॥ त्याहुनि पशू बरा । जो न करी आत्मविचारा । पशु ऋतुकाळी भोगी दारा। नर रमे नित्य गमनीं. ॥ ५८ ॥ वेदशास्त्र पठण करित । व्युत्पत्तिज्ञान सर्व जा