पान:केकावलि.djvu/298

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २८९ सदनिकमळी देडो; मुरडितां हटाने अंडो; वियोग घडता रडो; मन, भवच्चरित्री जडो. ॥ न निश्चय कधी ढळो; कुंजनविघ्नबाधा टळो; ११८ करणाऱ्या प्रकाशमान् प्रभो, आमची सकल दुरितें नाहींशी करून जें कल्याणकारक असेल तेंच आम्हांला दे), (२) 'असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माऽमृतं गमय'. (भावार्थ:देवा ! असत्यांतून सत्याची, अंधकारांत ज्योतीची, व नश्वरांत शाश्वताची ओळख मला करून दे.) १. सत् (साधूंच्या)+अंघ्रिकमळी(चरणकमळी) साधूंच्या चरणकमळी. २. दडून राहो, अर्थात् संसारदुःखभयापासून निर्भय होण्यास तेथें आश्रय करून असो. साधूंच्या चरणांचा आश्रय केला म्हणजे मग भवसागर तरून जाणे कठिण नाहीं. ३. मुरडून टाकिलें असतां, मागे परतविण्याचा कोणी यत्न केला असता. तृतीयचरणार्थः-माझें मन पंचविषयोपभोगांच्या गांजणुकीतून सुटण्याकरितां साधूच्या चरणांचा आश्रय करून लपून राहो; तसेच साधूंच्या चरणांचा आश्रय करून राहिलेल्या मनास विषयवासना बाहेर काढावयास लागली असतां तें तेथेच अडून राहो. ४. अडून राहो, आश्रय न सोडो. ५. साधूंच्या चरणांपासून वियोग. चतुर्थचरणार्थः-विषयवासनेने बळाने मनाला साधूंच्या चरणांपासून ओढून काढून त्यांचा वियोग केला तर त्याला अत्यंत दुःख होऊन तें फिरून तेथे जाण्याचा प्रयत्न करो. तसेंच साझें मन त णांत आसक्त किंवा लंपटगवान ब्रह्मदवारों का म हमा तुमच गुण MANSINE. तुमच्या "चारतात, यता समागमा तुकोबांनी एका ठिकाणी असेंच मागणे मागितले आहे. तें असेंः-'वारंवार हाचि न पडावा विसर । वसावें अंतर तुमच्या गुणी. ॥१॥ इच्छेचा ये दाता तूं एक समर्था । अगा कृपावंता मायबापा. ॥ २ ॥ लाभाचिया ओढी उताविळ मन त्या परि चिंतन चरणाचें. ॥ ३ ॥ तुका म्हणे जीवीं जीवन ओलावा । पांडुरंग द्यावा शीघ्र आतां ॥ ४ ॥' ७. निश्चय कधी न ढळो-साधूंच्या वचनावर जो एक वेळ विश्वास ठेवला तो मध्ये कसेही प्रसंग आले तरी ढळू नये, नेहमी सारखा, अचल व अबाधित राहावा. 'देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ॥' अशी तुकारामांनी वर्णिलेली निश्चयात्मिका बुद्धि राहावी. ८. हालो. ९. सत्कर्मास कुजन (दुर्जन) विघ्न करितात त्याची बाधा (पीडा). कोणी सत्कर्म करण्यास प्रवृत्त झाला असता त्याच्या का यति विघ्न करावें ही कुजनांची रीतच आहे. पुष्कळ लोक हाती धरलेले सत्कार्य या दुर्ज.. नांच्या निंदेस किंवा इतर अडथळ्यास भिऊन सोडून देतात. म्हणून कुजनविघ्नबाधा टळो दुर्जनांपासून होणारी पीडा आपण आरंभिलेल्या सत्कार्यास बाधक हो नये; असें येथे कवीने मागणे केले आहे. भावार्थ:-दुर्जनांनी वाटेल तशी आपली निंदा चा. लविली किंवा इतर विप्ने आणण्याचे आरंभिलें तरी त्यामुळे आपलें धैर्य कधीं खचं नये असें कवीचे हृद्गत म्हणणे असावें. भर्तृहरीने एका ठिकाणी धीर पुरुषाविषयी पुढील उद्धार