पान:केकावलि.djvu/297

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८८ मोरोपंतकृत कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो;। सद्गुरुवीण मोक्ष पावावा । हे कल्पांती न घडे ॥ ३ ॥.' तुकोबा म्हणतातः-(४) 'सद्गुरुवांचोनि सांपडेना सोय । धरावे ते पाय आधी आधीं ॥ १॥ लोहोपरीसाची न साहे उपमा । सद्गुरुमहिमा अगाधची ॥२॥.' विश्वेशस्तुतींत पंत म्हणतातः-(५) 'हरिती संत तमाते; संतत मातें तदीय संगातें । दे देवा ! प्रिय करिती सत्संगति जें, करी न गंगा तें' ॥ ७३ ॥ (६) नामदेव म्हणतात:-'संतचरणरज सेवितां सहज । वासनेचे बीज जळोनि जाय. ॥ १ ॥ मंग रामनामी उपजे आवडी । सुख घडोघडी वाढू लागे. ॥ २ ॥ भेदभ्रम आटे, आशापाश तुटे,। प्रत्यक्ष देव भेटे संतसंगें. ॥ ३ ॥ प्रेमें कंठ दाटे, आनंदपूर लोटे, । हृदयीं प्रगटे रामरूप. ॥ ४ ॥ नामा म्हणे सोपें साधन गोमटें । परि उपतिष्ठे पूर्वपुण्ये'. ॥ ५॥ (७) एकनाथ म्हणतात:-'संतचरणींचा महिमा । कांहीं नकळे आगमानिगमां. ॥१॥ ब्रह्मा घाली लोटांगण । विष्णु.वंदितो आपण. ॥२॥ शिव घेतो पायवणी । धन्य धन्य संत जनीं. ॥ ३ ॥ तया संताचा सांगात । एका जनार्दनी निवांत.' ॥ ४॥ (८) निळोबा म्हणतात:-'घडो त्यांचा समागम । ज्यांचे प्रेम विठ्ठली. ॥ १ ॥ . सहज त्यांच्या ऐकतां गोठी। परमार्थ पोटीं दृढावे. ॥ २ ॥ अनुतापासी दुणीव चढे । वैराग्य वाढे चढोवढी. ॥ ३ ॥ निळा म्हणे वाढे भाव । संचरे स्वानुभव निजांगी'. ॥४॥ ३. चांगल्या जनाची उक्ति, किंवा भाषण. प्रथमचरणार्थः-देवा! मला साधूंचा समागम निरंतर घडो; तसेंच सजनांचा उपदेश माझ्या नेहमी कानी पडो. याविषयी पुढील ऋग्वेदांतील प्रार्थना फार सर तद्वत् नाव कितीहीणेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः । स्थिरैरंगैस्तुष्ट . .. .. म० , मं. -'हे विश्वेदेवहो!/ जे चांगले असेल तेंच आमच्या कानी पडो, अभद्र न पडो; जे भद्र असेल तेंच आमच्या दृष्टीस पडो, अभद्र न पडो; आणि आमचे कान आणि डोळे हे सदैव आपआपली कामें करण्यास समर्थ राहोत. आणि देवांनी नेमून दिलेले जे शंभर वर्षांचे आयुष्य तें भरेपर्यंत आमची सर्व गात्रे स्वाधीन राहून आम्ही तुमची कीर्ति गातगात जगू असें करा.' (वे. य.) १. काळिमा, डाग, मळ. द्वितीयचरणार्थः-सजनांचा उपदेश ऐकल्याने माझ्या बद्धीला जो पातकाचा डाग लागला असेल तो निघून जावो. तसेंच ऐहिक भोग्यपदार्थ नाशवंत आहेत असें जाणून त्याविषयी माझें मन लंपट न होवो. पंचविषयांचा मला मोह न पडो. व्यंग्यार्थः-विषयपंचकाचा त्याग झाला ह्मणजे इंद्रियजय होऊन मन स्थिर होते. व तसे झाले ह्मणजे आत्मदर्शन होण्यास वेळ लागत नाही. २. झडून जावो; पूर्ण नाहींसा होवो. एकनाथाची पुढील सुंदर उक्ति वाचा:-'जेथे जेथें मन जाईल वासना । फिरवावें नारायणा हेचि देई. ॥ १॥ वारंवार द्यावा नामाचा आठव । कुबुद्धीचा ठाव पुसा सर्व ॥ २ ॥ भेदाची भावना तोडावी कल्पना । छेदावी वासना समूळकंद. ॥३॥ एका जनार्दनीं नको दजा छंद । रामकृष्ण गोविंद आठवावा. ॥ ४ ॥ ३. रूप, रस, गंध, स्पर्श व शब्द असे पांच विषय आहेत. ह्यांतील प्रार्थनेवरून पुढील वैदिक प्रार्थनांची आठवण होते:-(१) 'विश्वानि देव सवितर्दुरितानि परासुव यद्भद्रं तन्न आसुव' । (यजुर्वेद.) (अर्थ:-त्रिभुवनाला उत्पन्न