________________
केकावलि. २७१ प्रभो ! तुज न मोहिनी भुलवि; मोहिला तोहि ती त्यजी जन; नव्हे तशी, तुज तुझी कथा मोहिती; । सांगितला त्याचे वर्णन पंतांनी मोठ्या चटकदार रीतीने केले आहे:-'कमी वसा, नसो परमी लोचन, असा दयाधमी, । नमींहि मृषोक्ति न यो, शमी नांदा, शिरा क्षमावमी. ॥' [कृष्णविजय उत्तरार्ध-अ० ८७ गी० ६९]. ५. मोठ्या पंडिताला; वेदशास्त्रादि सर्व धर्मग्रंथांच्या परिशीलनाने ज्याची मति प्रबुद्ध झाली असून योग्यायोग्यविचार ज्याला उत्कृष्ट रीतीने करितां येतो त्याला. येथें 'पंडित' याचा अर्थ मोठा भगवद्भक्त, परमभागवतोत्तम असा करावा. पंडितः-'पंडित' शब्दाचा हाच अर्थ पंतांस ह्या स्थळी इष्ट असावा असे मंत्रभागवतांतील पंडित'शब्दाच्या व्याख्येवरून दिसते. ती व्याख्या अशी:-'गलिताहंकृति, जाणे बंधा मोक्षासि, अनुभवीं चढला, । तो पंडित; इतर नव्हे जरि पुष्कळ सर्व शास्त्रही पढला. ॥' [एकादश स्कंध-गी० ४००]. पंडित होण्यास प्रथम अहंकाराचें पतन होऊन जीवाला बंधन व मोक्ष हे कसे प्राप्त होतात ह्याचे ज्ञान झाले पाहिजे; तसाच पुष्कळसा अनुभवही आला पाहिजे. केवळ सर्व शास्त्र पाठांतर झाल्याने पंडितत्व येत नाही, ही गोष्ट किती बिनमोल आहे बरें !! भगवद्गीतेंत पंडित' शब्दाची व्याख्या वरच्यापेक्षा जरा निराळ्या त-हेची केली आहे. ती अशी:-'टाकूनि कामसंकल्प आरंभी सर्वकर्म जो, । ज्ञानाग्मिने कर्म जाळी ह्मणती तोचि पंडित. ॥ ४.१९ (वामनी समश्लोकी.) १. प्रास्ताविकः-या केकेंत कवि मोहिनीपेक्षां कथेच्या अंगचा एक विशेष गुण वर्णितात. २. भुलविते, मोहित करिते. अन्वयार्थः-प्रभो! (देवा!) तुज (तुला), मोहिनी न भुलवि (भुलवीत नाहीं, मोहित करीत नाहीं); मोहिला (महत केला) तोहि (तो सुद्धा) जन (मनुष्य) ती त्यजी (त्याग करिते); तुझी कथा तशी नव्हे [आणि] [तुझी कथा] तुज (तुला, देवाला) मोहिती (मोहून टाकित्ये); तूं निजानुभव (स्वतःचा अनुभव) पहा (विचारांत घ्या); जशी महौषधी (उग्र वनस्पती) पारदा (पायाला) बळें (बळाने) स्थिर करी, तशी कथा तुला बळें स्थिर करी], [असें] तुवां (त्वां) नारदा (नारदाला) कळविले (सांगितले). प्रथमार्धाचा अर्थः-देवा! तुमच्या मोहिनी अवताराने देवदैत्यांस भुलविलें खरें, पण तिने तुह्मांला कधी भलविले नाही. आणि ज्यांना तिने भुलविले (आपल्या नादी लाविलें) त्यांचाही तिने शेवटी त्याग केला व त्यांपैकी दैत्यांस तर तिने अमृताची लालुच दाखवून शेवटी फसविले, अशी ती विश्वासघातकी होय. तुझी कथा तशी विश्वासघातकी नाहीं. ती ज्याला मोहित करिते त्याचा ती शेवटपर्यंत सांभाळ करिते, त्याग करीत नाही. व आपल्या भजनी लागणाऱ्या मनुष्यांस ती अभीष्टप्राप्तीच करून देते. त्याशिवाय तुमची कथा तुम्हांला स्वतः मोहित करिते. ३. मोहित केलेला, भुलविलेला. ४. त्या प्रकारची, मोहिनीप्रमाणे. ५. मोहित करिते, वश करिते. भगवत्कथा भगवंताला तल्लीन करून सोडिते, भगवान् स्वकथाश्रवणाने अत्यंत संतुष्टचित्त होतात-हा अभिप्राय.