पान:केकावलि.djvu/279

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७२ मोरोपंतकृत निजानुभव तूं पहा; जशि महौषधी पारदा, . तुला स्थिरबळे करी, कळविलें तुवां नारदा.॥ ११२ १. स्वानुभव. द्वितीयार्धाचा अर्थः-स्वकथाश्रवणाने तुम्ही मोहित होता किंवा नाहीं ह्याबद्दलचा तुम्ही आपला अनुभव सांगा. ज्याप्रमाणे अत्यंत चंचल पायाला महौषधी स्थिर करिते त्याप्रमाणे भगवान् अत्यंत चंचल, कोठेही फार वेळ स्थिर न राहणारा असा असतांही भगवत्कथा त्याला स्थिर करिते. याला प्रमाण भगवद्वाक्यच. जेथें भगवत्कथाकीर्तन चाललें असतें तेथून माझ्याच्याने मुळीच हालवत नाही इतकें माझें मन तेथे रमून जातें असें तुम्ही आपणच नारदाला सांगितले. स्वकथेविषयी तुमची आसक्ति तुमच्याच म्हणण्यावरून सिद्ध होते. २. मोठी औषधी, पायाचें चंचलत्व नाहीसे करून टाकणारी वनस्पती. कांही एका प्रकारच्या वनस्पतीचा रस पाऱ्याशी मिश्रित केला असतां पाऱ्याचे चंचलत्व मोडते हे सुप्रसिद्ध आहे. रसायनक्रियेत पाऱ्याचा अस्थिरपणा घालविण्याकरितां वनस्पतींचा फार उपयोग करितात. त्या क्रियेला रासायनिक क्रियेत पारा मारणे असे म्हणतात. ३. पायाला. भगवंताची स्वकथासक्तिः-कोठेही भगवद्गुणवर्णन चालले असले म्हणजे तेथे भग___वंताची स्वारी हजर असते या गोष्टीस अनुलक्षून येथे कथा भगवंताला स्थिर करिते असे म्हटले आहे. भगवंताचें मन कोठेही रमत नाही पण तें कथेत रमतें. रमेसारख्या सर्वगुणसंपन्न भायेंजवळ सुद्धा भगवान् फार वेळ बोलत बसत नाहीत, पण तेच हरिकथेत नेहमी हजर असावयाचेच असा पुष्कळ ठिकाणी उल्लेख आहे. व्यंग्यार्थः-कोणच्याही उपायाने स्थिर न होणारें चंचल मन रिकथेत स्थिर होते. प्रभु नेहमी स्थिरच असून स्वभक्त पुंडलिकांच्या समोर ते नेहमी अंतबर्बाह्य स्थित सतात. परंतु भक्ताचें मन अत्यंत चंचल असल्यामुळे त्याच्या ते दृष्टिगोचर होत नाहीत. कथाप्रसंगारं-दशेंद्रिये व मन प्रभूकडे लागतात तेव्हां अंतर्बहिश्न यत्मर्ने मान्य नारायणः स्थितः' ह्या गोष्टीचा मक्तास प्रत्यक्ष अनुभव यता. स्वतःचे चचल मन हरिकथाप्रसंगी स्थिर होते ह्या गोष्टीची भ्रांति (येथे ही भ्रांति काव्यसौंदर्यास्तव मुद्दाम आणिलेली आहे) होऊन लाखों का पाठीमागे असल्यामुळे जात्या अस्थिर प्रभु कथाप्रसंगी मात्र स्थिर होतात असें भक्त वर्णन करितात. पुढील कथेत हीच भ्रांति वर्णिली आहे व त्यामुळेच काव्यरसपरिपाक खमंग झाला आहे. पृ० १३४-१३५ यांतील 'काव्यांतील भ्रामक कल्पना व काव्यानंद' ही टीप पहा. भगवंतांनी नारदाला काय सांगितले ते पुढल्या केकेंतच सांगितले आहे. केकासौंदर्यः-फार वेळ एका ठिकाणी स्थिर न राहणाऱ्या नारदाला भगवंतांनी आपली अस्थिर बुद्धि कोठे नष्ट होते ते सांगणे फारच योग्य. ४. प्रसिद्ध देवर्षि नारदमुनीला. कथासंदर्भ:नारद हा प्रस्तुत 'वाराहकल्पाच्या' स्वायंभुव मन्वंतरांत ब्रह्मदेवांनी जे दश मानसपत्र उत्पन्न कले त्यांत दाहावा असून पित्याच्या मांडीपासून उत्पन्न झाला. 'ब्रह्मदेवाच्या शरीरापासन याला म्हणून नारद म्हणतात' अशी एक 'नारद' शब्दाची व्युत्पत्ति असून, 'जो पितरांना नार 2 (पाणी) देतो तो नारद अशी दुसरीही व्युत्पत्ति पुराणांतून दिलेली आढळते. हा पूर्वकल्पी अर्थात् पंचविसाव्या 'घोर' कल्पांत दासीपुत्र होता. याची माता ब्रह्मनिष्ठांच्या पदरी दास्य करित होती. तेथे याला लहानपणीच सत्संग झाल्यामुळे भागवतधर्म व भगवत्कीर्ति यांचे श्रवण करण्याची