________________
२७० मोरोपंतकृत ह्मणेल 'अतुला कथा' झणि ह्मणाल, 'तो आग्रही;' न केवळ मलाचि हे निरुपमा, यशोमंडिता, गुरूसहि गमे, पुसा स्ववरदा महापंडिता. ॥ १११ मर्म जाणणाऱ्या सत्पुरुषाच्या मुखाने ऐकण्यांत आल्यावर कथेला मोल नाही असेच उद्गार सहृदय वाचकांच्या किंवा श्रोत्यांच्या मुखांतून निघतील. १. कदाचित्. 'झणि म्हणाल तो आग्रही' भगवत्कथा अनुपमेय आहे असे जो म्हणेल त्याला कदाचित् तुम्ही आग्रही (पक्षपाती) म्हणाल. भगवत्कथेची तो अवास्तव स्तुति करितो, असें देवा! तुम्ही म्हणाल; पण तसे नाही. तुम्ही कोणाही सत्पुरुषाला विचाराल तरी तो अशाच प्रकारचे आपले मत देईल. मीच असें म्हणतों असें नाहीं. २. यशस्+मंडिता यशः+मंडिता यशोमंडिता यशानें मंडित, कीर्तीने भूषित. भगवत्कथा अनुपमेयः-श्रीमत् भागवतग्रंथ हा व्यासाने भगवंताच्या गुणवर्णनाकरितांच मुद्दाम रचिला असल्यामुळे त्यांत हरिकथेचे माहात्म्य ठिकठिकाणी अत्यंत सुरस असें वर्णिले आहे. त्यांतील उगीच थोडासा मासला येथे दिला आहे:-(१) 'शृण्वतां स्वकथां कृष्णः पुण्यश्रवणकीर्तनः । हृद्यन्तःस्थो ह्यभद्राणि विधुनोति सुहृत्सताम् ॥ (१.२.१७) (२) 'इदं हि पुंसस्तपसः श्रुतस्य वा स्विष्टस्य सूक्तस्य च बुद्धिदत्तयोः । अविच्युतोऽर्थः कविभिनिरूपितो यदुत्तमश्लोकगुणानुवर्णनम् ॥' (१.५.२२) (३) 'तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं । श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृणंति ते भूरिदा जनाः ॥ (१०.३१.९) द्वितीयार्धाचा अर्थः-सगवत्कथा ला एकट्यालाच उपमारहित व पतितोद्धार केल्यामुळे मिळालेल्या कीर्तीने भूषित अशी भासते असें नाहीं तर तुमच्या सांदीपनी गुरूला देखील ती तशीच म्हणजे उपमारहित व यशोभूषित भासत होती. माझ्या म्हणण्याचा प्रत्यय घेणे असेल तर तुम्ही आपल्या गुरूलाच विचारा म्हणजे तत्काल खऱ्याखोट्याचा निवाडा होईल. ३. सांदीपनी ऋषीस देखील. कथासंदर्भः-सांदीपनी हा काश्यपऋषीचा पुत्र अवंतीपुरीत राहत असे. बळराम व कृष्ण यांची मुंज झाल्यावर ते ह्या ऋषीजवळ राहून वेदशास्त्रोपनिषदादि सर्व विद्या व चतुःषष्टिकला शिकले व गुरुदक्षिणेबद्दल त्यांनी गुरुपत्नीच्या सांगण्यावरून समुद्रात बुडून मरण पावलेला गुरुपुत्र परत आणून दिला. गुरूच्या येथे रामकृष्ण राहात असतांना कुचैल अथवा सुदामा हा ब्राह्मण त्यांचा सहाध्यायी होता. तेथेंच भगवान कृष्णाचें व त्याचे फार सख्य जडले. पृ० १०७, टीप २ पहा. ४. आपल्याला वर देणाऱ्या. खुबीदार शब्दयोजना:-सांदीपनीच्या ठाया देवा! तुमचा दृढ विश्वास होता व त्याची तम्ही एकनिष्ठपणे सेवा केली हे जाणूनच त्याने तुम्हांवर कृपा केली व वरदान दिले. तेव्हां त्याचें वचन तुम्ही मान्य करालच हे 'स्ववरदा' ह्यांतील स्वारस्य दिसते. गुरूनें कृष्णाला जे वरदान दिले त्याची माहिती 'कृष्णविजय'-अध्याय ८० गीति ६८-७१ यांत दिली आहे. ते असें:'तुम्हांला वेदवेदांगें इच्छा होईल तेव्हां व तेथे स्फुरोत, तुमची कीर्ति मजपेक्षां हजारोंपटीने चहूंकडे वाढो, तुमची कीर्ति पंडित गावोत इ०.' ह्या प्रसंगी सांदीपनीने कृष्णसुदाम्यास जो बोध