________________
मोरोपंतकृत तुला स्वयमुनेसवें, कुवलयद्युतिश्यामला! __ ह्मणाल जरि मोहिनी निर्जंतनू , अवश्या मला; तुलीन अमृतोदधिप्रभवपुंडरीकामला सबळ तो भरतश्रेष्ठ पूजिला शल्ये.' ॥ (आदि १५. २१), (४) 'सीतेसवें विमानी बसतां मानी पुरास दव तारा; । न निवे, न फुले कोण प्रेक्षुनि त्या कापुरा सदवतारा.'॥ (वन०१२.१३२). जलमलास शरदिंदूच्या चांदण्याची उपमा दिली आहे म्हणून उपमालंकार होय. त्यांतच 'जळमकाची बरोबरी करवत नाही मग प्रत्यक्ष जळाची कोठून होणार?' असें ध्वनित करण्यांत काव्यार्थापत्तीचा मसाला पडला. 'जशी सुधा तशी काकवी कां म्हणतील ?' अर्थात् म्हणणार नाहीत. येथे प्रश्नालंकार आहे. कोठे सुधा आणि कोठे काकवी असा यांत भाव आहे म्हणून विषमालंकारध्वनि आहे. गंगेची सर यमुनेला येते असें ज्ञाते म्हणणार नाहीत असे दाखविण्याकरितां चतुर्थचरणांत 'हष्टांत' योजिला आहे तसेंच येथे गंगेची समृद्धि वर्णिली असल्यामुळे 'उदात्त' अलंकारही झाला आहे. १. तुलना करा. प्रास्ताविकः-'या गोष्टींत तुमचा माझा विभाग करूं तो असा की, मोहिनी आणि यमुना तुम्ही आपणाकडे घ्या; आणि कथा व गंगा मजकडे द्या. मग आपण बरोबरी पाहूं, अशा अभिप्रायाने कवि म्हणतो' (केकादर्श). २. आपल्या यमुनेबरोबर. ३. कुवलय (नीलकमल) त्याची द्युति (कांति) तिजप्रमाणे श्यामल (नीलवर्ण) अशा देवा! 'नीलतोयदमध्यस्थविद्युल्लेखेव भासते। नीवारशुकवद्रूपं पीतामं सर्वकारणम् ' ॥ (याज्ञवल्क्य). अन्वयार्थः-'कुवलयद्युतिश्यामला! (नीलक लवर्णा ! देवा !) जरि मोहिनी निजतनू (आपले शरीर, स्वरूप) म्हणाल (म्हणत असाल) [ तरी] अवश्या मला (मला ती तुमचीच तनु असे म्हणावयाचे आहे, मोहिनी तुमची तनु हे मला अवश्य म्हणणे आहे); [ती मोहिनी तुम्ही] स्वयमुनेसवें (आपल्या यमुनेबरोबर) तुला (तुलना करा). अमृतोदाधप्रभवपुंडरीकामला (सुधासागरापासून उत्पन्न झालेलें जें श्वेतकमल त्याप्रमाणे शुभ्र अशी) कथा (भगवत्कथा) सुजन (साधुजन) जींत (ज्या कथेत सुरधुनीत) विश्रामला (विश्रांति पावला) [अशा सुरधुनीसवें (देवनदी-भागीरथीबरोबर) तुलीन (तुलना करीन.) प्रथमार्धाचा अर्थः-मोहिनी माझें शरीर किंवा मद्रूप आहे असे हे नीलकमलवर्ण देवा ! तुमचे म्हणणे असेल तर ते मला मान्य आहे. जसा तुमचा वर्ण नील आहे तसाच मग मोहिनीचाही असेल म्हणून तुम्ही तिची आपल्या नीलवर्ण यमुनेशी बरोबरी करा. 'कुवलयद्युतिश्यामला' हे पद मोहिनीचें विशेषण मानल्यासही चालेल. ४. माझें शरीर, मद्रप. भगवान् विष्णूंनींच मोहिनी अवतार घेतला होता तेव्हां मोहिनी तद्रूप उघड उघडच झाली. ५. अमृतसागरापासून उत्पन्न झालेले पुंडरीक (श्वेतकमल) त्याप्रमाणे अमला (शुद्धा, शुभ्रा) अशी (कथा). द्वितीयार्धाचा अर्थः-(देवा! तुम्ही स्वस्वरूप जी मोहिनी तिची यमुनेबरोबर तुलना केली म्हणजे मग मी काय करीन? तर सुधासागरापासून उत्पन्न झालेल्या शुभ्र कमलाप्रमाणे स्वच्छ कीर्ति आहे जिची