पान:केकावलि.djvu/272

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. भिऊनि म्हणतील कां 'जशि सुधा तशी काकवी' ? ॥ १०९ णांचा अर्थः-जिला त्रिभुवनपति शंकराने आपल्या मस्तकी धरिली आहे, जिचें उदक शरदृतूंतील चांदण्याप्रमाणे स्वच्छ, शुभ्र व शीतल आहे, जिच्या उदकांत स्नान केल्याने प्राणी हरिहररूपें पावतात असा ज्या गंगेच्या महिमा तिची सर यमुनेला कोठून बरें येणार? यांत उदात्तालंकार झाला. 'सुसमृद्धिवर्णन तसें स्तुत्यचरित्रहि उदात्त अन्यांग; । ज्याच्या शिखरावरि तो झाला धूर्जटिकिरीटिरण सांग.' ॥ (अ० वि०). जेथे एखाद्या पराक्रमी राजाच्या ऐश्वर्याचे, पुण्यशील साधूचे किंवा भव्य वनश्रीचे वर्णन केले असतें तेथें 'उदात्त' नामक अलंकार होतो. वरील उदाहरणांत 'स्तुत्यचरित्र' वर्णिले असून ह्या केकेंत गंगेच्या समृद्धीचे वर्णन केले आहे. प्रास्ताविकःतेव्हां गंगा व यमुना या दोघींत गंगाच श्रेष्ठ असे सर्व सुज्ञ पुरुष म्हणतील अशा हेतूनें कवि म्हणतात. चतुर्थचरणार्थः-राजाला काकवी आवडते म्हणून निस्पृह असे शहाणे लोक सुधेप्रमाणे काकवी गोड असते असें कां म्हणतील? अर्थात् म्हणणार नाहीत. केकामाधुर्यः-राजाने अडाणीपणाने किंवा आपल्याला फार आवडते म्हणून काकवीची अतोनात स्तुति करून ती अमृताप्रमाणे मधुर लागते असे म्हटले म्हणून जसे स्पष्टवक्ते ज्ञाते पुरुष आपण राजाच्या म्हणण्यास मान डोलवीत नाहीत तर त्याचा आपल्यावर राग होईल अशी भीति मनांत न बाळगतां काकवी ती काकवी व सुधा ती सुधा, काकवीला सुधेची सर कदापि येणें नाहीं असा आपला स्पष्ट अभिप्राय देतील; त्याप्रमाणेच समंजस लोक भगवंताला गंगायमुना दोघी सारख्याच आवडल्या म्हणून गंगेची योग्यता यमुनेला येईल असें म्हणणार नाहीत. यांतील वर्णन करण्याची कारकुनी व दरवारी ऐट ध्यानात ठेवण्याजोगी आहे. दृष्टांत किती सरस आहे. तो पहा, उपमेची समर्पकताः-काकवीसुधांचा दाखला देण्यांत कवीने काकवीप्रमाणे यमुना कृष्णवर्ण व सुधेप्रमाणे भागीरथी श्वेतवर्ण असा आपला अभिप्राय दर्शविला आहे. या १. राब. उसाच्या रसापासून गूळ करितांना मध्ये पाकावर जी मळी. येते तिच्यापासूनच राब किंवा काकवी करितात. 'कवि भिऊनि म्हणतील कां जशि सुधा तशी काकवी' एवढे पद सुभाषितरूप होय. या सुभाषिताच्या समानार्थी दुसरें एक सुभापित पंतांच्या काव्यांतून आढळते. तेथेही 'काकवी' ह्या शब्दाचा उपयोग केला आहे:-'त्यजुनि सुधा सुज्ञ रसिक सेवूनि न काय काकवी लाजे.' [ विश्वेशस्तुति-२१ पृ० ७८ ]. अलंकारसमचयः-शरदिंदूचें चांदिणे हे फार शुभ्र अर्थात् निर्मळ होय. त्यास जिच्या जळमळाचीही सर नाही. येथे निर्मल पदार्थाहून प्रत्यक्ष मळही शुद्ध होय असा विरोधाभास अलंकार ध्वनित होतो. याचे लक्षण वगैरे के० ७ पृ० २३ यांत पाहावें. प्रत्यक्ष गंगेच्या जळाचा मळ हा शुभ्र असणार असा शुभ्रत्वार्थ घेतला असतां विरोधपरिहार होतो. विरोधाभासाची उदाहरणे:-(१) 'तो पात्र होय होउनि कठिणहृदयही पृथासुत नुतीतें.' । (मोरोपंत-महाप्रस्थानिकपर्व) केका ७ पृ० २३ पहा. (२) 'तों राजसुता पावे भी, उदया पावतां हिमकरातें। नच दैत्यसुता भीति मुख पसरुनि धांवतांहि मकरातें.' ॥ (हरि० स० ३६ गी० ५५), (३) यच्चरितें सुजनांच्या हृदयीं अमृतेंचि, शत्रुच्या शल्यें । सद्विज, सामात्य,