Jump to content

पान:केकावलि.djvu/274

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २६७ कथा सुरधुनीसवें, सुजन जीत विश्रामला. ॥ ११० शुकोदित पुराण ज्या श्रवण सन्मुखें साग्रही, त्या भगवत्कथेची तुलना मी ज्या ठिकाणी साधुजन विश्रांति पावतात अशा श्वेतवर्ण भागीरथीशी करीन. केकासौंदर्यः-कथेची भागीरथीशी तुलना करण्याचे कारण भागीरथीचें उदक शुभ्रवर्ण असून कथेचे यश पुंडरीककमलाप्रमाणे अत्यंत शुभ्रच आहे. तें पुंडरीककमल तरी कोठलें ? तर अमृताच्या सागरापासून उत्पन्न झालेलें. अमृताचा वर्ण शुभ्र हे सुप्रसिद्धच आहे. तेव्हां अमृतसागरापासून निघालेलें कमल अत्यंत शुभ्र असेल यांत नवल काय ? १. विश्रांति पावला. गंगास्नानः-साधु पुरुष गंगेत स्नान केल्याने सर्व दोषांपासून विमुक्त होऊन स्वस्थांतःकरण होतात. साधु पुरुष आपले उत्तर वय गंगास्नानांत व काशीश्वरपूजनांत जावें अशी फार इच्छा करितात. कारण 'काश्यां तु मरणे मुक्तिः' हे सुप्रसिद्धच आहे. ह्यासंबंधी पुढील उतारे वाचनीय आहेत:-'निववी तव प्रवाहचि, गंगे! नासून ताप तीन; रते । ज्यांचे मन तव नीरी, नच, मुख वासून, तापती नर ते.' ॥१८॥ [मो० गगास्तुति-पृ० ४९]. गंगातटीं राहून नित्य स्नान करण्यापासून काय होतें:-'तुझ्या तीरीं नीरी हृदय रमतें, दुःख शमते, । यशोगाने पाने कुमत गळतें, विघ्न टळते, ॥ कळी भंगे गंगे ! पडरि झुरती, दोष नुरती, । दिली रामें, नामें तशिच जगतीला निजगती.' ।। [मो० गंगास्तव २३-पृ० ६९]. म्हणूनच साधुजन ईश्वरापाशी किंवा गंगेपाशी पुढील मागणे मागतात:-'गळावा त्वत्तीरी भगवति ! न हा देह सदनीं । पडो गंगे! तूझें, मरणसमयीं, तोय वदनीं ।। विवकीं यावं, जे धवलपण हेरंबरदनीं । भवी हो त्वन्नेत्र प्रभुनयन तें जेवि मदनीं ॥' [गंगास्तव ९-पृष्ठ ६७]. मोरोपंतांनी 'प्रांतप्रार्थनें'त अशाच प्रकारचे मागणे केले आहे. ते म्हणतात:--'त्रैलोक्यपावनत्वे, भगवज्जनमंडळीच गंगा हो ! । यतिव, अंती माझ्या प्राप्त हिचे संनिधान अंगा हो. ॥ १४ ॥' [प्रांतप्रार्थना पृ. २७५ मो. स्फु. प्र. भाग १]. २. प्रास्ताविकः-मागल्या केकेंत कवीने कथेला गंगेची उपमा दिली पण वास्तविक कथेला कशाचीच उपमा देतां येत नाही, ती निरुपम आहे, असे प्रतिपादित होत्साते कवि म्हणतात. शुकाने सांगितलेले. शुक हा वेदव्यासाचा मुलगा असून हा अत्यंत भगवन्निष्ठ होता. ह्याची गणना भागवतोत्तमांत केली आहे. श्रीमद्भागवत दशमस्कंधांत ज्या महषींची भागवतोत्तमांत गणना केली आहे, त्यांची नांवे पंतांनी आपल्या 'मंत्रभागवतांत पुढीलप्रमाणे दिली आहेत:-'श्रीकंठ, नारदमुनि, प्राचेतस, शुक, पराशर, व्यास । नमिले भागवतोत्तम जे शर शिवले परा शरव्यास. ॥' [दशमस्कंध-गी० १]. परमभागवतांची नांवें 'पांडवगीते'त पुढीलप्रमाणे दिली आहेत:-'प्रन्हादनारदपराशरपुंडरीक- । व्यासांबरीषशुकशौनकभीष्मदाल्भ्यान् ॥ रुक्मांगदार्जुनवशिष्टबिभीषणादीन् । पुण्यानिमान्परमभागवतान् स्मरामि।।। (बृहत्स्तोत्ररत्नाकर पृ० ३६६, 'पांडवगीता' १). तसेंच 'वैष्णवकुळनायक । नारदप्रहादसनकादिक । उद्धवअक्रूरश्रीशुक । वशिष्टादिक निजभक्त' ॥ (एक. भाग १. १३५). कथासंदर्भ:मृगयेकरितां अरण्यांत संचार करणाऱ्या परिक्षिति राजानें ध्यानस्थ असलेल्या शमिक ऋषीच्या गळ्यांत मृतसर्प घातला. ऋषिपुत्र शुंगीने परीक्षिति राजास 'तूं सात दिवसांनी सर्पदंश होऊन मरण पावशील' असा शाप दिला. तेव्हां स्वदेहाचे अत्यंत सार्थक करू इच्छिणाच्या