________________
२६१ केकावलि. अभीष्ट फल द्यावया नेतमनोरथा हेतु जी;। म्हणाल जरि 'मीच त्या, विषम काय दोघींत ! रे ? जसा जन सितासिताभिधनदीसदोघी तरे' ॥ १०७ कारणीभूत) [आहे]; यावर कवि भगवदाशंका लिहितात:-[देवा! यावर आपण] जरि म्हणाल (कदाचित् म्हणाल) त्या (कथा व मोहिनी) मीच [आहेत]; दोघींत विषम (भेद) काय? रे! जसा (ज्याप्रमाणे) जन (लोक) सितासिताभिधनदीसदोघी (श्वेतवर्ण गंगा व नीलवर्ण यमुना यांच्या पुण्य प्रवाहांत) तरे (तरतो, स्नानाने पापविमुक्त होतो). [त्याप्रमाणे कथा व मोहिनी ह्या एकरूपच आहेत.] प्रथमार्धाचा अर्थः-वरील सर्व विवेचनावरून देवा! तुमची कथा मोहिनीपेक्षां पुष्कळ अधिक योग्यतेची आहे हे ठरले. कारण शरणागतांचे वांच्छित मनोरथ पूर्ण करण्यास ती तत्पर असते. कवीचें निरंकुशत्वःयेथे कवीनें प्रासास्तव 'झ'च्या जागी एकांशी सवर्ण जो 'ज' त्याचा आदेश केला आहे. असें करण्यास कवीच्या निरंकुशत्वानें कवीस पूर्ण अधिकार पोंचतो व त्याचा त्याने आपल्या काव्यांत पूर्णपणे उपयोग केलेला आढळतो. 'झ'स्तव 'ज', 'झ्या' स्तव 'जा', 'च्या' स्तव 'चा', 'श' स्तव 'स', 'ठ' स्तव 'ट', 'ड' स्तव 'ढ', 'घ' स्तव 'ख' इत्यादि निरंकुशत्वाचे अनेक प्रकार या महाराष्ट्रकविराजतिलकाच्या काव्यांतून आढळतात. पुरवणी पहा. १. इच्छिलेलें (अभि+इष्+क्त), वांच्छित. २. नम्रजनांच्या रक्षोरथांना. ३. कारण. ४. कथा व मोहिनी. द्वितीयार्धाचा अर्थ-कथा व मोहिनी ह्या दोन्हीही मत्स्वरूपच आहेत, मोहिनीचें रूप तरी मीच घेतले होते व कथा तरी माझीच आहे. मग ह्या दोघींत तूं भेद कोणता काढतोस? सारांश, मोहिनी व कथा ह्या दोघी भिन्न नसून मत्स्वरूप एकच आहेत, त्या दोघींत कांहीं भेद नाही. [यास दृष्टांत चवथ्या चरणांत दिला आहे.] ज्याप्रमाणे माणसें श्वेतवर्ण गंगेच्या किंवा नीलवर्ण यमुनेच्या प्रवाहांत स्नान केल्याने सारखींच तरतात. (त्यांना कमी अधिक पुण्य लागत नाही तर सारखेच लागते.) तद्वत् कथा व मोहिनी या दोघी एकरूपच असून त्या भजकांना सारखींच फलें देतात. ५. भेद, भिन्नता. ६. कथा व मोहिनी या दोघींत. ७. सिता (श्वेत, पांढरी)+असिता (काळी)+अभिध (अभिधा-नांव)+नदी+सत् (चांगला)+ओघ (प्रवाह) त्यांत=सिता म्हणजे गंगा आणि असिता म्हणजे यमुना या नांवांच्या ज्या पवित्र नद्या त्यांच्या उत्तम प्रवाहांत. गंगेचे उदक शुभ्रवर्ण व यमुनेचे उदक कृष्णवर्ण किवा नीलवर्ण आहे हे सुप्रसिद्ध आहे. हे पद लांब समासाचे सुरेख उदाहरण आहे. पुरवणी पहा. गंगायमुनांच्या उदकांचा वर्ण अनुक्रमें शुक्ल व कृष्ण असल्यामुळेच त्यांच्या संगमाला पंतांनी ‘मंत्ररामायणां'त मिश्रितमार रकतमणिमयहारद्वयप्रभाचोर' असे म्हटले आहे. [मंत्ररामायण-युद्धकांड-गी० ७९.7