पान:केकावलि.djvu/269

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६२ मोरोपंतकृत अहा ! बहु विशुद्ध 'हे प्रभु ! तव स्वरूपाहुनी; ___न भिन्नतनु त्या; भले भजति, एकता पाहुनिः। परंतु वदतों जैनानुभव नातळो पाप गा! तशी न यमुना गमे, जशि गमे निलिंपापगा. ॥ १०८ १. प्रास्ताविकः-मागल्या केकेंत गंगा व यमुना यांचा दाखला देऊन कथा व मोहिनी ह्या दोन्ही एकरूपच आहेत असें भगवंताचे म्हणणे सांगितले ते आपल्यास मान्य नाही अशा अभिप्रायाने कवि अत्यंत नम्रतेने या केकेंत म्हणतात. अहा != आनंदप्रदर्शक उद्गार. अन्वयार्थः-अहा! (काय सांगावें) प्रभु! (प्रभो!) तव स्वरूपाहुनी (तुझें स्वरूप में मोहिनी त्यापेक्षां) हे (ही कथा) बहु (फार) विशुद्ध (अत्यंत शुद्ध, विशेषेकरून शुद्ध); त्या (गंगायमुना) भिन्नतनु (भिन्नशरीरिणी, निराळ्या) न (नाहीत) [तर एकता (अभिन्नता, ऐक्य) पाहुनी भले (ज्ञाते सुज्ञ पुरुष) भजति (भजतात); परंतु जनानुभव (लोकांचा अनुभव) वदतो (सांगतो) गा! (देवा!) पाप नातळो (स्पर्श न करो); [लोकांची समजूत अशी की] जशी निलिंपापगा (देवनदी, भागीरथी) गमे (गमते, समजली जाते, आवडते) तशी (त्याप्रमाणे) यमुना न गमे (गमते). प्रथमचरणार्थः-तुझें रूप जी मोहिनी तीपेक्षा भगवत्कथा अत्यंत निर्मल होय. २. ही (कथा). 'ही' स्तव 'हे' तसेच 'ती' स्तव ते' योजण्याला कविवृंदांचा सर्वसंमत संप्रदाय आहे. ३. भिन्नशरीरिणी, वेगळाल्या. द्वितीयचरणार्थ:-गंगायमुना ह्या निराळ्या नसून एकरूपच आहेत व म्हणूनच ज्ञाते पुरुष त्या दोघींची तुजशी अभिन्नता समजून त्या दोघींनाही सारख्याच रीतीने भजतात. गंगेपेक्षां यमुनेचे किंवा यमुनेपेक्षां गंगेचें माहात्म्य ते अधिक समजत नाहीत, तर त्यांची तुझ्याशी एकरूपता पाहून दोघींचीही भक्ति ते सारखीच फलदायिनी समजतात. ४. ऐक्य, अभिन्नता. ५. लोकांचा अनुभव. तृतीयचरणार्थः-पण त्यांविषयी लोकांची समजूत काय आहे ती मी सांगतों; पण ती सांगण्याबद्दल मला पाप मात्र न लागावें. ६. न आतळो, न स्पर्शी. ७. कवि जनानुभव कोणता हे चतुर्थचरणांत सांगतात. 'निलिंपाः देवाः' असें त्रिकांडशेषको. शांत प्रमाण आढळते. निलिंप (देव)+आपगा (नदी)-सुरापगा, देवनदी. भागीरथी. बतचरणार्थ:-लोकांना ज्याप्रमाणे देवनदी भागीरथी आवडते त्याप्रमाणे त्यांना यमुना आवडत नाही. गंगायमुना ह्या दोघींची योग्यता जरी समसमान असती तरी लोकांचे प्रेम भागीरथीवर जितके आढळून येते तितकें कांहीं यमनेविषयी नाही. त्याचप्रमाणे मोहिनी व भगवत्कथा ह्या दोघी वस्तुतः भगवंताची स्वरूपेंच होत तरी मोहिनीपेक्षां कथा चांगली-असें कवि म्हणतात. खुबीदार शब्दयोजना:'निलिंपापगा' हे पद फार खुबीदार आहे. भागीरथीला देवनदी म्हणण्यांत ती देवांनाही पूज्य आहे असे सुचविलें. यमुना असे साधेच लिहून गंगेविषयी बोलतांना मात्र देवनदी असा